ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातून कॉर्पोरेट जिहाद? मुलाखतीच्या नावाखाली धर्मांतराचं कांड,वेशांतर करुन पोलिसांनी फोडलं बिंग

Inside Nashik IT Company Scandal: भोंदू खरातच्या काळ्या कारनाम्यांनी हादरून गेलेल्या नाशिकमध्ये धर्मांतरासह लैंगिक शोषणाचं रॅकेट उघडकीस आलंय. एका नामांकित आयटी कंपनीत राजरोसपणे सुरू असलेल्या या रॅकेटचा भांडाफोड पोलिसांनी कसा केला? आणि त्याची मोडस ऑपरेंडी नेमकी काय?, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Police sting operation exposes alleged sexual exploitation and conversion racket inside Nashik IT company
Police sting operation exposes alleged sexual exploitation and conversion racket inside Nashik IT companySaam Tv
Published On

नाशिक... आधी हनी ट्रॅप, त्यानंतर भोंदू अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांनी चर्चेत आहे... हे कमी होतं की काय.... आता नाशिकच्या नामांकित आयटी कंपनीत धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचं रॅकेट पोलिसांनी सापळा रचून उद्ध्वस्त केलं.. मात्र या रॅकेटची कुणकुण लागल्यानंतर सरकारने गुप्तपणे एसआयटीची नेमणूक केली... त्यानंतर महिला पोलिसांनी चक्कं वेशांतर केलं...आयटी कर्मचाऱ्याच्या वेशात मुलाखतीसाठी पोहोचल्या.... आणि कॉर्पोरेट जिहादचा भांडाफोड झाला.... या प्रकरणात 9 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत... मात्र राजरोसपणे कंपनीत सुरू असलेल्या या लैंगिक शोषणाचं भांडाफोड पोलिसांनी कसा केला याची माहिती आता समोर आलीय...

कसा केला पोलिसांनी भंडाफोड?

- IT कंपनीविरोधात तक्रार येताच 7 महिला पोलिसांची स्पेशल टीम

- महिला पोलिसांची IT कर्मचाऱ्यांच्या वेशात कंपनीत एन्ट्री

- मीटिंगदरम्यान आरोपींचं अश्लील वर्तन, पोलिसांची तात्काळ कारवाई

- 40हून अधिक CCTV फुटेज आणि इतर डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती

- पोलिसांच्या कारवाईमुळे नामांकित IT कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा भंडाफोड

इतकंच नाही तर SIT च्या तपासातही धक्कादायक माहिती पुढे आलीय.

२०२२ ते २०२६ या कालावधीत प्रकार सुरू

नोकरीसाठी भरलेल्या इंटरव्ह्यू फॉर्म मधील वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून महिलांना जाळ्यात ओढलं जायचं...

आरोपींकडून पदोन्नती आणि पगारवाढीचे आमिष दाखवलं जायचं

तसच काही प्रकरणांत ब्लॅकमेल करून महिलांचे शोषण केलं जायंच

तर वीकेंड ट्रिपच्या नावाखाली कॅफे, हॉटेलमध्ये नेत जवळीक निर्माण करत लेंगिक शोषण केल्याचं देखील या SIT तपासातून समोर आलंय.

महत्त्वाचं म्हणजे, केवळ लैंगिक शोषणच नव्हे, तर जाणीवपूर्वक हेरून कर्मचाऱ्याचा ब्रेनवॉश केला जायचा. SIT तपासानुसार, गेल्या 4 वर्षांपासून तरुणांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार सुरू होता. कर्मचाऱ्यांच्या धर्मांतरापर्यंत प्रकरण पोचेपर्यंत कुणालाच याचा मागमूस कसा लागला नाही..या कंपनीत नोकरी आणि मुलाखतीच्या निमित्ताने कर्मचाऱ्यांचा हा धर्मांतर आणि लैंगिक शोषणाचा खेळ कुणाच्या आशीर्वादानं सुरु होता... त्याच्या मुळाशी जाऊन सत्य शोधण्याची गरज आहे... आणि दोषींना जन्माची अद्दल घडवायला हवी...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com