अशोक खरातचं बीड कनेक्शन उघड; पत्रात गर्भलिंगनिदान प्रकरणात रुपाली चाकणककरांचे नाव, खरात फाईल्समध्ये आला नवा ट्विस्ट

Ashok Kharat Beed Connection: बीड कनेक्शन आणि लिंगनिदानाशी संबंधित नव्या आरोपांमुळे अशोक खरात प्रकरणाला नवीन वळण लागले आहे.
Ashok Kharat Case:
Ashok Kharat Beed Connection:saam tv
Published On

अशोक खरातप्रकरणी अद्यापही एसआयटीकडून आरोपीचा कसून तपास केला जात आहे. या तपासातून दररोज नवनवे कारनामे समोर येत आहे. याचदरम्यान नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात गर्भलिंगनिदानाचा नवा ट्विस्ट समोर येत बीड कनेक्शन समोर आले आहे. या नव्या ट्विस्टमध्ये रुपाली चाकणकरांचे नाव पुन्हा समोर आले आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांना बीडमधून निनावी पत्र आले आहे. या पत्रातून बीड कनेक्शन समोर आले आहे.

Ashok Kharat Case:
Ashok Kharat Case : अशोक खरातच्या हवाला रॅकेटचं दुबई कनेक्शन? मोबाईलमधून बाहेर येणार खरातची 'कुंडली', वाचा खास रिपोर्ट

रुपाली चाकणकर यांच्या आशीर्वादाने बीडमधील महिला पदाधिकारी अशोक खरातकडे येथील महिला नेत होत्या, असा खळबळजनक दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गर्भलिंग निदान याबाबत चाकणकरांकडून अशोक खरात पाठराखण केली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या हेमा पिंपळे यांनी केला आहे. पिंपळे यांनी संबंधित पत्राचा दाखलाही दिला आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझा या वृत्ताने दिलंय.

Ashok Kharat Case:
महिलांना स्वत:ची लघवी पाजायचा अन् काचेच्या कॅबिनमध्ये सर्वांसमोरच...; कॅप्टन खरातचा आणखी एक कारनामा उघड

या वृत्तानुसार, बीडमधील डॉक्टरांकडून लिंगनिदान केलं जात होतं, असा गंभीर आरोप पत्रातून करण्यात आला आहे. या पत्रानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या हेमा पिंपळे यांनी पत्राची सत्यता तपासून पोलीस अधीक्षकांनी सुमोटो दाखल करत एसआयटीकडे हे पत्र द्यावे, याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा लिंगनिदान होण्यासाठी पाठबळ देत होत्या.

ही गंभीर बाब असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. संबंधित पत्रावरील सहीची तपासणी केली तर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचता, येईल म्हणून त्याची सत्यता तपासण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान अशोक खरातकडे बीडमधील महिला जात होत्या अशी चर्चा आतापर्यंत बीडमध्ये होती. परंतु या पत्रातून त्याला उजाळा मिळाला असल्याचं पिंपळे यांचं म्हणणं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com