- जितेश कोळी
Uday Samant News : आमचं म्हणणं सरकार पर्यंत पाेहचत नाहीये. त्यामुळं आम्ही व्यथित झालाे आहेत. त्यातूनच रागाच्या भरात माझ्याकडून उदय सामंत यांच्याबाबत झालेल्या वक्तव्याबाबत मी सांमत यांची जाहीर माफी मागताे असे रिफायनरीला विराेध करणा-या बारसू रिफायनरी सोलगव समितीचे सरचिटणीस नरेंद्र जोशी (Narendra Joshi) यांनी नमूद केले. मंत्री सामंत यांना जाळून मारु असे वक्तव्य जाेशी यांनी रविवारी केले हाेेते. त्यानंतर त्यांची पाेलिस (police) चाैकशी व्हावी अशी मागणी सामंत समर्थकांनी केली हाेती.
जाेशी म्हणाले काल (रविवार) गोवळ येथे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) आले होते. त्यावेळी सभे दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबाबत माझ्याकडुन जे काही वक्तव्य झाले त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना दुखावण्याचा कोणताच प्रयत्न नव्हता.
दरम्यान आमच्या भावना सरकार पर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे रागातून ते शब्द बाहेर पडले. माझा तसा काेणताही हेतू नाही असेही बारसू रिफायनरी सोलगव समितीचे सरचिटणीस नरेंद्र जोशी यांनी नमूद केले. मंत्री उदय सामंत यांची माफी मागित असल्याचा एका व्हिडीओ देखील त्यांनी प्रसार माध्यमांना पाठविला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.