गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाकडून भाजपच्या आमदाराच्या हत्येची सुपारी; अंबादास दानवेंनी फोडला बॉम्ब

Ambadas Danve Statement On Girish Mahajan: अंबादास दानवे यांनी नांदेड दौऱ्यात खळबळजनक आरोप केला आहे. नाशिकच्या माजी नगरसेवकाने भाजप आमदाराला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा दावा त्यांनी करत राजकारणात एकच खळबळ उडवली आहे.
Ambadas Danve during his Nanded tour where he made shocking allegations about a murder supari involving a Nashik ex-corporator.
Ambadas Danve during his Nanded tour where he made shocking allegations about a murder supari involving a Nashik ex-corporator.Saam Tv
Published On
Summary

अंबादास दानवे यांनी नांदेड दौऱ्यात मोठा राजकीय बॉम्ब फोडला.

नाशिकच्या माजी नगरसेवकावर भाजप आमदाराला ठार मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप.

या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही असल्याचे दानवे यांनी सांगितले.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, राजकीय वर्तुळात खळबळ.

ठाकरे गटाचे नेते तथा विधानपरिषदेचे माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी नांदेड दौऱ्यावर असताना मोठा राजकीय बॉम्ब फोडला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे हे उद्यापासून पुन्हा एकदा मराठवाडा दौरा करणार आहेत. राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते.

Ambadas Danve during his Nanded tour where he made shocking allegations about a murder supari involving a Nashik ex-corporator.
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, भाजपला धक्का, हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

या नुकसानीची पाहणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांनंतर सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यांवधीचे पॅकेज जाहीर केले. मात्र हे कितपत शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचले या सगळ्याची माहिती घेण्यासाठी ठाकरे हे उद्यापासून शेताच्या बांदावर जाऊन विचारपूस करणार आहे.

Ambadas Danve during his Nanded tour where he made shocking allegations about a murder supari involving a Nashik ex-corporator.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹१५०० जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला आले की नाही? अशा पद्धतीने करा चेक

यावरच मंत्री गिरीश महाजन यांनी टीकास्त्र सोडले होते. ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी घराची पायरी देखील ओलांडली नाही. पंढरपूरला स्वतःच गाडी चालवत गेले आणि पर्यटन करून आले अशी टीका महाजन यांनी केल्यानंतर अंबादास दानवे यांनी जोरदार प्रहार करत एकच खळबळ माजवली.

Ambadas Danve during his Nanded tour where he made shocking allegations about a murder supari involving a Nashik ex-corporator.
Maharashtra Politics: हर्षवर्धन पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर? भरसभेत मुख्यमंत्री,पंतप्रधानांचे गायले गोडवे

दानवे नेमके काय म्हणाले?

गिरीश महाजन यांचा नाशिकमधील समर्थक असलेल्या एका माजी नगरसेवकाने भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराला मारण्याची सुपारी दिली. या प्रकरणाची माहिती राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना असल्याचेही संबंधित दानवे यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, गिरीश महाजन यांच्या समर्थन करणाऱ्या नाशिकच्या एका माजी नगरसेवकाने भाजप आमदाराला ठार मारण्याची सुपारी दिली आहे.

दोघांची नावे मला माहित आहेत, पण सध्या ती उघड करत नाही. याचा तपास सरकारने करावा. अशी खळबळजनक माहिती दानवे यांनी दिली. दानवे यांचा व्हिडिओ नाशिकच्या अनेक सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com