Akola
Akolasaam

Akola News: शाळेतील कर्मचाऱ्याकडून १० विद्यार्थीनींचा विनयभंग; अकोल्यात खळबळ

Minor Girl Students Molested by School Employee: शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने तब्बल १० चिमुकल्या विद्यार्थीनींचा विनयभंग केला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
Published on

अक्षय गवळी, साम टीव्ही

बदलापुरातील अक्षय शिंदे प्रकरणाची पुनरावृ्ती अकोल्यात झाली आहे. शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने तब्बल १० चिमुकल्या विद्यार्थीनींचा विनयभंग केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना अकोला शहरातल्या कौलखेड भागातील एका शाळेत घडली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शाळेतील काही महिला शिक्षिका प्रशिक्षणासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. ५ मार्चपासून शिक्षिका शाळेत उपस्थित नव्हत्या. यावेळी शाळेचे कामकाज सांभाळण्याची जबाबदारी शाळेतील एका कर्मचाऱ्यावर पडली. हेमंत चांदेकर या आरोपी कर्मचाऱ्याचे नाव आहे. याच परिस्थितीचा फायदे घेत आरोपीने शाळेतील दहा विद्यार्थिनींचा विनयभंग केला आहे.

Akola
Shri Siddhivinayak: आता मुलींच्या खात्यात १० हजार खटाखट जमा होणार, काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना?

हे दहा विद्यार्थिनी इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने परिस्थितीचा फायदा घेत शारीरिक लगट करत विद्यार्थीनींचा विनयभंग केला आहे. शाळेतील शिक्षिका प्रशिक्षण आटोपून आल्यानंतर विद्यार्थीनींनी सगळा प्रकार शिक्षकांच्या कानावर घातले. तसेच आरोपी कर्मचाऱ्याने काय काय कृत्य केले, सगळी माहिती दिली.

Akola
Dharashiv: प्रायव्हेट फोटो अन् ब्लॅकमेल, कळंब हत्या प्रकरणातील महिलेचा मृत्यू अनैतिक संबंध आणि..

यानंतर शिक्षकांना संताप अनावर झाला. त्यांनी कर्मचाऱ्याने केलेल्या कृत्याची माहिती शाळेच्या संचालकांना दिली. संचालकांनी या प्रकाराची तक्रार लगेच चाईल्ड हेल्पलाइनला केली.

याप्रकरणी जिल्हा व महिला बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या चाइल्ड हेल्पलाइनच्या महिला समन्वयक हर्षाली गजभिये यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपीला अटक केली. सध्या आरोपी चांदेकरची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com