
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरीजा व्यास यांचं निधन झालं. पूजेदरम्यान साडीला आग लागली होती. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भंडाऱ्यात आज पाचव्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली. प्रचंड उकडा निर्माण झालेला असताना पुन्हा एकदा मध्यम स्वरूपाच्या पावसान हजेरी लावल्यान वातावरणात गारवा निर्माण झालंय. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. वादळी वाऱ्यान काही घरांवरील तीन पत्रे उडालीत तर, आंबा पिकाचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
डोंबिवली रेल्वे पोलिसांची कारवाई
भोळा भाबडा चेहरा बनवून महिला रेल्वे प्रवाशांचे रोकड दागिने चोरणारी सराईत महिला चोर गजाआड
महागडा मोबाईल आणि रोकड जप्त
सुरतहून मुंबईत गुटख्याची तस्करी करण्यात आली
लाखोंचा गुटखा कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात.
गुटखा तस्करी प्रकरणे कस्तुरबा मार्ग पोलिसांनी दोघांना केली अटक
ट्रकमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.
गाई-म्हशींच्या ट्रकमध्ये लपवून गुटख्याची करायचे तस्करी
याप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे.
अटक आरोपी सध्या कस्तुरबा मार्ग पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस कसून तपास करत आहेत.
शिर्डीतील रिंग रोड लगत असणाऱ्या दत्त मंदिरात असणाऱ्या मुर्तींच्या विटंबनेचा प्रकार समोर आलाय.. अज्ञात व्यक्तीने मंदिरात घुसून दत्त मूर्ती, हनुमान मूर्ती तसेच साई बाबांच्या फोटोची विटंबना केल्याची घटना समोर आली आहे.. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत तपास सुरू केलाय.. मात्र देवांची मूर्ती आणि फोटोची विटंबना झाल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त करत धार्मिक भावना दुखावणाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
पाकिस्तानबरोबर आता युद्ध व्हायला पाहिजे. आता वेळ आली आहे, पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची,असं विधान अभिनेते शरद पोक्षे यांनी केले आहे.
सोलापुरात 44.1 ° सेल्सियस तापमानाची नोंद झालीय. दिवसेंदिवस तापमान उच्चांक गाठत आहे. वाढत्या तापमाणामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही-लाही होतेय.
जालन्याच्या आदर्श राऊत या पर्यटकाने त्यांच्याशी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी संवाद साधल्याचा केला होता दावा...
आज एटीएस आणि स्थानिक तपास यंत्रणांनी आदर्श राऊत यांची भेट घेऊन चर्चा केल्याची सूत्रांची माहिती
आदर्श राऊत यांनी घडलेली घटना आणि मॅगी स्टॉलचा फोन नंबर तपास यंत्रणांना दिल्याची सूत्रांची माहिती.
यासंदर्भात आदर्शने अगोदरच एनआयएला ईमेलद्वारे संशयित दहशतवाद्यांशी झालेल संभाषण आणि मॅगी स्टॉलचा नंबर पाठवला होता..
पहिल्या कारवाई मध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना २ तरुण पुणे रेल्वे स्टेशन परिसरात गांजा विकत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांचजवळ ३० किलोचा ६ लाख २४ हजार रुपयांचा गाजा मिळून आला
याप्रकरणी पप्पू देवरी (३२), चंदन कुंवर (१९) हे दोघे ही राहणारे ओडिशा यांना पोलिसांनी अटक केली आहे
कल्याण तळोजा रोडवरून खोनी जवळ एक स्विफ्ट डिझायर गाडी रस्त्यावरून घसरून शेजारील नालात कोसळल्याचे घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली .या रस्त्याचे
सिमेंट काँक्रीटचे काम पूर्ण झाले मात्र रस्त्याच्या बाजूला भराव केला नसल्याने भरधाव वेगाने जाणारी स्विफ्ट डिझायर रस्त्यावरून घसरत नाल्यामध्ये कोसळली. यामध्ये गाडीत अडकलेले चालकासह एका चिमुकलीला आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले हा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को गावात नातवांनीच सोन्याच्या दागिन्यासाठी आजीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केसराबाई ढाकणे असं मयत महिलेचे नाव असून मयत महिला शेतामध्ये बाजावर झोपलेली असताना कानातील तीस हजार रुपयांचे दागिने ओरबडून घेऊन गळा आवळून खून केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती.
बोरमणी गावातील जवळपास 5 ते 6 मुलं एका शेतातील विहीरीत पोहण्यासाठी गेले होते
त्यावेळी अचानक दगडी विहीर ढासळल्याने ही सर्व मुलं या विहिरीत अडकली होती
ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाव घेत तिघांना विहिरीतून बाहेर काढलंय
मात्र दोन मुले अद्याप ही विहिरीतच अडकली आहेत, दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांकडून या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत
रांजणगाव अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात आज चंदन उटीचा विशेष लेप करण्यात आला. पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती लाभली.
प्राचीन परंपरेनुसार, चैत्र महिन्याच्या समाप्तीच्या निमित्ताने आणि उष्णतेपासून गणपती बाप्पाला शीतलता मिळावी यासाठी चंदन उटीचा लेप लावण्याची परंपरा आहे. यावेळी संपूर्ण गणपती मूर्तीला चंदन उटीचा सुगंधी थर लावण्यात आला, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर सुवासिक झाला.
नेपाळच्या काठमांडूत पार पडलेल्या जागतिक परिषदेत बदलापूरच्या 'देवाभाऊ' चष्म्यावर जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून शिक्कामोर्तब झालय. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच 'देवाभाऊ' चष्म्याच्या रूपात जगाला मोठी भेट मिळालीय. या परिषदेत बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या सामाजिक संस्थेनं सादर केलेला 33 रुपयांतील 'देवाभाऊ' चष्मा आता अमेरिकेसह 140 देशांमध्ये पोहोचणार आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक पार पडली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गिरीश महाजन यांनी आढावा घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांच्यासह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते उपस्थित. कुंभमेळ्याची कामं वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याच्या गिरीश महाजन यांच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली.
यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बेलोरा गावात संतप्त ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केली आहे, इतकेच नव्हे तर या मुख्याध्यापकाची दुचाकी देखील पेटवून देण्यात आली. पुरुषोत्तम मंडलिक असे या मुख्याध्यापकाचे नाव असून आज महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण आटोपल्यानंतर काही पालकांनी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करित वाद घातला, बघता बघता मोठा जमाव शाळेत पोहोचला आणि मुख्याध्यापकाला त्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुख्याध्यापकाला जमावाच्या तावडीतून सोडविले. याप्रकरणी अद्याप कुठलीही तक्रार दाखल झाली नसून, पोलिसांनी गावात मोठा पोलीस बंदोबस्त लावला आहे. गावाला सध्या पोलीस छावनीचे स्वरूप आले आहे.
वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.
यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे आणि माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आदी उपस्थित होते.
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेत उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांना १०० पैकी ८६.२९ टक्के गुण मिळाले आहेत. यानंतर आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना दिलं आहे.
राहाता तालुक्यातील कोल्हार परिसरात तिसर्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलंय.. विशेष म्हणजे गेल्या एक महिन्याच्या कालावधीत एकाच शेतकर्याच्या शेताच्या आजू बाजूला लावलेल्या पिंजर्यात हे तिन्ही बिबटे अडकले आहेत.. परिसरात आणखी दोन बिबटे असण्याची शक्यता असून त्यांनाही लवकरात लवकरच जेरबंद करावे अशी ग्रामस्थांनी केली आहे..
शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथे बिबट्यांच्या दहशतीनंतर आता रानगव्यांनी ग्रामस्थांची झोप उडवली आहे. दोन रानगवे शेतात शिरल्याने गावकऱ्यांमध्ये भीती पसरली असून, पिकांचं नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
नाशिकच्या दिंडोरी रोड वरील RTO सिग्नलवर भीषण अपघात झालाय. भरधाव वेगातील पिक अप वाहनाने दोन ते तीन दुचाकीना धडक दिली. अपघातात 23 वर्षी तरुणी जागीच ठार झाली. तर पाच जण जखमी झाले आहेत.
जयश्री सोनवणे अस अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव..
अपघाताची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद....
जखमींना जिल्हा आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल....
असिर मुनीना माझे सांगणे आहे की त्यांनी भारतात बाबरी मशीद उभारण्याचे अजाण म्हणण्याचे स्वप्नातही येऊ नये कारण तुमचा बाप इथे हिंदुस्थानात बसलेला आहे. बाबरी मशिदी ची विट इथे ठेवण्याचा विचार जरी ठेवला तरी डोळे काढून टाकू...
बाबरी मस्जिद इथे कधीच नव्हती व इथे होणार नाही ते राम मंदिर होते राम मंदिरच राहील,बाबरी ची विट पाकिस्तानातू इथे आणून बाबरी मशीद बांधण्याचे स्वप्न पाकिस्तान ने पाहू नये....ते स्वप्नच राहील. पाकिस्तानने बॉम्बची भारताला किती दाखवू नये आमच्याकडे असे बॉम्ब आहेत हे पाकिस्तानचं नामो निशाण राहणार नाही,अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथे दिली.
- पेठ बीड भागातील गोडाऊन मध्ये गुटखा असल्याची पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांना मिळाली होती माहिती.
- 9 लाख 28 हजार 500 रुपये किमतीच्या एकूण 35 गोण्या जप्त.
- दोन आरोपींविरूद्ध पेठ बीड पोलिसात गुन्हा दाखल.
- अवैध धंद्याबाबतची माहिती असल्यास पोलिसांना कळवा नाव गुप्त ठेवले जाईल.
- पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांचे आवाहन.
रांजणगाव अष्टविनायकांपैकी एक असलेल्या रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात आज चंदन उटीचा विशेष लेप करण्यात आला. पारंपरिक धार्मिक विधीनुसार झालेल्या या सोहळ्याला हजारो भक्तांची उपस्थिती लाभली.
आज सोन्याच्या दरात तब्बल १,२०० रुपयांची घसरण झाली असून, चांदीच्या दरातही २,००० रुपयांची घट झाली आहे.
सध्या सोन्याचा दर जीएसटीसह ९६,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे, तर चांदीचा दर जीएसटीसह ९७,८०० रुपये प्रति किलोवर आला आहे.
लाखाच्या पातळीवर पोहोचलेले सोने आणि चांदीचे दर आता घसरल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
नाशिकच्या येवला शहरातील विंचूर चौफुली येथे सकाळी एक छोटा अपघात घडला. यानंतर इंदौर-मनमाड-पुणे आणि संभाजीनगर-नाशिक या महामार्गाला जोडणा-या येवल्यातील विंचूर चौफुली येथे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीत सुमारे ३ किमी पर्यंतच्या दोन्ही बाजूने रांगा लागल्या होत्या.
नाशिकच्या लासलगाव मध्ये शिक्षण सहाय्याक मंडळा तर्फे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
यावेळी लासलगाव मधिल सर्व शिक्षण संस्थांनी एकत्र येत महाराष्ट्र दिना निमित्ताने शहरातून मंगल कलश मिरवणूक शोभा यात्रा काढण्यात आली
यात मंगल कलशाचा देखावा,जेजुरी येथील खंडेराव महाराज जिवंत देखावा,भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स घेऊन आलेल्या स्पेस क्राफ्टचा देखावा,सर्वधर्मभाव देखाव तसेच हरित सेनेच्या माध्यमातून झाडे लावा झाडे लावा असे संदेश देणा-या विद्यार्थ्या बरोबरच लेझीम पथक अशा पध्दतीने महाराष्ट्र दिन मोठ्या उत्सहात साजरा केला..
भोरमधील बाजारवाडी येथील ऐतिहासिक रोहिडा म्हणजेच विचित्रगडाला,राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने संरक्षित दर्जा घोषित केला असून, 25 तारखेला याबाबतचे परिपत्रक जारी केलयं..
त्यामुळे गडासह वनविभागाच्या हद्दीत विकासकामे होणार असल्यामुळे, पर्यटकांची संख्या वाढून गावात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार
राज्य संरक्षित दर्जामुळे विकासकामांना संधी मिळून पर्यटकांची संख्या वाढणार
या गडाला एकूण ३ दरवाजे आहेत. सर्व दरवाजे एकमेकांना काटकोनात आहेत. या व्यतिरिक्त किल्ल्यावर पाण्याचे टाके तसेच किल्ल्याच्या तटबंदीवर एकूण ६ बुरूज आहेत..
संरक्षित करावयाचे भूमापन क्र. १०३०/१ च्या एकूण क्षेत्रापैकी ११.१० एकर एकूण क्षेत्रफळ संरक्षित केले आहे..
राज्यपालांच्या आदेशानुसार रोहिडा किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केल्याबाबतचे परिपत्रक महाराष्ट्र शासन पर्यटन व सांस्कृतिक विभागाच्या उपसचिव नंदा राऊत यांनी काढले आहे..
स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यासंबंधी शासनाकडे कोणत्याही हरकती आलेल्या नाहीत.
रोहिडा किल्ला यादव काळात बांधला गेलाय.इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला.२४ जून १६७० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आपल्या ताब्यात घेतला.
बीडच्या माजलगाव तालुक्यातील, किट्टी आडगाव, एकदरा, देवखेडा, टाकरवण, तालखेडसह राजेवाडी या गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
अनेक वर्षांपासून या गावांमध्ये जिलजिवन चे काम अर्धवट असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तर पाणी पातळी घटल्याने बोअर, विहीर आणि हातपंपातुनही आवश्यक तेवढे पाणी मिळत नाही.
तर अनेक गावातील सार्वजनिक हात पंप नादुरुस्त आहेत. यामुळे प्रशासनाने पाण्याचे नियोजन करण्याची मागणी लोकांमधून होत आहे.
इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या मोठ्या रांगा
10 मिनिटांच्या प्रवासाला लागतो आहे दीड तास
शाळांना सुटी लागल्याने चाकरमानी निघाले गावाला
महाराष्ट्र दिनानिमित्त पर्यटक मोठ्या संख्येने कोकणात निघाले
वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर वाहनांची कोंडी
इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहतूक संथ गतीने
वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची दमछाक .....
माणगाव आणि इंदापूर या दोन्ही बाजार पेठांमध्ये अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीला अडथळा
बीड च्या धानोरा रोड परिसरात कोरडे यांचे लहान मुले हे रस्त्यावर खेळत होते. आरोपी व्यक्ती नामे खेडकर हा त्याची गाडी घेऊन आला.
त्यावेळी मुलांना शिवीगाळ चालू केली. की तुम्ही रस्त्यावर कशामुळे खेळता, त्यानंतर मुलांची आई दिक्षा कोरडे त्याला जाब विचारण्यास गेल्या की तू आमच्या मुलांना शिव्या का देतोस? तर त्याने अर्वाचे भाषेत त्या मुलांच्या आईला ही शिवीगाळ केली आणि मारहाण केली.
या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालय बीड येथे ऍडमिट पण करण्यात आलेले आहे.
हे गंभीर आहे, महिलेला मारहाण होताना तिचे लेकरं सुद्धा त्या आरोपी नराधमांला रोखण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.
दलित महिलेला अशी अमानुष मारहाण निंदनीय आहे. ऑल इंडिया पँथर सेना या घटनेचा निषेध करत असून तात्काळ पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करावी.
पीडितेला संरक्षण द्यावं, बीडची परिस्थिती बघता काहीही घडू शकतं त्यामुळे दलित महिलेला तात्काळ सुरक्षित करण्यासाठी आरोपीला अटक करावी.
महिला आयोगाने, अनुसूचित जाती जमाती आयोगाने तात्काळ दखल घ्यावी.
पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जातीयनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर जल्लोष
पुण्यातील फुले वाड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष
"सामाजिक न्यायाच्या क्रांतीचे नवीन नायक राहुल गांधी" असे हातात बोर्ड घेऊन कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
फुले वाड्यात एकमेकांना पेढे भरवून आणि ढोल ताशा वाजवत आनंदोत्सव
जातीनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मागणीचा विजय असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंदर् मोदी यांच्या हस्ते मुंबईतील बीकेसी येथे वेव्हज परिषदेचे उद्घटान करण्यात आलेय. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
- बुटीबोरी वनपरिक्षेत्रातील सिंधीविरी शेतालगतच्या नाल्यातून वाघाचा बच्चा जखमी अवस्थेत दिसून आला.
- बुट्टीबोरी वनपरिक्षेत्र अधिकरी यांना माहिती मिळताच त्यांनी नागपूरच्या ट्रांजिट ट्रीटमेंट सेंटरच्या पाचरण केले.
- सध्याचा तापमानाचा अंदाज घेता वाघाच्या बछड्याला त्रास होऊ नये म्हणून फिजिकल रेस्क्यू करण्याचं ठरल.
- ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटरच्या पथकाने बेशुद्ध न करता त्याला पिंजराबंद करण्यात आले..
- ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटरचे वैद्यकीय अधिकारी यांच्यासह माजी वन्यजीव मंडळ सदस्य कुंदन हात यांच्यासह तुमचे सदस्य होते
- यावेळी वन विभागाचे उपवनसंरक्षक यांच्यासह वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन विभागाची संपूर्ण उपस्थित होते.
केंद्र सरकारतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जात निहाय जनगणना करण्याच्या घेतलेल्या निर्णयासंदर्भात धुळ्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे जम्मू-काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत नागरिकांची जनगणना होऊन, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना न्याय देण्यास त्याचबरोबर विविध केंद्र व राज्य सरकारच्या दिल्या जाणाऱ्या योजना राबविण्यात देखील मोठा दिलासा मिळणारा असल्यामुळे, या माध्यमातून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असल्याची भावना मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन आज जाहीर करण्यात आले. यामध्ये महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे.
ड्रग्स प्रकरणात फरार असलेल्या म्होरक्या अबरार कुरेशी या संशयिताशी २५२ वेळा संपर्क केल्याच्या कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्या चौकशी अहवालानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पोटे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
आता निलंबन काळात या प्रकरणाची चौकशी भुसावळच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.
यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांना पोलिस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले होते.
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर लातूर सह जिल्ह्यातील सराफा बाजारात नागरिकांची सोने खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली.. अक्षय तृतीयेच्या शुभ दिनी सुवर्णयोग असल्याने नागरिक सोन्या-चांदीचे , तसेच या दिवशी रियल इस्टेट यामध्ये ही, नागरिक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात ... लातूरच्या सराफा बाजारात नागरिकांची सोने खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली.. 24 कॅरेट सोन्याचा भाव 97 हजार प्रति तोळा असतानाही , लातूर कोट्यावधीची उलाढाल झाली आहे.
कामगार दिन व उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक आपल्या खाजगी वाहनाने पर्यटन स्थळाकडे निघाल्याने मुंबई पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान तब्बल आठ ते दहा किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. काही मिनिटांनी अंतर पार करण्यासाठी तासंतास वेळ लागत आहे. महामार्ग पोलीस ही वाहतूक कोंडी सोडण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता राजाराम पूल अचानक बंद केल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. तीन दिवसात याचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे परस्पर पूल बंद करून वाहतुकीचा खेळखंडोबा करणाऱ्या ठेकेदारावर महापालिका काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर येणार आहे. भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी प्रदेश भाजपाचे सरचिटणीस विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांची तक्रार कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळी मनमानीने कारभार करत असून, कोणालाही विश्वासात घेत नाही, भाजपाचे जुने कार्यकर्त्यांना डावलून नवीन पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना पद देत आहेत. त्यामुळे जुने कार्यकर्ते दुखावले जात जात असल्याने राजेंद्र गावित यांनी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र दिलं असून या पत्रात भाजपाचे सरचिटणीस आणि जिल्हाध्यक्ष यांना पदावरून काढण्यात यावे अशी मागणी केली आहे. भाजपातील अंतर्गत वाद वाढला असल्याचे दिसून येत आहेत जिल्ह्यात सध्या नवीन भाजप आणि जुनी भाजप असे दोन गट पडले आहेत त्यामुळे आपापसातला वाद आता थेट कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे गेला आहे त्यामुळे चव्हाण यावर काय कारवाई करणार हे पाहणं आता महत्त्वाचे ठरणार आहे.
भाव गडगडले, कांदा चाळीत भरण्यासाठी लगबग मेहुणबारे चाळीसगाव तालुक्यात यंदा उन्हाळी कांद्याची चांगली आवक झालेली असली तरी वाढत्या तीव्र तापमानात कांदा पटकन खराब होण्याचा धोका असल्याने शेतकरी कांदाचाळीत भरत आहेत. अशा परिस्थितीत कांद्याचे भाव कमी असल्यामुळे गिरणा परिसरातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. भाव नसल्याने बहुसंख्य कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदाचाळीत भरत आहेत. दुहेरी संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत कांद्यामुळे पाणी आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कांद्याला भाववाढीसाठी शासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे.
आज महाराष्ट्र दिना निमित्ताने मंत्री आदिती तटकरे यांनी अलिबागमध्ये पोलिस परेड मैदान येथे तर मंत्री भरत गोगावले यांनी महाडच्या चांदे क्रिडांगण येथे झेंड वंदन केले. रायगडच्या पालक मंत्री पदावरून वाद सुरु आहे. रायगडचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये आदिती तटकरे यांना झेंडा वंदनाचा मान दिल्याने नवा निर्माण झाला होता. त्यावर मार्ग म्हणून महाडच्या चांदे क्रिडांगण येथे होणाऱ्या शासकिय झेंडा वंदनाचा मान भरत गोगावले यांना देऊन महायुतीत सुरु असलेल्या वादावर तात्पुरता उपाय करण्यात आला आहे.
जळगाव च्या जि. प. च्या जुन्या इमारतीमधील कृषी विभागातील तांत्रिक कक्षात अचानक स्लॅब कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली. स्लॅब कोसळल्याची माहिती बांधकाम विभाग व उपविभागाला लेखी स्वरूपात कळविण्यात आली आहे. बांधकाम विभागाचे प्रमुख कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांनी पाहणी करून दुरुस्तीबाबतचे अंदाजपत्रकसुद्धा बनवलेले आहे. कृषी विभागाचे विभाग प्रमुख मस्के यांनी कार्यकारी अभियंता यांची भेट घेतलेली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. शेजारील सर्व शिक्षा अभियान कार्यालय जीवितहानीच्या भीतीने शिक्षण विभागात स्थलांतरित झालेले आहे.
जळगावच्या जामनेरात भूमी अभिलेख कार्यालयात शेतकऱ्याचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न.जामनेर तालुक्यातील खर्चाणे येथील शेतकरी बाबुराव पाटील यांनी पेट्रोल टाकुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. आईच्या नावे असलेल्या शेत जमिनीची तीन वेळेस झालेली मोजणी सदोष असल्याची तक्रार करुनही जामनेर येथील भुमि अभिलेख दुर्लक्ष करीत असल्याने आत्मदहनाचा प्रयत्न. यावेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने घटना टळली.
लोहगावमध्ये सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
पुढील २४ तासांत तापमानात आणखी वाढ होण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज
यंदाच्या हंगामातील सर्वात जास्त तापमान ४३.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
शहरात उष्णतेसह दमट हवामान कायम राहणार आहे.काही भागात तापमानात एक ते दीड अंशांची घट, पण एकूणच वातावरण उष्ण
शिवाजीनगर आणि पाषाण ३९.७ अंश,मगरपट्टा ३९.२ अंश,कोरेगाव पार्क ३८.६ अंश,हडपसर ३८.२ अंश,वडगावशेरी ३८ अंश जवळ पोहचल आहे.तीन दिवसांनी हवामान कोरडे व ढगाळ राहण्याची शक्यता, हलक्या सरी पडू शकतात.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी आमदार बापूसाहेब पठारे, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले, अप्पर आयुक्त कविता द्विवेदी यांच्यासह आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे फायटर जेट विमानातून पडलेला जिवंत बॉम्ब सात फूट खड्ड्यातून वर काढण्यात आलाय.. पुणे येथील भारतीय सैन्य दलाच्या बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड पथकाने बॉम्बचा स्फोट होऊ नये म्हणून तो निष्क्रिय केलाय..आज हा बॉम्ब के. के. रेंज येथे नेऊन त्याचा विस्फोट करण्यात येणार आहे.. वरवंडी येथे 24 एप्रिलला फायटर जेट विमानातून बॉम्ब पडल्याची घटना झाली होती.. बॉम्ब पडल्यानंतर चार-पाच दिवसांनी वायुसेना आणि संरक्षणच्या पथकांनी घटनास्थळी पाहणी केली होती.. त्यावेळी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.. याची माहिती समजताच जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि वायुसेना पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. वायुसेनेच्या परवानगीने काल हा बॉम्ब निष्क्रिय करण्यात आलाय.. आज हा बॉम्ब नगरला नेण्यात येणार असून नगर मनमाड महामार्गावरील वाहतूक एक तास पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त धुळे शहरातील पोलिस कवायत मैदानावर एक मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी धुळे जिल्हा अधिकारी जितेंद्र पापडकर, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपस्थित होते.
जालन्यात महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालंय.
राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडलाय.
यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पहलगाम येथील घटनेचा निषेध व्यक्त करत जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
तसेच यावेळी मुंडे यांनी परेडच निरीक्षण करून जनतेला महाराष्ट्र दिनाच्या 66 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यावेळी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि जालन्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
'बीजे' मध्ये अस्थिव्यंगोपचार (ऑर्थोपेडिक) विभागात प्रथम वर्षाला शिकणाऱ्या निवासी विद्यार्थी डॉक्टरने रॅगिंग झाल्याची तक्रार प्रथम या विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश बारटक्के यांच्याकडे केली होती
त्यांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवले
यावरून डॉ. बारटक्के यांचा विभाग प्रमुखाचा पदभार काढण्यात आला आहे
तसेच रॅगिंग करणाऱ्या तीन निवासी डॉक्टरांचे सहा महिन्यासाठी शिक्षण सत्रातून व वसतिगृहातून निलंबन
उपमुख्यमंत्री अजित पवार आज करणार उड्डाणपूलाच उद्घाटन
विठ्ठलवाडी ते फन टाईम थेटर पर्यंत जवळपास 2100 मीटरच्या उड्डाणपुलाचा आज होणार लोकार्पण सोहळा
उड्डाणपुलामुळे मोठी वाहतूक कोंडी टळणार
सिंहगड रोडवरच्या वाहतुकीतून पुणेकरांची होणार सुटका
अजित पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील देखील राहणार उपस्थित
1 मे महाराष्ट्र आणि कामगार दिवसानिमिताणे नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,
मुख्य सोहळा जिल्हा पोलिस दलाच्या मैदानावर संपन्न झाला राज्यचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले,
पोलीस दलाच्या वतीने पथसंचलन करत मानवंदना देण्यात आली, जिल्ह्यातील अनेक विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी कर्मचारी आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस महासंचालक पदक देऊन सत्कार करण्यात आला,
तर राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाला असून या नुकसानाची भरपाई तातडीने दिली जाणार आहे
त्यासोबतच जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या असल्याने यावर उपाययोजना देखील लवकरच होणार असल्याची गवई पालकमंत्र्यांनी दिली,
नंदुरबार तालुक्यातील उमदें खुर्द गावातील श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारो नागरिकांच्या साक्षीने 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषाने लांगड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यंदा यात्रा भरविण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला होता अक्षयतृतीयेच्या रात्री श्री खंडेराव महाराजांची यात्रा भरली.
पाचव्या पिढीतील श्री खंडेराव महाराजांचे सेवेकरी जितेंद्र मराठे बारागाड्या ओढत होते.
पाच वर्षांपासून जितेंद्र मराठे हेच यात्रेत बारा गाड्या ओढत होते, मात्र मागील वर्षापासून त्यांचे लहान बंधू महेंद्र मराठे यांनी बारागाड्या ओढल्या.
सुरवातीला तगतराव, नंतर बारागाड्यांची रचना केली जाते. हा कार्यक्रम पाहण्यासाठी नंदुरबारसह परिसरातील गावांतील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती...
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 66 व्या वर्धापन दिनानिमित्ताने आज पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व गाभाऱ्यात विविध फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
सजावटीमुळे मुळे श्रींचा गाभारा मनमोहक व आकर्षक दिसत आहे.
सजावटीसाठी ब्लू डीजी 1500 गड्डी, स्टेटस 1500 गड्डी, कामिनी 1500 गड्डी, जिप्सो 100 गड्डी, ऑर्किड 5 गड्डी, जरवेरा 20 गड्डी, दस गुलाब 20 गड्डी, झेंडू भगवा 300 किलो, झेंडू पिवळा 300 किलो इत्यादी दोन टन फुलाचा वापर करण्यात आला आहे.
ही सजावट पुणे विठ्ठल भक्त चव्हाण परिवाराच्यावतीने केली आहे.
जलसंपदा विभागातर्फे जल व्यवस्थापन कृती पंधरवडा राबविण्यात आलाय..
या पंधरवड्याचा समारोपीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालाय..
इस्त्रायल तसेच काही आखाती देशांमध्ये कमी पावसातही उत्कृष्ट नियोजनातून समृध्दी निर्माण करण्यात आलीये..
त्या तुलनेत आपल्याकडे पाण्याची मोठी उपलब्धता आहे.... आणि त्याचा उचित वापर झाला पाहिजे...
तर हजारो वर्षांच्या पावसाने जमिनीत निर्माण झालेल्या पाण्याच्या साठ्याचा उपसा हानीकारक ठरू शकते, त्यामुळे पाण्याचा उचित वापर ही सवय लावावी, आणि कालव्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पाणी शेवटच्या बिंदुपर्यंत पाणी पोहोचत नाही...
त्यामुळे नेहमी स्वच्छता असली पाहिजे असेही पालकमंत्री आकाश फुंडकर म्हटले..
तसेच पाणी जागरूकता निर्माण करण्यासाठी कृषी व जलसंपदा विभागाने समन्वयाने करावी, असे आदेशही पालकमंत्री फुंडकर यांनी दिले आहे....
राजगुरुनगर पाबळ रोडवर होलेवाडी येथे भरधाव वेगात ओव्हरटेक करणाऱ्या कारने समोरुन येणाऱ्या दुचाकीला चिरडले असुन या अपघातात दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यु झाला हा अपघाताचा थरार सीसीटीव्ही कँमेरात कैद झाला
अपघातानंतर कार चालक फरार झाला मात्र नातेवाईकांनी सीसीटिव्हि कँमेराच्या माध्यमातून कार चालकाला शोधले याप्रकरणी राजगुरुनगर पोलीसांत कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
गेल्या आठवडाभरापासून मागील आठवड्यापासून अकोला जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे.
काल तापमानाच्या पाऱ्याने 45 अंश सेल्सियसची पातळी ओलांडल्याने जिल्ह्यातील जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागली आहे..
अकोल्याच्या जलसाठ्यात आठवडाभरात दीड ते दोन टक्क्यांनी घट झाली आहे.
30 एप्रिलअखेर अकोला जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पाची पाणीपातळी 24 टक्क्यांवर आली आहे.
जलसाठ्यातील होणारी संभाव्य घट लक्षात घेता, पुढील दीड महिना पाण्याच्या बाबतीत कसोटी पाहणारा असणार आहे.
त्यामुळे आता पोलीस शहरांना तीन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता सहा दिवसात करण्याचे नियोजन असणार आहे..
तसेच पाणी जपून वापरण्याचा आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले..
जलव्यवस्थापनाच्या कार्यक्रमात राजकीय वातावरण तापले
पाणी प्रश्नावरून खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची एकमेकावर बोचरी टीका
निवडणुकीच्या तोंडावर फक्त पाणी येणार सांगितलं जात, दोन पिढ्यांपासून हेच सुरू;ओमराजे निंबाळकर यांची आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता हल्ला
तर पाणी येण्यात काही झारीतील शुक्राचार्य यांनी अडथळे आणले राणाजगजितसिंह पाटील यांची ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत कार्यक्रम,लोकप्रतिनिधींनी
कार्यक्रमात एकमेकांच नावही घेतलं नाही
काश्मीर येथील पहेलगाव हल्ल्यात दहशतवाद्यांनी सत्तावीस निरपराध पर्यटकावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याची पडसाद देशभर उमटले.
मावळच्या वडगाव मधील तहसील कार्यालयावर शिवप्रतिष्ठांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा तरुणांचा मोठा सहभाग दिसून आलाय.
आम्ही पाकिस्तान मुर्दाबाद म्हणणार नाही. कारण की अखंड हिंदुस्तान चा तो एक भाग आहे. आणि हिंदुस्तान आमची आई आहे.
आईला मुर्दाबाद कसं म्हणायचं असा सवाल शिवप्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
पाकिस्तानावर हल्ला करून पाकिस्तान अखंड हिंदुस्तान सामील करा जेणेकरून दहशतवादी राहणार नाही आणि आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने कोणीही बघणार नाही...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.