

कोणताही व्यावसायिक दुकानांमध्ये विक्रीसाठी रंग, पिचकारी ठेवत नाही.
होळीच्या दिवशी गावात केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन
पुरणपोळी सारखे गोडधोड पदार्थही केले जात नाहीत
दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होलिका दहन केलं जाते. हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. देशभरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी, रंगांचा सण धुलिवंदन साजरा केले जाते. सोमवारी देशातील अनेक भागात होलिका दहन करण्यात आले. पण महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात एक असं गाव आहे जेथे ७५ वर्षांपासून होळी पेटवण्यात आली नाहीये, ना येथे कोणी रंगपंचमी खेळली आहे.
राज्यात होलिका दहन नंतर रंगपंचमी वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद गावात गेल्या ७५ वर्षांपासून होळीचा सण साजरा करण्यात आला नाहीये, ना येथे रंगपंचमी खेळण्यात आली. इतकेच नाही घरात पुरणपोळी सारखे गोडधोड पदार्थही केले जात नाहीत. ना गावातील कोणत्याही दुकानांमध्ये विक्रीसाठी रंग, पिचकारी ठेवली जाते. होळी का साजरी केली जात नाही. नेमकं कारण का आहे? हे जाणून घेण्याचं कुतूहल तुम्हाला जसे आहे, तसेच आम्हाला होते. या कुतूहलापोटी गावातील लोकांशी चर्चा केली. त्यावेळी एक अनोखं कारण गावकऱ्यांनी सांगितलं.
पिंपळोद गावचे आराध्य दैवत परमहंस संत परसराम महाराज आहेत, त्याची शिकवणीमुळे येथील गावकरी होळी आणि रंगपंचमी साजरे करत नाहीत. १९५१ साली होळी पोर्णिमेला परमहंस संत परसराम महाराज याचे देहावसान झाले. त्या दिवसापासून या गावात होळी, रंगोत्सव साजरा केला जात नाही. होळीच्या दिवशी गावात केवळ धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते परंतु होळी खेळली जात नाही.
आयटीआय महाविद्यालय पिंपळोदचे प्राचार्य राजेश वाघजाळे, याबाबत माहिती दिली की, १९५१ साली गावाचे आराध्य दैवत परमहंस संत परसराम महाराज यांचे निधन झाले होते. त्यावेळी होळी पोर्णिमा होती. तेव्हापासून गावकरी होळी आणि रंगपंचमी खेळत नाही. होळीच्या दिवसापासून परसराम महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू झाला आहे. यंदाचा ७५ वा पुण्यतिथी महोत्सव आहे. गेल्या ७५ वर्षापासून गावकरी होळी पेटवत नाहीत ना रंगाचे खेळतात. पण पुण्यतिथी महोत्सवाच्या काळाथ धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाते.
कौस्तुभ घोम गावतील एक तरुण आहे, त्याने दिलेल्या माहितीनुसार, गावकरी फक्त हरिनामाची होळी खेळली जाते. ७५ वर्षापासून होळी आणि रंगपंचमी खेळली जात नाही. आम्हाला होळी काय असते आणि रंगपंचमी काय असते, हे सुद्धा माहिती नाहीये. परमहंस संत परसराम महाराज यांनी पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला होता. गावातील दुकानदार सुद्धा पिचकारी किंवा रंग विक्रीला ठेवत नाहीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.