

अशोक खरातच्या संस्थेला 1.05 कोटींचा सरकारी निधी दिल्याचा खुलासा
पर्यटन विभागाकडून मंदिर विकासासाठी निधी मंजूर
प्रकरणावरून सरकारवर प्रश्नचिन्ह आणि वाद वाढला
विकृत आणि अघोरी खरातच्या वासनांधतेचं बिंग फुटलं. मात्र याच खरातवर सरकारही मेहेरबान असल्याचं समोर आलंय. खरात तंत्रविद्येच्या नावाखाली ज्या संस्थेत महिलांना आपल्या वासनेची शिकार बनवायचा. त्याच मिरगावच्या ईशान्येश्वर मंदिर परिसराच्या विकासासाठी राज्याच्या पर्यटन विभागानं 2018 मध्ये तब्बल 1 कोटी 5 लाखांचा निधी दिल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.
पर्यटन विभागानं भोंदू खरातच्या ईशान्येश्वर संस्थान परिसरात सभामंडपासाठी 36 लाख 20 हजार, पेव्हर ब्लॉकसाठी 4 लाख 91 हजार, शौचालयासाठी 7लाख 52 हजार, चेंजिंग रुमसाठी 13 लाख 36 हजार, भक्त निवासासाठी 12 लाख 53 हजार, बागेसाठी लँडस्केपिंग करण्यासाठी 4 लाख 38 हजार, लाईटसाठी 8 लाख 75 हजार तर आकस्मिक खर्चासाठी 3 लाख 18 हजार आणि 8 टक्के जीएसटीसाठी 14 लाख 32 हजार रुपये मंजूर केले.
भोंदू खरातच्या संस्थानला निधी मंजूर केला त्यावेळी जयकुमार रावल हे पर्यटन मंत्री होते. त्यामुळे साम टीव्हीने मंत्री जयकुमार रावल यांना गाठलं. आणि याबाबत प्रश्न विचारला. मात्र मंत्री जयकुमार रावल यांनी साम टीव्हीच्या प्रश्नांना उत्तर न देता पळ काढलाय.
खरंतर याच वासनांध खरातने आपलं राजकीय वजन वापरुन निधी मिळवल्याचा हा पहिला प्रकार नाही. तर 2020 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना जलसंपदा खात्याने खरातच्या संस्थानाला दारणा धरणातून पाणी देण्यासाठी स्वतंत्र शासन निर्णय जारी केला.. आणि शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी भोंदू खरातच्या संस्थानला दिलं. त्यामुळे खरातच्या संस्थानला पाणी देणारे अधिकारी, मंत्री असो वा खरातच्या संस्थानला कोट्यवधी देणारे. या सगळ्याचा कर्ता करविता कोण? याचा सखोल तपास करुन जनतेच्या पैशांचा धुव्वा उडवणाऱ्यांवर कारवाई करायला हवी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.