Maval News : जनरल मोटर्सच्या कामगारांचे प्रश्न राज्य सरकारने सोडवले नाहीत तर मावळातील तळेगाव एमआयडीसी अकरा ऑक्टोबरला ठप्प करू. भले एमआयडीसी मधून कंपन्या स्थलांतरित झाल्या तरी आम्ही पर्वा करणार नाही असा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके (mla sunil shelke) यांनी सरकारला दिला आहे. (Maharashtra News)
सन 2020 कालावधीत बंद पडलेल्या जनरल मोटर्सच्या कामगारांनी आज (साेमवार) बेमुदत साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. जनरल मोटर्स कंपनीच्या ठिकाणी येणाऱ्या नामांकित कंपनीत आम्हांलाच नोकरी द्यावी या प्रमुख मागणीसाठी कामगार कुटुंबियांसह रस्त्यावर उतरले आहेत.
या आंदाेलकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मावळमधील सत्ताधारी आमदार सुनील शेळकेंनी उपोषणस्थळी भेट दिली. जनरल मोटर्सच्या कामगारांचा प्रश्न सरकार गांभीर्यानं घेतला नाही. अशी कबुली शेळकेंनी जाहीरपणे दिली. पण मी सत्तेत असलो तरी सरकारची बाजू घेणार नाही. सरकारने वस्तुस्थिती स्विकारायला हवी.
आमचा येथे येणा-या कंपनीला विरोध नाही, पण स्थानिक भूमिपुत्र आणि कामगारांचे प्रश्न जो पर्यंत मिटत नाहीत, तोपर्यंत कंपनीत कोणतंही काम करू देणार नाही असा इशारा शेळकेंनी दिला.
शेळक म्हणाले आज दोन ऑक्टोबरला तुम्ही मुलांना-पत्नीच्या सोबतीने मोठ्या संख्येत रस्त्यावर उतरला आहेत. हे पाहून सरकारला ही घाम फुटला असेल. म्हणूनच मी सरकारला दहा ऑक्टोबर पर्यंतचा अल्टीमेटम देतोय. त्यांनी निर्णय न घेतल्यास अकरा ऑक्टोबरला तळेगाव एमआयडीसी ठप्प करू, भले कंपन्या स्थलांतरित झाल्या तरी आम्ही त्याची पर्वा करणार नाही असा इशारा देखील शेळकेंनी दिला.
कामगारांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
दरम्यान मावळच्या तळेगाव दाभाडे एमआयडीसी मधील बंद पडलेल्या जनरल मोटर्सचे कामगार आक्रमक झालेत. कामगारांनी गांधी जयंतीचा मुहूर्त साधत बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय.
कामगारांनी कुटुंबियांसह जुन्या पुणे मुंबई महामार्गालगत आणि तळेगाव एमआयडीसीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला आहे. जनरल मोटर्स जागी सरकार एक नामांकित कंपनी आणणार असेल तर तिथं जनरल मोटर्समधील एक हजार कामगारांना त्या कंपनीत कामाला घ्यावे, हे मान्य न केल्यास सरकारने त्यांना कंपनीला परवानगी देऊ नये, कंपनीला रेड कार्पेट टाकणाऱ्या सरकारने कामगारांचा ही विचार करावा अशा मागण्या या साखळी उपोषणाद्वारे करण्यात येत आहेत.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.