
मराठीच्या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधाची भूमिका घेतली असली तरी अधिवेशनात दूध का दूध पाणी का पाणी होईल. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा ठाकरेना सूचक इशारा.
महाराष्ट्रात हिंदी सक्ती धोरण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले असल्याचे मराठी भाषा मंत्री यांनी सांगितले आहे. आता अधिवेशन सुरू होणार आहे. त्यावेळी अनेक गोष्टी बाहेर येतील असा दावा जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केला आहे. यावेळी दूध का दूध पाणी का पाणी होईल असा इशाराच जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे
जालन्यात अंगणवाडी सेविका भरतीसाठी दोन लाखांची मागणी केल्याप्रकरणी होणार चौकशी...
जालना जिल्हा परिषदेचे कार्यक्रम अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत...
चौकशी समिती 30 जूनपूर्वी अहवाल सादर करणार त्यानंतर संबंधितांवर होणार कारवाई...
दोन दिवसांपूर्वी जालन्यातील घनसांवगी येथे अंगणवाडी सेविका भरतीसाठी दोन लाखाची मागणी केल्याची बातमी साम टीव्हीने समोर आणली होती...
अकोल्यात आज संध्याकाळी शिवसेना ठाकरे गटाने भाजप नेते आणि आमदार बबनराव लोणीकर यांचा पुतळा जाळलाय. लोणीकरांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून यावेळी शिवसैनिकांनी संताप व्यक्त केलाय. अकोल्यातील बसस्थानक चौकात शिवसेनेने लोणीकरांचा हा पुतळा जाळलाय. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारलेय. जिल्हाप्रमुख गोपाल दापकर आणि मंगेश काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी बस स्थानक चौक शिवसैनिकांच्या भाजप आणि लोणीकरांच्या विरोधातील जोरदार घोषणाबाजीने दणाणून गेलाय. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकरांनी शेतकरी आणि शिवसैनिकांनी लोणीकर यांना जिथे दिसले तिथे बुटाने मारावं, असं वादग्रस्त वक्तव्य केलंय.
पुण्यातील रुबी हॉस्पिटल मध्ये तानाजी सावंत यांच्यावर उपचार सुरू आहेत. शिवसेनेचे तानाजी सावंत यांना रुबी हॉस्पिटल मधील आय सी यू मध्ये दाखल करण्यात आलं आहे. थोड्याच वेळात रुबी हॉल रुग्णालयाकडून प्रसिद्धी पत्रक याबाबतचे जाहीर करण्यात येईल.
पुण्यात ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि मनसे नेते एकत्रित आलेत.
ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे आणि मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी मनसे कार्यालयात एकत्र येत चर्चा केली.
मुंबईत पाच जुलै रोजी होणाऱ्या मोर्चाच्या तयारीसाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एकमेकांशी संवाद केला.
कल्याण ते तळोजा पर्यंत एम एम आर डी ए चे मेट्रो प्रकल्प सुरू असून या कामदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या ठिकाणी काही सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत आणि हे सुरक्षा रक्षक हरियाणा मधील गवार कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करत असून यात मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतील तरुण देखील काम करतात.
मात्र गेले दोन महिन्यापासून या ठिकाणच्या सुरक्षा रक्षकांना पगार मिळाला नसल्याने अखेर याचा जाब विचारण्यासाठी शिव जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस हरीश इंगळे त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणचा सुपरवायझर यांना पगार विषयी विचारणा केली असता त्यांनी हरियाणा मधील त्यांचे एमडी आहेत यांच्याशी बोला असे सांगत फोन लावून त्यांच्याशी संपर्क साधला या वेळेला त्यांच्या एमडी ने चक्क मराठी मराठी मुलांना कामावरून काढून टाका नंतर पगार देईल असे सांगितले.
भाषा शास्त्राच्या दृष्टीने हिंदीसक्तीचा विषय चुकीचा.
प्राध्यापक नितीन बानगुडे यांचा हिंदी सक्तीला विरोध.
मराठीवरील हिंदी सक्तीचं आक्रमण खपवून घेतल जाणार नाही, प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचा इशारा
शेगावचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखीच विठुरायाच्या सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं आहे.
सोलापूरच्या प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी गजानन महाराजांच्या पालखीचे स्वागत केलं.
शेगाव ते पंढरपूर असा तब्बल 750 किमी प्रवास करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत .
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना ७ जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरूच आहे. एका टोळक्यानं मध्यरात्रीच्या सुमारास अनेक घरांवर हल्ले केले. टोळक्यातील गुंडांनी कोयते हातात घेतले होते. घरांवर हल्ला करत दरवाजांची तोडफोड केली. पुण्यातील वानवडी भागात धक्कादायक घटना घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे पार्थिव तिचा लोखंडवाला शास्त्रीनगर येथील निवासस्थानी आणण्यात आले आहे. काही वेळासाठी पार्थिव अंतिम दर्शनासाठी या ठिकाणी ठेवले जाणार असून यानंतर ओशिवरा येथील हिंदू स्मशानभूमीत तिच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
आमदार बबनराव लोणीकर यांच्या वादग्रस्त विधानानंतर यवतमाळच्या पुसदमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोडे मारो आंदोलन केले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत लोणीकर यांच्या फलकला जोडे मारून निषेध केला.
कोल्हापूर जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना (MSME) पाठबळ देण्यासाठी कोल्हापुरात आज 'एमएसएमई कॉन्क्लेव्ह'चे यशस्वी आयोजन करण्यात आले. 'सकाळ माध्यम समूह' आणि 'द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया, कोल्हापूर (ICAI)' यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला होता.
- उद्धव ठाकरे सेनेला नागपुरात अजून एक धक्का
- उद्धव सेनेचे माजी नागपूर शहर प्रमुख राजू तुमसरे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
- आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार पक्षप्रवेश
- राजू तुमसरे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांचे कट्टर समर्थक आहे ....
- ठाकरे सेनेचे आणि काँग्रेसचे अजून काही स्थानिक नेतेही शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता..
एसएसव्हीपीएस अभियांत्रिकी महाविद्यालयात भारतीय जनता पक्षाच्या धुळे जिल्हा महानगरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी चौधरी यांनी सांगितले की, आगामी महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांची सांगड घालून, विजय मिळवण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी दिली जाईल. या उमेदवारांची अंतिम निवड ही प्रदेश पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रपती शौर्यचक्रप्राप्त आयपीएस अधिकारी सोमय विनायक मुंडे यांची बदली पुणे शहर पोलिस दलात उपायुक्त म्हणून झाली आहे. लातूर चे पोलिस अधीक्षक राहिलेले मुंडे यांची मे महिन्यात छत्रपती संभाजीनगर मध्ये पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. आता अवघ्या १ महिन्याच्या आत त्यांची पुन्हा बदली करून थेट पुणे शहरात बदली करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक श्री क्षेत्र पोखरणी नरसिंह येथे पार पडली या बैठकीला बाधित ३१ गावातील प्रत्येकी २ शेतकरी उपस्थित होते यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्गाची मोजणी आणि भूसंपादन करू दिले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आलाय तसेच वेळ पडली तर टप्प्याटप्प्याने रस्त्यावर उतरून रास्ता रोको जेल भरो आंदोलन करण्याचा निर्णयही या शेतकऱ्यांनी घेतलाय
हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी एका विचित्र संकटात सापडले आहेत, हिंगोली जिल्ह्यात पेरणी केलेली पिके सुकून जात असल्याने आभाळातून पाण्याची वाट पाहत असताना शेतकऱ्याच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे आणि याला कारण ठरले विदर्भात धुवाधार सुरू असलेला पाऊस, विदर्भात कोसळलेल्या पावसामुळे पैनगंगा नदीला पूर आला आणि यामुळे हिंगोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या पैनगंगेने शेतकऱ्याच्या शेतात एन्ट्री केली ज्यामुळे हिंगोली तालुक्यातील शेकडे हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे, कनेरगाव परिसरातील भगवती, तपोवन, गारखेडा, सवना गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
आंबोली काळेसाद येथे रुमाल पकडण्याच्या नादात खोलदरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील पर्यटकांचा मृतदेह वीस तासानंतर सापडला आहे. आंबोली व सांगेली येथील सिंधुदुर्ग ऍडवेंचर टीम, एन डी आर एफ, पोलीस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने हा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला आहे. यावेळी मृतदेह खोल दरीतून बाहेर काढताच नातेवाईकांनी आक्रोश केला.
भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्या विरोधात जालन्यातील परतूर येथे शिवसेना ठाकरे गटाने निषेध आंदोलन केल.नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले, तुझ्या आईचा आणि बापाचा पेन्शन बबनराव लोणीकरने दिला असं वादग्रस्त वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं होतं.
- केदार कुटुंबाच्या कार्यक्रमासाठी आले आहे...राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकतीने ठाकरे बंधू कडून आयोजित मोर्चात सहभागी होणार...
- समृद्धीच्या भूसंपादनाला विरोध होता. त्यानंतर मदतीचे निकष बदलले त्यानंतर आमचा विरोध मागे घेतला, शक्तीपीठला विरोध हा आहे, फायनान्स डिपार्टमेंटचे आक्षेप आहे,ते फार गंभीर आहेत- सुप्रिया सुळे
महिला कीर्तनकारची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना तालुक्यातील चिंचडगाव शिवारात शनिवार रोजी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास उघडकीस आली. हभप संगीता ताई अण्णासाहेब पवार वय 50 वर्षे राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे.
संस्थांनी, साहित्यिकांनी, कलावंतांनी आणि मराठीप्रेमींनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन
शासनाच्या निर्णयाविरोधात पाच जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा निर्णय
भविष्यात महाराष्ट्राची मराठी भाषक राज्य म्हणून असणारी ओळख पुसट होणे ही राज्याची सर्वांत मोठी हानी ठरेल, मंडळाचे मत
हिंदी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरेंनी काढलेल्या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही नेता सहभागी होणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी जाहिर केले आहे. हा विरोधी पक्षाने काढलला मोर्चा असल्याचे सांगताना राष्ट्रवादीच्या या बाबत काही भावना व्यक्त करायच्या असतील तर त्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मार्ग काढणार असल्याचे तटकरे म्हणाले.
मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा काढणं ही ही दिशाभूल आहे. खरंतर महायुतीने यापूर्वीच मराठी भाषा कंपल्सरी केलेली आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल न करता हा मोर्चा मागे घ्यावा. अशा पद्धतीची मागणी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. उलट मराठी भाषा कंपल्सरी असताना खर काय आणि खोट काय हे एका व्यासपीठावर येऊन सांगा अस आव्हान ही दिपक केसरकर यांनी दिल आहे.
पनवेल शहरातील तक्का परिसरात स्वप्नालय बालगृहाजवळील फुटपाथवर एक नवजात अर्भक कोणीतरी सोडून गेल्याची घटना घडली. नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांशी संपर्क साधून बाळाला शेजारील सिद्धी क्लिनिक येथे नेले. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आल्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केले. पनवेल पोलिसांकडून या बाळाची काळजी घेतली जात आहे. पोलिसांकडून बाळाच्या आईचा शोध घेतला जात असून, घटनास्थळाच्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने महाराष्ट्र शासन व विविध उद्योग व्यावसायिक संस्था यांच्या समवेत ९ सामंजस्य करारावर कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केल्या तसेच बी.कॉम रिटेल मॅनेजमेंट, बीएससी अप्लाइड बायोलॉजी, बीए ह्युमेनिटीज अँड सिव्हिल सर्व्हिसेस या तीन अप्रेंटिसशिप एम्बेडेड डीग्री प्रोग्रामसह एम ए ट्रायबल अकॅडमी आणि पी जी डिप्लोमा इन एनजीओ मॅनेजमेंट प्रोग्रामच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करुन या अभ्यासक्रमाच्या प्रारंभाची घोषणा करण्यात आली.
भंडारा जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सकाळी ८ वाजतापासून सुरू झालीय. दूध संघाच्या निवडणुकीसाठी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी पक्षांची युती आहे. तर, शिंदेंच्या शिवसेनेची काँग्रेससोबत आघाडी झाली आहे. १६९ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून १२ संचालक निवडून द्यायचे आहेत. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणी होणार आहे. सहकार क्षेत्राच्या या प्रतिष्ठेच्या दूध संघाच्या निवडणुकीत परंपरागत भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होतो की, शिंदे शिवसेना आणि काँग्रेसचा विजय होतो. याकडं आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अभिनेत्री शेफाली जरीवाला हिच काल रात्री निधन झालं. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं. यामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली. शेफाली जरीवालाचा मृतदेह सध्या महापालिकेचा कूपर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला असून मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे
पुणे रेल्वे स्टेशनचं नामांतर संभाजी ब्रिगेडकडून केला जाणार
संभाजी ब्रिगेड कडून राजमाता जिजाऊ रेल्वे स्टेशन नामांतर केलं जाणार
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते रेल्वे स्टेशन परिसरामध्ये दाखल
पुणे रेल्वे स्टेशनच्या नामांतरावरून सुरू आहे वाद
पुण्यातील सिंहगड रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत फोडल्या गाड्या
सिंहगड रोड परिसरात 3 ठिकाणी 17 गाड्यांची तोडफोड
आज पहाटे अज्ञातंकडून करण्यात आली गाड्यांची तोडफोड
दारूच्या नशेत अज्ञात डोळक्याने तोडफोड केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती
पुण्यात सिंहगड रोड परिसरात अज्ञात टोळक्याकडून हैदोस
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अज्ञात टोळक्याचा शोध सुरू
एकेकाळी पवार कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रवीण माने यांचा भाजप प्रवेश..
इंदापूर तालुक्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मास्टर स्ट्रोक..
शरद पवार, अजित पवार यांच्यासह मंत्री दत्तात्रय भरणे व हर्षवर्धन पाटील यांना दिला जाणार शह..
मानेंच्या भाजप पक्ष प्रवेशाने इंदापूर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार..
प्रवीण माने यांनी मागील विधानसभा अपक्ष लढवत मिळविले होते मोठे मताधिक्य..
बीड मधील कोचिंग क्लासेस मध्ये शिकवणी घेणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाप्रकरणी सर्वच पक्ष संघटना आणि पालक आक्रमक आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज शैक्षणिक बंदची हाक देण्यात आली. पालक आणि पक्ष संघटनांच्या कार्यकर्त्यांनी कोचिंग क्लासेस परिसरात घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवला आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप अटक नाहीत.. आरोपींना राजकीय पाठबळ असून कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी पालकांनी केली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आजपासून शहरांमध्ये येणाऱ्या मुख्य रस्त्यावरची सगळी अतिक्रमणा हटवली जाणार आहेत. त्यासाठी महानगरपालिकेने मोठी तयारी केलेली आहे. साडेतीनशेहून अधिक कर्मचारी, 200 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी अधिकारी, २० पेक्षा अधिक जेसीबी, पोकलेन, हायावा, ट्रक्स, ॲम्बुलन्स, अग्निशमन दलाची वाहने, कोंडवाडे असा मोठा फौजफाटा महापालिकेने तैनात केला. आहे थोड्याच वेळात अधिक्रमण हटवा मोहिमेला सुरुवात होईल.
-
- सकाळी १० वाजेपासून गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग घटवला
- २,७२० क्यूसेकवरून २,०४० क्यूसेकपर्यंत विसर्ग घटवला
- सद्यस्थितीत सकाळी १० वाजल्यापासून धरणातून २,०४० क्यूसेक वेगानं विसर्ग
- नाशिकमध्ये गोदावरीची पाणी पातळी देखील होणार कमी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आज नागपूर येथील दीक्षाभूमी येथे भेट दिली..
यावेळी स्तूपातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते कलेक्शन वंदन केले तसेच तथागत गौतम बुद्धाचा मूर्ती फुल अर्पण केले...
ज्यावेळी दीक्षाभूमीच्या बाहेर पडताच त्यांनी खाली पडलेला कचरा दिसतात त्यांनी तो उचलून घेतला आणि डस्टबिन शोधत कचरा टाकण्यासाठी निघाल्यात..
मनोज जरांगे पाटलांनी चलो मुंबईची हाक दिले आहे. मुंबई आंदोलनाच्या नियोजनासाठी आंतरवाली सराटी येथे उद्या 29 जून रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या बैठकीला नांदेड जिल्ह्यातून मराठा समाज बांधव उपस्थित राहणार आहेत. त्या संदर्भात नांदेड येथे बैठक घेऊन नियोजन करण्यात आले आहे.
- माझ्यावर कारवाई झाली मला अपेक्षित होते, त्या कारवाईचे स्वागत करतो
- अन्याय होत असल्याची भावना मांडली की शिवसैनिकांवर अशीच कारवाई केली जाते
- तीस वर्ष कट्टर शिवसैनिक म्हणून काम केल्याचं हे असं फळ मिळालं
- आम्ही गद्दार नाही, खुद्दार आहोत
- माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी नाराज आहे*
नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथील सुमारे २० वर्षांपूर्वी शासनाच्या निधीतून बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीकडे अद्यापही रस्त्याचा अभाव असून, या गैरसोयीमुळे ग्रामस्थांना मृतदेहाच्या अंत्यसंस्कारासाठी इतरत्र पर्याय शोधावे लागत आहेत... याच पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी तलाठी कार्यालयाजवळच मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रशासनाच्या दिरंगाईचा निषेध व्यक्त केला..
विहिरीत डूबून चालकाचा मृत्यू
अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील वऱ्हा गावच्या पंचक्रोशीतील दुर्दैवी घटना...
रवींद्र वाघाडे यांच्या शेतात पेरणी सुरू असताना अचानक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला..
संजय भाकरे या ट्रॅक्टर चालकाचा घटनेत मृत्यू..
मुसळधार पावसानंतर सातपुड्यातील दहेल धबधब्याचे रौद्र रूप...
गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अक्कलकुवा तालुक्यातील दहेल नदीवर आलेल्या पुरामुळे प्रवाहित झाला धबधबा....
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असणाऱ्या दहेल धबधब्याचं रौद्र रूप....
नांदेडमध्ये दमदार पाऊस झाल्यानंतर आता पेरणीची लगबग सुरू झालीय.पेरणीला बैलजोडी नसल्याने आणि ट्रॅक्टर परवडत नसल्याने शेतकरी आधुनिक पद्धतीच्या टोकण पद्धतीने सोयाबीनची पेरणी करताना दिसतायत. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांच्या पेरण्या आता सुरू आहेत. त्यातून शेत शिवारात शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे.
- गंगापूर धरणातून करण्यात येतोय २,७२० क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
- रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा कायम
- पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरण ५९ टक्क्यांपेक्षा अधिक भरलंय
संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला दीडशे कोटी ची जमीन गिफ्ट दिल्याचे प्रकरण
जमीन गिफ्ट देणाऱ्या मीर मोहम्मद अली खानची प्रतिक्रिया समोर
वकील मुजाहिद खान जमीन हडप करणार असल्यामुळे जमीन गिफ्ट दिल्याचा खुलासा
ड्रायव्हर जावेद शेख सोबत आपले घरगुती संबंध असल्याचा मीर मोहम्मद यांचा दावा
वकील मुजाहिद खान पासून जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी जावेदला हिबानामा करून दिल्याचा उल्लेख
विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना नागरिकांनी प्रचंड मतांनी निवडून दिलं. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनाला मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यानं मतदारांचं आभार मानण्याकरिता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडाऱ्यात येत आहेत. मात्र, हवामान विभागानं आज भंडाऱ्यात येलो अलर्ट जाहीर केला असल्यानं या दौऱ्यावर पावसाचं सावट आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता ९२ पोलीस अधिकारी आणि ५६८ पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त भंडाऱ्यात सभास्थळी आणि ठिकठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
एकीकडे सरकार शक्तीपीठ महामार्ग करण्यासाठी ठाम आहे तर दुसरी कडे शेतकऱ्यांचा ही विरोध ठाम आहे . परभणी जिल्ह्यात सोनपेठ, पूर्णा,परभणी अश्या एकूण 3 तालुक्यातून 66 किमी अंतराचा रस्ता जाणार आहे तर 1550 एकर मधून हा शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे जिल्हा बागायत क्षेत्रात असल्या मुळे ह्या महामार्गाला शेतकऱ्याचा महामार्गाला विरोध होत आहे याच अनुषंगाने आज परभणी जिल्ह्यातील नरसिंह पोखर्णी येते शेतकऱ्याची बैठक होणारं आहे . 1 जुलै पासून शक्तीपीठ महामार्गासाठी प्रत्यक्ष निर्णय ला सुरुवात ह्या मोजणीला कसा विरोध करायचा आहे व पुढील दिशा काय आकायची आहे ह्यावर बैठकीत निर्णयं होणार आहे ह्या बैठकीत एकूण 31 गावातून प्रत्येकी 2 शेतकरी उपस्थित राहणार आहेत..याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी..
विरार पूर्वेकडील चंदनसार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, या खड्यांची डागडुजी करावी अशा मागणीसाठी युवा तरुणांनी खड्ड्यातील साचलेले पाणी आपल्या अंगावर ओतून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. चंदसार मार्ग हा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता असल्यामुळे या मार्गावर महामार्गाकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी गर्दी असते,
मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघाताची समस्या निर्माण झाली आहे. याच्याच निषेधार्थ सामाजिक तरुणांनी रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली आहे.
पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांत आज ता.२७ जून सकाळी ६ वाजेपर्यंत एकूण १३.१६ टीएमसी म्हणजे ४५.१३ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. गतवर्षी याच दिवशी फक्त ३.५७ टीएमसी म्हणजे १२.२४ टक्के साठा होता. त्यामुळे यंदा चारपट अधिक पाणी साठले आहे. धरण परिसरात पावसाच्या प्रमाणात वाढ होत असून, मागील २४ तासांत चारही धरणांमध्ये मिळून ४८७ दशलक्ष घनफूट इतकी नव्या पाण्याची आवक झाली आहे.
जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या खत टंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार कल्याण काळे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना काळे यांनी बैठकीत दिल्या आहे.जालना जिल्ह्यात खताची टंचाई निर्माण झाली असून चढ्या दराने शेतकऱ्यांना खत खरेदी कराव लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार कल्याण काळे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन खतटंचाई बाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहे.
लातूर जिल्ह्यात मागच्या 2 आठवड्यापासून पावसाने दडी मारली आहे . यंदा पहिल्यांदाच मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने जिल्ह्यात वेळेवर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या., मात्र मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस होऊनही मागच्या दोन आठवड्यापासून. लातूर जिल्ह्यात पावसाने अक्षरशः पाठ फिरवली आहे. अनेक ठिकाणी कवळी पिके कोमेजू लागली आहेत , तर ,काही ठिकाणी शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीचे संकट देखील ओढावले आहे. जिल्ह्यातील शेतकरी सध्या आभाळाकडे डोळे लावून ,पाऊस कधी पडणार याची वाट पाहत आहे.
आषाढी वारीसाठी शेगाव येथील संतश्रेष्ठ गजानन महाराज यांची पालखी दिंडी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असुन ही पालखी तुळजापूर येथे दाखल झाल्यानंतर तुळजाभवानी मंदीर परीसरात आल्यानंतर मंदीर संस्थानच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी पालखीचे स्वागत केले.यावेळी मंदिर संस्थानच्या वतीने दिंडीतील सर्व वारकऱ्यांसाठी एक वेळच्या जेवणाचा शिधा प्रदान करण्यात आला.गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही भक्तिभावाने जपली गेली तर वारकऱ्यांच्या उपस्थितीने मंदिर परिसर गजबजून गेला होता. विठुनामाच्या गजराने आणि तुळजाभवानी देवींचा जयघोष करत आलेल्या दिंडीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन गेला होता.
एकीकडे 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग नेहमीच चर्चेत राहिला असताना आता महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना समोर आला आहे. रायगड जिल्ह्यातील पेण जवळच्या निगडे येथील पुलावरील काँक्रिटला तडे जाऊन मोठा खड्डा पडल्याच समोर आल आहे. या खड्डयातून लोखंडी शिगा देखील बाहेर पडल्या आहेत. पुलावर दोन ते तीन ठिकाणी हा प्रकार पहायला मिळत असून या खड्डयांमध्ये आदळून वाहनांना अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वर्षभरातच पडलेल्या या खड्डयांमुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जात आहे.
भुसावळ पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी वारीत सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सुविधेसाठी मध्य रेल्वेने दिनांक १ ते १० जुलै या कालावधीत मेरज नागपूर मार्गावर एकेरी विशेष नाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मध्य रेल्वेने ८३ आषाढी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. त्यात का गाडीची भर पडणार आहे.मिरज - नागपूर एकेरी विशेष (क्र ०१२१३) गाडी ८ जुलै रोजी दुपारी १२:५५ वाजता मिरज येथून सुटून, दुसऱ्या दिवशी ९ जुलै रोजी १२:२५ वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर शहरातील एका हॉटेलमध्ये तीन ते चार वेळा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून आरोपीने अत्याचारग्रस्त तरुणीच्या आईकडून सहा लाख रुपये आणि सव्वातोळे वजनाची सोन्याची चेन घेतली. आता मात्र लग्न करण्यास नाकार देत असल्यामुळे अत्याचारग्रस्त तरुणीने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी प्रदीप मुरके राहणार मदनापुर माहूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजेचा शॉक लागून बोईसरमध्ये चार वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू . बोईसर च्या सिद्धार्थ नगर परिसरातील घटना . चार वर्षीय रविकांत जाधव या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू. घरात खेळत असताना शॉक लागल्याची प्राथमिक माहिती. बोईसर शहरात आज दिवसभरात वेगवेगळ्या दोन दुर्घटनांमध्ये चौथ्या चिमुकल्याचा मृत्यू . बोईसरसह परिसरातून हळहळ व्यक्त.
अंबरनाथ शहराच्या अनेक भागांमध्ये पोलिसांच्या ठेकेदाराने खड्डे खोदून ठेवले आहेत. हे खड्डे बुजवण्याची जबाबदारी त्याच ठेकेदाराची असून ठेकेदार मात्र काम होताच पसार झाला आहे. त्यामुळं पोलिसांनी हा ठेकेदार सीसीटीव्हीत कुठे दिसतो का ते बघावं, आणि त्याला शोधून आणत खड्डे बुजवायला लावावेत, अशी उपहासात्मक टीका अंबरनाथकर करू लागलेत. तर काही रिक्षाचालकांनी स्वतःच हे खड्डे बुजवले असून भीक नको पण कुत्रा आवर, असं म्हणायची वेळ सध्या अंबरनाथकरांवर आली आहे.
संगमेश्वर कडवईमधील शेतक-यांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोफत खताचं वाटप करण्यात आलय .सिद्धेश ब्रिद युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या खताचं वाटप करण्यात आलय.गेल्या तीन वर्षापासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत खत उपलब्ध करुन दिलं जातय.एकीकडे जिल्ह्यात खताचा तुटवडा असल्यानं शेतक-यांना खत मिळत नाहीत तर दुसरीकडे सिद्धेश ब्रिद प्रतिष्ठानने उपलब्ध करुन दिलेल्या खतामुळे शेतक-यामधून समाधान व्यक्त होताना दिसतय.जवळपास दोन हजार शेतक-यान या खताचं वाटप उद्योगमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दहा हजार पर्यंत दंड आकारल्याचे अनेक उदाहरणं आपण पाहिले मात्र परभणीच्या मानवत मध्ये एका दुचाकी स्वाराला तेही पेशाने वकील असलेल्या दुचाकी स्वाराला आरटीओच्या मोटार वाहन सहायक निरीक्षकांनी १३ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थेट 22250 रुपयांचा ऑनलाईन दंड ठोठावला आहे.हा दंड चुकीच्या पद्धतीने ठोठावण्यात आला असल्याचा आरोप मानवत येथील वकील विक्रमसिंह दहे यांनी केलाय त्यामुळे हा दंड परत घेण्याची मागणी त्यांनी केली आहे तर दुसरीकडे दहे यांनी वाहतुकीच्या अनेक नियमांचे उल्लंघन केले त्यामुळे हा दंड त्यांना लावण्यात आला असुन तो योग्य आहे त्यांच्याकडे कुठलेही डॉक्युमेंट नाहीत आणि याचमुळे तेरा प्रकारचे दंड लावण्यात आले असल्याचे आरटीओ मधील मोटार वाहन निरीक्षक अर्जुन खिंडरे यांनी सांगितले आहे त्यांच्याकडे जर डॉक्युमेंट असतील तर सात दिवसात त्यांनी आरटीओ कार्यालयात सादर केले तर हा दंड कमी होऊ शकतो असे त्यांनी बोलता खिंडरे यांनी सांगितले
- मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील तिकीट निरीक्षक आलोक कुमार झा यांनी वसूल केला एकाच दिवसात लाखोंचा दंड
- विशेष म्हणजे ट्रेन क्रमांक 03251,दानापूर ते बंगलोर स्पेशल ट्रेन या एकाच गाडीतून तब्बल 220 फुकट्या प्रवाशांकडून अलोक कुमार झा यांनी हा दंड वसूल केला आहे
- एकाच दिवसात फुकट्या प्रवाशांकडून 1.72 लाखांचा दंड वसूल करीत तिकीट निरीक्षक अलोक कुमार झा यांनी दंड वसुलीचा विक्रमच नोंदवला आहे.
- रेल्वेच्या नागपूर मंडळाचे डीआरएम यांनी एक्सवर पोस्ट करीत ही माहिती दिलीय...
जून महिना संपायला आला तरीही नागपुरात या महिन्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ५० टक्के पावसाची नोंद..
येत्या तीन दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याने, यावर्षी जूनमधील पावसाचा बॅकलॉग वाढणार आहे..
नागपूरात आतापर्यंत ७५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे...विशेष म्हणजे याच कालावधीत सरासरी १४८.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो..
विदर्भातील अनेक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे विदर्भातील पावसाची सरासरी सुधारली आहे.. विदर्भात आतापर्यंत १३०.६ मिमी पाऊस नोंदवला गेला आहे... जो सरासरीपेक्षा १३ टक्के कमी आहे...
या कालावधीत विदर्भात सरासरी १४९.७ मिमी पाऊस अपेक्षित असतो..
आता ३० जून ते २ जुलै दरम्यान विदर्भातील जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे..
- देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सकाळी 11 वाजता होणार उद्घाटन
- नागपूर विद्यापीठाच्या 'डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ'च्या परिसरात उभारण्यात आला आहे संविधान प्रास्ताविका पार्क...
- पार्कच्या प्रवेशद्वारावर सांची स्तूप येथील प्रवेशद्वाराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे...
- संविधानातील समता, स्वातंत्र्य धर्मनिरपेक्षता, समाजवाद, बंधुता, न्याय इत्यादी 10 मूल्य म्युरल्सच्या माध्यमातून साकारण्यात आली आहेत...
- भारतीय संविधान हे केवळ विधीक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी नसून ते सामान्य लोकांसाठीही आहे, आणि सामान्य नागरिकांना आपले संविधान समजून घ्यावे या उद्देशातून या संविधान पार्कची निर्मिती करण्यात आली आहे...
- हा संविधान प्रास्ताविका पार्क सामान्य नागरिकांसाठी खुला राहणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.