

अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून चौकशी सुरू
ईडीने ३ बँक खाती सील केली
अशोक खरातविरोधात १५ गुन्हे दाखल
अशोक खरात पोलिसांना म्हणतो की माझे मरण इथेच
नाशिचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या एसआयटी तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. चौकशीदरम्यान भोंदू खरात म्हणतो की, 'मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही. माझं मरण इथेच आहे.' अशोक खरातवर आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची रोज एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. दररोज आठ ते दहा तास त्याची चौकशी केली जात आहे. या चौकशींना भोंदू खरात वैतागला असून तो आता मरणाच्या वार्ता करताना दिसत आहे.
अशोक खरातवर महिलांवर लैंगिक अत्याचारासह फसवणूक केल्याप्रकरणी १५ गुन्हे दाखल झाले आहेत. चौकशीत अशोक खरातने फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची सूत्रांची माहिती आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे खरातवर गंभीर आरोप आहेत. भोंदूगिरी करत श्रद्धेचा गैरवापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. अशोक खरातकडून आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांची फसवणूक उघड झाली आहे. एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशातच भोंदू खरात प्रकरणात ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांचे तीन बँक खाते सील केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खरात दाम्पत्यांची संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून त्याने फसवणूक केल्याची शक्यता आहे.
नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील त्याच्या बँक खात्यांची तपासणी ईडीकडून सुरू आहे. कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी केली जात आहे. खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनी लॉन्डरिंग प्रकरणी ईडीकडून अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडी आणि एसआयटीकडून सध्या सतत सुरू असलेल्या चौकशीमुळे खरातची मानसिक स्थिती खालवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तो माझं मरण इथेच असं बोलत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.