अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स

ajit pawar death : अजित पवारांच्या अपघाती मृत्यूने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अपघातानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स
Published On
Summary

बारामतीत अपघातस्थळी माळरानावर कागदपत्रे आणि फाइल्स विखुरलेल्या अवस्थेत दिसताहेत

अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते

अपघातस्थळावरील फोटो आणि व्हिडिओमुळे संपूर्ण महाराष्ट्र भावुक झालाय.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजूबाजूला नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा असायचा. कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हाकेला धावणारा लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. गर्दीतही एखाद्या व्यक्तीने कामासाठी अर्ज दिला, तर अर्ज स्वीकारल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांना कामाचे निर्देश द्यायचे. अजित पवार शेवटचा विमान प्रवास करताना त्यांच्याकडे फाइल्स आणि कागदपत्रे होती. अपघातानंतर माळरानावर कागद आणि फाइल्स जमिनीवर पडलेल्या दिसल्या. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फोटो अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते, याची साक्ष देतोय.

अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स
भाजप मंत्र्याच्या मुलाचा माज, कारने अनेकांना उडवलं; नंतर जमलेल्या स्थानिक लोकांवर पिस्तुल ताणली

अजित पवारांना कामाची प्रचंड उरक होती. प्रशासनावर त्यांचा आदरयुक्त दरारा होता. शब्दांचा पक्का म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती. अजित पवार पहाटेपासून कामाला सुरुवात करायचे. अजित पवार पहाटे ते रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांची कामे मार्गी लावण्यात व्यग्र असायचे.

अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देणारं दृश्य, माळरानावर पडलेले कागद अन् फाइल्स
बारामती अपघातात अजित पवारांसह ५ जणांचा मृत्यू; पायलट शांभवी पाठक कोण होत्या?

राज्यातील मंत्रिमंडळात विविध मंत्रिपदे हाताळताना त्यांच्या कामातली स्पष्टता आणि वेळेचे नियोजन धक्क करणारे होते. कामातील दिरंगाई खपून घेत नसतं. यामुळे त्यांनी कामाचा माणूस म्हणून जनमाणसात ओळख निर्माण केली होती. एका भाषणात अजित पवार हे लोकांना म्हणाले होते, 'जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना... तोपर्यंत तुमचं भलंच करीन. बाकी काही करणार नाही. मी काम करून दाखवेल. मी कामाचा माणूस आहे. मी कामाचाच माणूस आहे'. अजित पवारांचा त्या भाषणाचाही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.

अपघातानंतर विमान माळरानावर कोसळलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी तातडीने मदतीला धावले. त्यावेळी त्यांना तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर विमानाचे दोन तुकडे झाले होते. त्यावेळी अजित पवारांजवळील कागदपत्रे आणि फाइल जमिनीवर पडल्याचे दिसत आहे. त्यामुळे अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असल्याचे दिसून येताहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com