Crime: अकोला हादरले! आधी गळा दाबून बायकोची हत्या, नंतर तरुणाने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Akola Crime: अकोल्यात नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. किरकोळ वादातून बायकोची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळला. या घटनेमुळे अकोला हादरले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली.
Crime: अकोला हादरले! आधी गळा दाबून बायकोची हत्या, नंतर तरुणाने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला;
Akola CrimeSaam TV Marathi
Published On

Summary -

  • अकोल्यात नवऱ्याने बायकोची हत्या केली

  • हत्येनंतर मृतदेह पेट्रोल टाकून जाळला

  • पोलिसांनी आरोपी नवऱ्याला केली अटक

  • ८ दिवसांपूर्वीच महिलेला झाले होते बाळ

अक्षय गवळी, अकोला

अकोल्यात अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. २ दिवसांत अकोला पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासे उघड झाले आहेत. रविना पवार (२४ वर्षे) असं या मृत तरुणीचे नाव होते. रविनाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. आधी गळा आवळून आणि नंतर पेट्रोल टाकून तिचा मृतदेह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तिचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह अकोल्यात अन्नपूर्णा मंदिर परिसरातआढळून आला होता. या घटनेने अकोला जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती.

रविना पवारची हत्या तिच्याच नवऱ्याने केली असल्याचे अकोला पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. हा प्रकार लव्ह जिहादमधून घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयीत आरोपी सादीक शहा तसरीफ शहा याला अटक केली. अकोल्याच्या डाबकी रोड पोलिसांनी ही कारवाई केली. रवीना पवार आणि आरोपी सादीक शहा या दोघांचं प्रेम होतं आणि त्यातून दोघांचं लग्न झालं होतं. दोघेही वाशिम जिल्ह्यात राहत होते. पुढं रवीना गरोदर राहिली आणि ती प्रसूतीसाठी अकोल्यात आली होती. तिने मुलाला जन्म दिला पण बाळ होताच ८ दिवसांत तिची हत्या करण्यात आली.

Crime: अकोला हादरले! आधी गळा दाबून बायकोची हत्या, नंतर तरुणाने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला;
Crime: १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, घरी जाताना अपहरण करत फ्लॅटवर नेलं अन्...; पीडितेचा आत्महत्येचा प्रयत्न

रविना आणि तिच्या नवऱ्यात सतत भांडण व्हायचं. ६ एप्रिल रात्री देखील दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झालं आणि त्याचवेळी सादिक शहा याचा राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने रविनाची गळा आवळून हत्या केली. आरोपी ऐवढ्यावर न थांबता त्याने मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून पेट्रोलने मृतदेह जाळला. अगदी किरकोळ कारणातून त्याने बायकोला कायमचं संपवत हा कट रचला.

Crime: अकोला हादरले! आधी गळा दाबून बायकोची हत्या, नंतर तरुणाने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला;
Crime News: लग्नानंतर पहिल्या रात्री बायकोला कुशीत घेताच बसला धक्का; नवरा थेट पोहोचला पोलीस स्टेशनमध्ये

दरम्यान बाप तरुंगात गेला तर आई कायमची दुरावली यामुळे ८ महिन्यांचे बाळ पोरकं झालं. त्याच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपलं. या घटनेमुळे अकोल्यात खळबळ उडाली. तर दुसरीकडे बाळासाठी सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. दरम्यान, रवीना पवारची फसवणूक करून तिची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

Crime: अकोला हादरले! आधी गळा दाबून बायकोची हत्या, नंतर तरुणाने पेट्रोल टाकून मृतदेह जाळला;
Mumbai Crime: 122 कोटींच्या बँक घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई; 16.95 कोटींची मालमत्ता जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com