Rahata APMC : राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'फुल खरेदी -विक्री केंद्र' उभारणार : राधाकृष्ण विखे-पाटील

सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.
rahata krushi utpanna bazar samiti
rahata krushi utpanna bazar samitisaam tv
Published On

- सचिन बनसाेडे

Radhakrishna Vikhe Patil News : राहाता कृषी बाजार समितीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'फुल खरेदी -विक्री केंद्र' उभारणार असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केले. या बाजार समितीच्या विस्तारासाठी शासनाकडून 9 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यात आली आहे. शेती मालाच्या निर्यातीसाठी शिर्डी विमानतळावर कार्गो हब निर्माण केले जाईल असेही मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले. (Maharashtra News)

rahata krushi utpanna bazar samiti
Ganeshotsav 2023 : 'गणपतीपुढे जमा झालेले पैसे सचिन तेंडुलकरला पाठवणार'

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस (rahata krushi utpanna bazar samiti agm) मंत्री विखे-पाटील यांची उपस्थिती हाेती. या बाजार समितीला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल संचालक मंडळाने विखे पाटील यांचा सत्कार केला. त्यावेळी विखे-पाटील यांनी शेतकरी सभासदांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

rahata krushi utpanna bazar samiti
Sambhajinagar Adarsh Scam : 'आदर्श' चे अध्यक्ष अंबादास मानकापेसह संचालक मंडळावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल

महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले राज्य सरकारच्या वतीने राहाता बाजार समितीला शेती महामंडळाची 9 हेक्टर जमिन हस्तांतरित करण्यात आली आहे. या जागेत आंतरराष्ट्रीय फुल खरेदी - विक्री केंद्र उभारले जाईल.

शिर्डी विमानतळ जवळ असल्याने तेथून देशभरात फुलांची तसेच शेतमालाची निर्यात करता येईल त्यासाठी उत्तम दर्जाचे कार्गो हब निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. कार्गो हब झाल्यास अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक आदी जिल्ह्यातील शेतक-यांना त्याचा फायदा होणार असल्याचेही विखे पाटील यांनी नमूद केले. यावेळी सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, उपसभापती आण्णासाहेब कडू यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com