अकोल्यातील तेल्हारा तालुक्यात भीषण अपघात
भरधाव आयशर ट्रकने तीन शाळकरी मुलांना दिली धडक
मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश
पोलिसांनी वाहन जप्त करून गुन्हा दाखल केला
अक्षय गवळी, अकोला
Akola Malegav Bazar Three Student Killed By Eicher Truck Hit अकोल्यात एका भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने ३ शाळकरी मुलांना जोरदार धडक देऊन भीषण अपघात झाला. या अपघतात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या तिघांमधील दोघे जण सख्खे भाऊ असल्याची बातमी आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या मुलांची नाव साई रामेश्वर वैष्णव ( वय १३ ), दर्शन रामेश्वर वैष्णव (वय १६), गणेश दिपक अप्तुरकार (वय १७) अशी आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना तेल्हारा तालुक्यातील, माळेगाव बाजार रोडवर दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे. तिघेही शाळकरी विद्यार्थी असून त्यांची दुचाकी बंद पडल्याने ते दुचाकीजवळ उभे होते. यादरम्यान भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकच नियंत्रण गमावल्याने मुलांना जोरदार धडक दिली.
या धडकेत तिघांचाही मृत्यू झाला. मृतांमध्ये दर्शन आणि साई हे सख्खे भाऊ होते. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबार दु:खाचा डोंगर पसरला आहे. या घटनेने माळेगाव बाजार परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
संबंधित आयशर वाहन जप्त करण्यात आले असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाची फिर्याद तेल्हारा पोलिस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.अपघाताचे नेमके कारण काय, वाहनाचा वेग किती होता आणि चालकाची चूक कितपत होती ,याचा सखोल तपास सुरू आहे. दरम्यान वारंवार होणाऱ्या या अपघातामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.