Sangli Crime News : घराला करंट देऊन कुटुंबास संपविण्याचा प्रयत्न फसला, पाेलीस तपास सुरु

वीज बंद पडल्यामुळे सुदैवाने संपूर्ण कुटुंब वाचले
Sangli Crime News
Sangli Crime NewsSaam tv
Published On

Sangli News : सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथे घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंब जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची तक्रार अशोकराव शंकरराव निकम यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात केली. निकम यांनी अज्ञातांविरोधात ही तक्रार दिली आहे. (Maharashtra News)

Sangli Crime News
Swabhimani Shetkari Sanghatana : 'स्वाभिमानी' उतरली रस्त्यावर, मुंबईला जाणारी साखर, इथेनॉलच्या गाड्या राेखल्या

स्वातंत्र्यशाहिर (कै.) शंकरराव निकम यांचे मोठे सुपूत्र अशोकराव निकम वांगीच्या उत्तरेस शिवणी रोडलगत वास्तव्यास आहेत. मध्यरात्री बारा ते दीडच्या सुमारास निकम कुटूंबीय झोपी गेल्यानंतर अज्ञातांनी जवळच असलेल्या उच्च दाबाच्या ट्रान्सफर्मरमधून केबल जोडून घराच्या मागच्या व पुढच्या दोन्ही दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Sangli Crime News
Satara News : सातारा एलसीबीची माेठी कारवाई, 47 लाखांचा गुटखा पकडला, ट्रकही जप्त

निकम यांच्या घराजवळ असणाऱ्या हेवी टेन्शनच्या ट्रांसफार्मर मधून तारा जोडून त्या शेतातील घराच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाराच्या कोयंड्याना जोडण्यात आल्या. नायलॉनच्या दोरीने सुमारे एक हजार फूट अंतरावरून या जोडलेल्या तारांचे नियंत्रण करायचे आणि ट्रान्सफॉर्मर सुरू करण्याची तार खेचायची अशा हेतूने हल्लेखोरांनी (crime) त्याची जोडणी केली होती.

Sangli Crime News
Milk Price Issue : दूध खरेदीचा दर वाढवा : शेतक-यांची मागणी

रात्री दीडच्या सुमारास त्याचा चाप खेचला असावा. त्यामुळे तारांवर अचानक लोड येऊन ट्रान्सफॉर्मर जवळ स्फोट होऊन जाळ लागला. मोठ्या आवाजाने आणि आगीमुळे जागे झालेल्या निकम कुटुंबीयांनी दरवाजा उघडला.

या स्फोटामुळे ट्रीप होऊन वीज गेल्याने सुदैवाने घराबाहेर पडताना कडी-कोयंड्याना हात लागूनही त्यांना विजेचा धक्का बसला नाही. सावध झालेल्या निकम कुटुंबीयांनी हा आपल्याला सहकुटुंब मारून टाकण्याचा डाव आहे हे जाणून तातडीने बचावाच्या हालचाली केल्या.

या दरम्यान काही लोक तेथे मोठमोठ्याने बोलत असल्याचे आणि पिकाचा फायदा घेऊन धावत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मात्र हे हल्लेखोर कोण होते त्याचा अंधारामुळे सुगावा लागला नाही.

Edited By : Siddharth Latkar

Sangli Crime News
ACB Traps Sports Officer : 1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com