Shri Siddhivinayak: आता मुलींच्या खात्यात १० हजार खटाखट जमा होणार, काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना?

New Scheme for Women in Maharashtra: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. आता श्री सिद्धिविनायक ट्रस्टची ‘भाग्यलक्ष्मी योजना’ लवकरच सुरू होणार.
Siddhivinayak temple
Siddhivinayak templeSaam Tv News
Published On

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यात सुपरहिट ठरली. अवघ्या काही महिन्यातच या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा १,५०० रूपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेसह सरकारच्यावतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली. या योजनेतून मुलीच्या पालकांना ५० हजार रूपयांचे अनुदान शासनतर्फे देण्यात येते. अशातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे गरजू महिलांसाठी नवीन योजना राबविण्यात येणार आहे.

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना असे योजनेचे नाव असून, या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिली आहे. लवकरच याचा फायदा गरजू महिलांना होणार आहे.

Siddhivinayak temple
Beed: धसांचे आरोप गंभीर, उच्चस्तरीय चौकशी करा; भाजप आमदारासाठी काँग्रेस नेते आले धावून, म्हणाले..

योजना नक्की कुणासाठी?

राज्यात लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू होणार आहे. या योजनेचा लाभ ८ मार्च म्हणजेच (आंतरराष्ट्रीय महिला दिन) रोजी जन्मलेल्या मुलींना मिळणार आहे. राज्यातील शासकीय रूग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या नावाने १० हजार रूपयांचे फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे. ही रक्कम त्यांच्या मातांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

Siddhivinayak temple
Dharashiv: प्रायव्हेट फोटो अन् ब्लॅकमेल, कळंब हत्या प्रकरणातील महिलेचा मृत्यू अनैतिक संबंध आणि..

न्यास समितीकडून या अभिनव योजनेस मंजूरी देण्यात आली आहे. शासनाच्या मान्यतेनंतर योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. शासनाच्या मान्यतेनंतरच या योजनेसाठीचे निकष लवकरच जाहीर करण्यात येईल, अशी माहिती श्री सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे.

श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की, श्री सिद्धिविनायक न्यासाच्या उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. सरत्या आर्थित वर्षात ट्रस्टला १३३ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. आता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा १५ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली आहे, असे सदा सरवणकर म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com