Accident : लग्नाला जाताना कुटुंबावर काळाचा घाला, ३ जणांचा जागीच मृत्यू, अमरावातीत भीषण अपघात

Amravati accident Death Toll News : अमरावती जिल्ह्यातील वरूड-मोर्शी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Amravati accident Death Toll News
Amravati accident Death Toll NewsSaam tv
Published On

अमर गटारे , अमरावती प्रतिनिधी

Amravati road accident family killed Varud Morshi highway : अमरावती जिल्ह्यातील वरूड ते मोर्शी राष्ट्रीय महामार्गावर खडका फाट्याजवळ एक हृदयद्रावक अपघात घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. समाधान नांदे, किरण नांदे आणि तीन वर्षीय चिमुकली दिया नांदे या तिघांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. तर गोपाळ नांदे हे गंभीर जखमी झाले असून सुदैवाने त्यांचा जीव वाचला आहे.

नांदे कुटुंबातील हे चौघेही नागपूर येथून एका लग्न समारंभासाठी जात असताना, वरूड तालुक्यातील खडका फाट्याजवळ त्यांच्या वाहनाने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडक दिली. अपघातातील कुटुंब हे विनायक कॉलनी, कामठी खैरी, जि. नागपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातामुळे नांदे कुटुंब पूर्णतः उद्ध्वस्त झाले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Amravati accident Death Toll News
धक्कादायक! बँकेला मृत्यूचा पुरावा हवा होता, भाऊ चक्क बहि‍णीचा सांगाडाच घेऊन आला, नेमकं झालं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन धडकली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की वाहनाचा चक्काचूर झाला. आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात हलवले.

Amravati accident Death Toll News
Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रति तोळा इतक्या रूपयांवर आले, वाचा 24k, 22k, 18k सोन्याचे दर

गंभीर जखमी असलेल्या गोपाळ नांदे यांच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावतीला हलवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Amravati accident Death Toll News
नमाज पढता येतो का? मुंबईत पहलगामसारखा हल्ला; २ जणांवर चाकूने सपासप वार, ISIS कनेक्शन ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com