भोंदू खरातचा लग्नाचा कारनामा; हळदीच्या वेळी अंगावरचा शर्ट काढत नव्हता, धक्कादायक कारण समोर

Ashok Kharat Wedding Incident Truth: भोंदू अशोक खरातच्या लग्नातील धक्कादायक किस्सा समोर आला आहे. हळदीच्या वेळी अंगावरील शर्ट काढण्यास नकार दिला.
Villagers from Padali recall shocking details from Ashok Kharat’s wedding ceremony.
Villagers from Padali recall shocking details from Ashok Kharat’s wedding ceremony.Saam Tv
Published On

सचिन बनसोडे, साम टीव्ही

भोंदू अशोक खरात याची बायको कल्पना खरात गेली 10 ते 15 वर्षांपासून माहेरी गेलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील पाडळी हे कल्पना खरात हिचे माहेर आहे. अशोक खरात सोबत आलिशान जीवन जगणारी कल्पना खरात हीच्या माहेरची परिस्थिती मात्र हलाखीची आहे. सासरकडच्या गोष्टी कल्पना कधीही सांगत नव्हती अशी माहिती कल्पना हिच्या भावजाई मंगल शिंदे यांनी दिली आहे. तर अंगावर वार असल्याने अशोक खरात हळदीच्यावेळी अंगावरचा शर्ट काढत नव्हता असा खुलास ग्रामस्थांनी केलाय.

Villagers from Padali recall shocking details from Ashok Kharat’s wedding ceremony.
Mumbai Delisle Road Bridge News | अखेर केसरकर करणार डिलाई रोड पुलाचे उद्घाटन | saam tv

33 वर्षापूर्वी अशोक खरात याचा विवाह पाडळी येथील शिंदे कुटुंबातील कल्पना हिच्याशी झाला होता. त्यानंतर ती प्रत्येक वर्षी दिवाळीला फक्त एक दिवस माहेरी यायची. कौटुंबिक कार्यक्रमांसाठी अशोक खरात हा देखील सासुरवाडीला यायचा. 2011 आली सासऱ्याच्या दशक्रिया विधीला तो दोनतास पाडळी गावात हजर होता. कल्पना ही सासरकडील जास्त गोष्टी माहेरी सांगत नव्हती. शांत असलेली कल्पना ही देखील अशोक खरात याच्या मालमत्ता प्रकरणात आरोपी असल्याचे समजल्यावर आम्हाला फेल वाटतंय असं तिच्या भावजई मंगल शिंदे यांनी म्हंटलय.

Villagers from Padali recall shocking details from Ashok Kharat’s wedding ceremony.
Mumbai Pune Expressway accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पुन्हा अपघात, खालापूरजवळ कारचा चेंदामेंदा अन् रक्ताचा सडा, ३ जणांचा मृत्यू

33 वर्षापूर्वी कल्पना हिचा अशोक खरात याच्याशी विवाह झाला.. हळदीच्या वेळी तो अंगावरील शर्ट काढत नव्हता.. बळजबरीने शर्ट काढला तेव्हा त्याच्या अंगावर वार होते.. तेंव्हाच आम्हाला वाटले हा गुंड प्रवृत्तीचा माणूस दिसतोय.. त्याचं लग्न छोटेखानी पद्धतीने झालं होतं.. शिंदे कुटुंबाची परिस्थिती आजही गरिबीची आहे.. अंकशास्त्राच्या माध्यमातून नंतरच्या काळात अशोक खरातचे प्रस्थ खूपच वाढले.. मोठे लोक त्याला बळी पडले, ते देखील दोषी आहेत.. अशोक खरातची संपत्ती शासन जमा व्हावी अशी मागणी पाडळी ग्रामस्थांनी केली आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com