chandrashekhar sakhare, kolhapur
chandrashekhar sakhare, kolhapursaam tv

ACB Traps Sports Officer : 1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटकेत

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर क्रीडा क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
Published on

- रणजीत माजगावकर

Kolhapur Sports News : कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे (kolhapur district sports officer chandrashekhar sakhare) याला 1 लाख 10 हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने अटक केली. एका ठेकेदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी करुन साखरेवर सापळा रचत कारवाई केली. (Maharashtra News)

chandrashekhar sakhare, kolhapur
Talegaon MIDC : ...अन्यथा तळेगाव एमआयडीसी बुधवारी बंद पाडणार : आमदार सुनील शेळके

या कारवाईबाबत पोलीस उपअधिक्षक सरदार नाळे म्हणाले ॲल्युमिनियम कंपोझिट पॅनेलवरती प्रिंटशिप तयार करून देण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून झालेल्या कामांची बिले काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे याने 1 लाख 10 हजारांची लाच (bribe) मागितली होती. त्याबाबतची तक्रार एसीबी कार्यालयात ठेकेदाराने केली.

जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे यांला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळच्या सुमारास झाली. दरम्यान उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सापडल्याने काेल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

chandrashekhar sakhare, kolhapur
Nitesh Rane News : कोणाच्याही घरात पाळणा हलू द्या, ठाकरे गट पेढे वाटायला पुढं : नितेश राणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com