अमर घटारे, साम टीव्ही
Sambhaji Bhide Controversial Audio Clip Inquiry: शिवप्रतिष्ठान स्वराज्य संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे यांना नोटीस धाडली आहे. इतकंच नाही तर, भिडे यांच्या आवाजाची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार आहे.
संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानाचे पडसाद राज्यभरात उमटले. संभाजी भिडे यांच्याविरोधात काँग्रसने आक्रमक पवित्रा घेतला. त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी देखील करण्यात आली.
दरम्यान, अमरावती येथील राजापेठ पोलिसांनी संभाजी भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भिडे यांना नोटीस देखील पाठवली असल्याची माहिती आहे. संभाजी भिडे यांच्या आवाजाची फॉरेन्सिक तपासणी देखील केली जाणार आहे.
वादग्रस्त ऑडिओ क्लिप संभाजी भिडे यांच्या आवाजाची आहे का? यासाठी भिडे यांच्या आवाजाचे सॅम्पल घेऊन फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे. संभाजी भिडे यांना नोटीस पाठवणे हा पोलीस तपासाचा एक भाग आहे. व्हायरल ऑडिओक्लिपची तपासणी करण्याचं काम सुरू आहे, असं अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.
दरम्यान, संभाजी भिडे यांच्याविरोधात शिर्डीतही गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. संभाजी भिडे यांनी साईबाबांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे साईभक्त देखील आक्रमक झाले आहेत. साई मंदिर ट्रस्टचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी शिरडी पोलीस स्टेशनमध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात ipc 295 (अ) 153 (अ) 500 अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.