Satara News : सातारा एलसीबीची माेठी कारवाई, 47 लाखांचा गुटखा पकडला, ट्रकही जप्त

ही कारवाई पाेलीस अधीक्षक समीर शेख, अपर पाेलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
satara local crime branch, satara, gutkha
satara local crime branch, satara, gutkhasaam tv

Satara Crime News : सातारा पाेलीस दलाने शेंद्रे (ता. सातारा) येथील एका हाॅटेलनजीक सुमारे 47 लाख रुपयांचा गुटखा पकडला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली. या कारवाईबाबत पाेलीस दलाने अन्न सुरक्षा कार्यालयास कळविले. अन्न सुरक्षा अधिका-यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित मुद्देमाल जप्त केला. (Maharashtra News)

satara local crime branch, satara, gutkha
Raju Shetti : 'स्वाभिमानी' चा साखर कारखानदारांच्या विराेधात ढाेल बजाओ, राजू शेट्टींची पुढच्या आंदाेलनाची दिशा स्पष्ट

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार या कारवाईत विमल पान मसाला व व्ही-1 टाेबॅकाे (तंबाखू) तसेच रजनीगंधा फ्लेवर्ड पानमसाला, तुलसी राॅयल जाफराणी जर्दा असा 47 लाख रुपयांचा प्रतिबंधीत गुटखा व 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 67 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

satara local crime branch, satara, gutkha
Maratha Reservation : जबाबदारीने वागा... जरांगे पाटलांना नितेश राणेंचा सल्ला (पाहा व्हिडिओ)

ही कारवाई पाेलीस अधीक्षक समीर शेख (ips sameer shaikh), अपर पाेलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पाेलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पाेलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भाेरे, पाेलीस उपनिरीक्षक पंतग पाटील आदींनी केली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com