नागपूरमध्ये ८ वर्षीय मतिमंद मुलीवर वडिलांकडून लैंगिक अत्याचार
अश्लील व्हिडिओ देखील दाखवायचा
मानकापूर पोलिसांकडून तपास सुरु
वडील आणि आजोबांना अटक
पराग ढोबळे, नागपूर
नागपुरात बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ४१ वर्षीय एका व्यक्तीने पोटच्या ८ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून याप्रकणी पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ पर्यंत मुलीवर अत्याचार झाल्याचे वृत्त आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी ८ वर्षांची असून मतिमंद आहे. तिच्यावर जन्मदात्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केले. इतकचं नाही तर पीडितेला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवले. तिच्यावर अमानुष अत्याचार केले.
याप्रकरणी पीडितेच्या आईने तिच्या सासऱ्यांना घडलेला प्रकार सांगितला, मात्र त्याने देखील तिला धमकावलं आणि मारहाण केली. यानंतर पीडित मुलीची आई घाबरली म्हणून तिने पोलिसांत तक्रार दाखल केली नाही. परंतु नराधम बाप तरीही गप्प बसला नाही. अखेर महिलेने हिंमत दाखवत नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.
महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम बाप आणि आजोबांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पॉक्सो कायदा, २०१२ च्या तरतुदींसह - विशेषतः कलम ४, ६, ८ आणि १२. या कलमांमध्ये अल्पवयीन मुलांविरुद्ध गंभीर लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ आणि संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे,ज्यामध्ये पीडितेच्या शारीरिक अपंगत्वामुळे वाढीव शिक्षा देखील समाविष्ट आहेत.याघटनेने नागपुरात खळबळ उडाली असून मुलगी जन्मदात्या वडिलांच्या कुशीत सुरक्षित नसल्याचं पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.