Milk Price Issue : दूध खरेदीचा दर वाढवा : शेतक-यांची मागणी

गायीच्या दूधला 40 रुपये तर म्हशीच्या दूधाला 75 रुपये प्रतिलीटर द्या अशी मागणी जाेर धरु लागली आहे.
Milk Price, Beed News, farmers
Milk Price, Beed News, farmersSaam TV
Published On

Beed News : दुधाचे दर घसरल्याने दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाचा भाव लिटरमागे 33 रुपये असला तरी केवळ 28 रुपये मिळतात. यामुळे शेतकरी नाराज झाले आहेत. गायीचे दूध 40 रुपये तर म्हशीचे दूध 75 रुपये प्रतिलीटर असा दर द्यावा अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी करु लागले आहेत. (Maharashtra News)

Milk Price, Beed News, farmers
Sangli News : टेंभूबाबत देवेंद्र फडणवीसांचे सुमनताईंना आश्वासन, उपाेषणावर राेहित पाटील स्पष्टच बाेलले

एकीकडे जनावरांसह चाऱ्याचे भाव वाढले आहेत तर दुसरीकडे दुधाचे दर घसरले आहेत. अशा परिस्थितीत दुग्धव्यवसाय करायचा कसा ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. विशेष म्हणजे मागील 5 वर्षांत गायीच्या दुधाचे दर 24 रुपयांहून 27-28 वर आले आहेत. मात्र 1 हजार 400 रुपये क्विंटलची सरकी पेंड 2 हजार 200 रुपये एवढी झाली आहे. 25 ते 30 हजार रुपयांची गाय आज 80 ते 90 हजार रुपयांवर गेली आहे.

Milk Price, Beed News, farmers
ACB Traps Sports Officer : 1 लाख 10 हजारांची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा क्रीडाधिकारी अटकेत

चारा सुद्धा 1 हजार 100 रुपये टनाहून 3 हजार 500 रुपये आला आहे. मात्र दुधाचे दर या प्रमाणात का वाढवण्यात आले नाही ? असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून (farmers) शासनाला विचारला जात आहे.

दरम्यान गायीच्या दूधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 75 रुपये प्रतिलीटर मिळावेत अशी शेतकरी मागणी करु लागले आहेत. बीड प्रमाणे काेल्हापूरात देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूधाच्या दरात वाढ केली जावी अशी मागणी केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Milk Price, Beed News, farmers
Maratha Reservation : जबाबदारीने वागा... जरांगे पाटलांना नितेश राणेंचा सल्ला (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com