sharad pawar news
Sharad Pawar Saam tv

Ajit Pawar Death : हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही; अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, पाहा VIDEO

sharad pawar on ajit pawar Death : राज्याचं झालेलं नुकसान भरून निघणारं नसल्याची भावना शरद पवारांनी व्यक्त केली.
Published on
Summary

अजितदादांच्या निधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याची भावना शरद पवारांनी व्यक्त केली

महाराष्ट्राचं कधीही भरून न निघणारे नुकसान झाल्याचे शरद पवार म्हणाले

प्रतिक्रिया देतााना शरद पवारांचा कंठ दाठला

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे. अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवारांच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही, असे शरद पवारांनी सांगितले.

बारामतीत अजित पवारांचा सकाळी पावणे दहाच्या सुमारास अपघात झाला. अपघातानंतर काही वेळेनंतर अजित पवारांच्या निधनाची वार्ता सर्वत्र पसरली. अजित पवारांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. अजित पवारांचा अपघात झाला, त्यावेळी पवार कुटुंबीय दिल्लीत होते. ते अधिवेशनासाठी दिल्लीला गेले होते. अजित पवारांच्या मृत्यूची वार्ता कळताच पवार कुटुंबीय बारामतीला पोहोचले.

sharad pawar news
अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स

बारामतीत पोहोचल्यानंतर शरद पवारांनी रुग्णालयात अजित पवारांचं पार्थिव पाहिला. अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांचाही कंठ दाटल्याचे दिसून आले. शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, 'हा खूप मोठा धक्का आहे. महाराष्ट्राला जे नुकसान झालं, ते भरून निघणार नाही. यामध्ये कुठलेही राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. या घटनेचं कोणीही राजकारण करू नका'.

sharad pawar news
भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

अजित पवारांवर उद्या अंत्यसंस्कार होणार

अजित पवार यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठान विद्यानगरी चौक येथील मैदानात ठेवण्यात आलं आहे. अजित पवारांच्या पार्थिवाचे रात्री उशिरापर्यंत नागरिकांना दर्शन घेता येणार आहे. गदिमा सभागृहापासून उद्या सकाळी अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. पार्थिव हे गदिमा चौक, विद्यानगरी चौक पुढे विद्या प्रतिष्ठानच्या आतील रस्त्याने मैदानावर नेण्यात येईल. त्यानंतर विद्याप्रतिष्ठान येथील मैदानावर सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com