Vande Bharat Express: गुड न्यूज! ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस होणार सुरू, वाचा कुठून कुठे धावणार, काय असेल मार्ग?

4 New Vande Bharat Routes Approved, Check Full List : भारतीय रेल्वेकडून ४ नव्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी देण्यात आली आहे. बेंगळुरू-एर्नाकुलम, फिरोजपूर-दिल्ली, वाराणसी-खजुराहो आणि लखनौ-सहारनपूर या मार्गांवर गाड्या धावणार आहेत.
Kokan Vande Bharat
Kokan Vande BharatSaam Tv
Published On

Indian Railways to Launch 4 New Vande Bharat Express Trains : भारतीय रेल्वेमध्ये नवा अध्याय ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आता आणखी वाढणार आहे. भारतीय रेल्वेकडून (Indian Railways) नव्या चार वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवास आरामदायी, सूकर आणि वेगवान होणार आहे. या चार वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय मंत्रालयाकडून मंजूरी मिळाली आहे. लवकरच या वंदे भारत एक्सप्रेसबाबत अधिकृत माहिती समोर येणार आहे. या ४ वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यानंतर देशालीत एकूण वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या १६४ होणार आहे.

४ नव्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या उद्घाटनाची तारीख लवकरच जाहीर कऱण्यात येणार आहे. रेल्वेकडून वंदे भारत एक्सप्रेसच्या लाँचिंगची तयारी करण्यात येत आहे. बेंगळुरू-एर्नाकुलम, फिरोजपूर कँट-दिल्ली, वाराणसी-खजुराहो आणि लखनौ-सहारनपूर या मार्गावर नव्या वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहेत. या नव्या वंदे भारत एक्सप्रेसचा फायदा कर्नाटक, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे प्रवेसा कऱणाऱ्यांना जास्त होणार आहे.

Kokan Vande Bharat
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, बँक खात्यावर आजपासून ₹१५०० खटाखट जमा होणार, बॅलेन्स चेक करा

कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस?

बेंगळुरु-एर्नाकुलम

फिरोजपुर कँट-दिल्ली

वाराणसी-खजुराहो

लखनौ-सहारनपुर

वंदे भारत एक्स्पेसची लोकप्रियता देशात दिवसागणिक वाढतच आङे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये वंदे भारत एक्सप्रेसची सरासरी ऑक्यूपेंसी 102.01 टक्के इतकी राहिली आहे. सुरू असलेल्या आर्थिक वर्षांपासून म्हणजेच २०२५-२६ मध्ये(जूनपर्यंतच) ऑक्यूपेंसी 105.03 पर्यंत पोहचली आहे.

Kokan Vande Bharat
Cyclone Alert : पुन्हा आस्मानी संकट! 'मोंथा'नंतर आणखी एका चक्रीवादळाचं सावट, महाराष्ट्रावर होणार परिणाम, IMD चा गंभीर इशारा

वंदे भारतमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात ?

नवी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अनेक मॉडर्न सोयी-सुविधा मिळतात. कवच सुरक्षा प्रणाली, आरामदायी प्रवास, ऑटोमॅटिक डोर सिस्टम, अपंग प्रवाशांसाठी विशेष शौचालयाची सुविधा देण्यात येते. नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या सुरू केल्याने प्रवाशांना जलद, आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळेल. त्याशिवाय भारतीय रेल्वेच्या आधुनिक तंत्रज्ञानावर जनतेचा विश्वास आणखी वाढेल.

Kokan Vande Bharat
Mumbai : नरीमन पॉईंट ते विरार फक्त ३५ मिनट, कोस्टल रोड प्रोजेक्टवर मोठी अपडेट

वंदे भारत एक्सप्रेसची वैशिष्ट्ये

कवच सिस्टममुळे सुरक्षित प्रवास

१८० किमी/ताशी वेग

१६० किमी/ताशी ऑपरेटिंग स्पीड.

जर्क-फ्री कपलर

स्वयंचलित प्लग दरवाजा

सर्व कोचमध्ये सीसीटीव्ही, आपत्कालीन अलार्म.

अग्निसुरक्षेसाठी एयरोसोल सिस्टम

अपंगांसाठी खास शौचालये

ड्रायव्हर-गार्ड कम्युनिकेशन आणि क्रॅश मेमरी

कोच मॉनिटरिंग सिस्टम.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com