Raju Shetti : 'स्वाभिमानी' चा साखर कारखानदारांच्या विराेधात ढाेल बजाओ, राजू शेट्टींची पुढच्या आंदाेलनाची दिशा स्पष्ट

Swabhimani Shetkari Sanghatana : आजपासून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर अडवणार असल्याचा इशारा शेट्टींनी दिला.
swabhimani shetkari sanghatana, kolhapur
swabhimani shetkari sanghatana, kolhapursaam tv
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur News : कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज (साेमवार) राजाराम सहकारी साखर कारखान्यासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. एफआरपी अधिक दुसरा हप्ता 400 रुपये प्रति टन मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानीने हे आंदाेलन छेडले. या आंदाेलनात सौरभ शेट्टी यांच्यासह शेतकऱ्यांनी ढोल वाजवत कारखानदारांना जागे करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. (Maharashtra News)

swabhimani shetkari sanghatana, kolhapur
Sangli News : टेंभूच्या पाण्यावरुन राजकारण तापलं, राेहित पाटलांनी विराेधकांना फटकारलं; आमदार सुमनताईंचे आजपासून बेमुदत उपाेषण

दरम्यान स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला. शेट्टी म्हणाले उसाला दुसरा हप्ता 400 रुपये मिळावा यासाठी 13 सप्टेंबरला साखर कारखानदारांकडे मागणी केली हाेती. त्यावेळी 2 ऑक्टोबरपर्यंत कारखानदारांना मुदत देण्यात आली हाेती.

swabhimani shetkari sanghatana, kolhapur
Maratha Reservation : जबाबदारीने वागा... जरांगे पाटलांना नितेश राणेंचा सल्ला (पाहा व्हिडिओ)

आजपर्यंत 400 रूपये देण्याचे कोणत्याही कारखान्याने मान्यता दिली नाही. त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या दारावरील अतिरिक्त पैसे मागत आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने का देत नाहीत असा सवाल शेट्टींनी केला आहे.

आजपासून कारखान्यातून बाहेर पडणारी साखर अडवणार असल्याचा इशारा शेट्टींनी दिला. ते म्हणाले स्वाभिमानीचे कार्यकर्ते साखर बाहेर सोडणार नाही. येत्या 17 ऑक्टोबर पासून शिरोळ पासून सर्व साखर कारखाना मार्गावर पदयात्रा काढणार आहाेत. आत्मक्लेश आंदोलन करणार आहाेत. 22 दिवस पदयात्रा करून ऊस परिषद होणार असल्याचे शेट्टींनी नमूद केले.

दरम्यान राज्यातील 37 कारखान्या समोर आंदोलन होणार असून आगामी काळात मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रसह कर्नाटकातील कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा देखील शेट्टींनी साखर कारखानदारांना दिला.

Edited By : Siddharth Latkar

swabhimani shetkari sanghatana, kolhapur
Rahata APMC : राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'फुल खरेदी -विक्री केंद्र' उभारणार : राधाकृष्ण विखे-पाटील

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com