Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार, भाजपला धक्का, हिंगोलीत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

Hingoli NCP leaders join to Shinde Sena : संतोष बांगर यांनी हिंगोलीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत खिंडार पाडले आहे. पक्ष प्रवेशावेळी भाजप राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधकांकडे भोपळा असल्याचं वक्तव्य त्यांनी केलेय.
Jalna Politics:
Ajit Pawar Saam tv
Published On

संदीप नागरे, हिंगोली प्रतिनिधी

Ajit Pawar ncp suffers setback in Maharashtra : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी युती झाली नाही, त्या ठिकाणी मित्रपक्षांसोबत मैत्रीपूर्ण लढत होतील, असे महायुतीकडून सांगण्यात आले होते. पण हिंगोलीमध्ये संजय संतोष बांगर यांनी यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. हिंगोलीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पाडत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना हिंगोली पालिकेत शिवसेनेची ताकद किती वाढली, याचा दाखला देत मित्रपक्षांकडे भोपळा शिल्लक असल्याचं वक्तव्य केलं.

हिंगोली शहरातील 17 पैकी 13 प्रभागात शिवसेनेकडे मोठी ताकद असल्याचं देखील यावेळी बांगर म्हणाले. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यांची अवस्था तिकडे काय होती हे न सांगितलेलं बरं असं देखील बांगर म्हणाले. दरम्यान संतोष बांगर यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. सोमवारी रात्री हिंगोलीमध्ये शिवसेनेत पक्ष प्रवेश झाले. यावेळी संतोष बांगर यांनी टीकेचा बाण सोडला.

Jalna Politics:
बॉयफ्रेंडसोबत मुलगी कारमध्ये रात्री गप्पा मारत होती, ३ जणांनी किडनॅप केले, अन् सामूहिक बलात्कारानंतर...

संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हिंगोली शहरातील जवाहर रोड परिसरात रात्री पक्ष प्रवेश आयोजित करण्यात आला होता. या पक्षप्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष केशव दुबे, माजी नगरसेवक गोपाल दुबे यांच्यासह राष्ट्रवादी महिला शहर अध्यक्ष अन्नपूर्णा ताई चौधरी, सागर माने, सागर चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या पक्ष प्रवेशामुळे हिंगोलीमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढली आहे. याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.

Jalna Politics:
Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

दरम्यान हिंगोली नगरपरिषदेसाठी संतोष बांगर यांनी सुरुवातीपासून स्वबळाचा नारा देत या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील महत्त्वाची नगरपालिका असलेल्या हिंगोली पालिकेत संतोष बांगर यांनी आपले मोठे बंधू श्रीराम बांगर यांच्या पत्नीला उमेदवारी देखील घोषित केली आहे. या निवडणुकीसाठी संतोष बांगर यांनी मोर्चेबांधणी करताना काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादीसह ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत मित्र पक्षांना देखील फैलावर घेतलं. त्यामुळे आता मित्र पक्षांकडून संतोष बांगर यांना कसा शह देण्यात येतो, हे पहावं लागणार आहे.

Jalna Politics:
Vande Bharat Express: गुड न्यूज! ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरू, वाचा कुठून कुठे धावणार, काय असेल मार्ग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com