Maharashtra Live News Update: छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पुण्यात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज गुरुवार, दिनांक २४ जून २०२५, संसदेचे पावसाळी अधिवेशन, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv
Published On

छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पुण्यात

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी घाडगे आज पुण्यात

अजित पवार यांच्याकडून भेटीची वेळ आणि ठिकाण निश्चित झाल्यावर घाडगे मार्गस्थ होणार

28 जुलै पासून विठ्ठल रुक्मिणी विविध पूजांची नोंदणी होणार सुरू

विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या विविध पूजांसाठी भाविकांना पुढील सहा महिन्यांसाठी आगाऊ नोंदणी करण्यात येणार आहे. 28 जुलै पासून ही नोंदणी करता येणार आहे. यामध्ये महानैवद्य पूजेचा नव्याने समावेश करण्यात आला आहे,अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आज येथे दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील धक्कादायक प्रकार; जेवणात आढळल्या अळ्या

22 जुलै रोजी कॅन्टीनच्या जेवणात अळ्या आढळल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

वारंवार हा प्रकार घडत असून विद्यापीठ प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांकडून संताप

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली नाराजी.

महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी गावकरी उतरणार रस्त्यावर

रळीतील व्यापारी महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी आता कन्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थ २५ जुलै रोजी रस्त्यावर उतरणार आहेत.महादेव मुंडे प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी ची नेमणूक करून चौकशी करण्याचे आदेश सरकारने द्यावेत अशी मागणी रास्ता रोकोमध्ये करण्यात येणार आहे.

लाच घेणाऱ्या केडीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

​ठाणे लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई.पालिकेचे ​घनकचरा विभागाचे अधिकारी वसंत देवळूरकर, सुदर्शन जाधव अटकेत. ​आजारी कर्मचाऱ्याला कामावर रुजू करण्यासाठी २० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाची घेतले ताब्यात.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे खान्देशच्या दौऱ्यावर

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे धुळ्याच्या दिशेने रवाना झालेत. प्रसिद्धी माध्यमांशी न बोलताच माणिकराव कोकाटे धुळ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. पुढील दोन ते तीन दिवस माणिकराव कोकाटे खान्देशच्या दौऱ्यावर असणार आहेत.

परभणीतील साई बाबा एम्पोरियमला भीषण आग

वसमत रस्त्यावरील ३ माजली इमारतीत आहे एम्पोरियम

तिन्ही मजल्याला लागली आग

अग्निशमनच्या २ बंबा च्या माध्यमातून आग विझवण्याचे काम सुरू

नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे.

खड्याच्या त्रासाला कंटाळून काँग्रेसचे मिरा-भाईंदरमध्ये हेल्मेट आंदोलन

मिरा-भाईंदर शहरामध्ये रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या विरोधात काँग्रेसने आज आगळं-वेगळं आंदोलन केले. भाईंदर पोलीस स्टेशन ते पालिका मुख्यालय पर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात हातात कुदळ, फावडा, घमेली घेत डोक्यावर हेल्मेट घालत पालिका मुख्यालयच्या गेट बाहेर काँग्रेस कार्यकर्ते यांनी एकत्र जमत घोषणाबाजी करत खड्याचा त्रासा बाबत राग व्यक्त केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण; राहुल गांधींना जामीन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी खासदार राहुल गांधीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याची सुनावणी नाशिक कोर्टात सुरू आहे. आज व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सुनावणी झाली. राहुल गांधी स्वतः VC द्वारे उपस्थित होते. आय एम नॉट गिल्टी" असं राहुल गांधी यांनी कोर्टासमोर उत्तर दिले.

पुण्यातील खडकवासला मतदारसंघाच्या ईव्हीएम मशीनची उद्या पडताळणी होणार

विधानसभा निवडणुकीत पराभव आलेल्या खडकवासला मतदारसंघातील शरद पवार यांचे तत्कालीन उमेदवार राहिलेले सचिन दोडके यांच्याकडून निवडणूक आयोगात पुन्हा मतमोजणी घ्यावी यासाठी अर्ज करण्यात आला होता त्यानुसार आता निवडणूक आयोगाकडून उद्या खडकवासला मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची पडताळणी केली जाणार आहे. उद्या सकाळी ९ वाजता भोसरी येथील गोडाऊन मध्ये होणार आहे मात्र यावर आता सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला आहे. मत मोजणी आणि सीसीटीवी फुटेज देण्यासाठी मागणी केली होती मात्र उद्या जर आमच्या मागणी नुसार पडताळणी केली नाहीतर बहिष्कार घालू अशी भूमिका घेतली आहे

Rain Alert: पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

नागपूर

- पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

- 25 जुलै ला चंद्रपूर ,भंडारा, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला तर इतर जिल्ह्यात ऑरेंज आणि ऍलो अलर्ट जाहीर करण्यात आला

- बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे... त्याचा प्रभाव पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस असणार आहे...

Pandharpur: एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्कार प्रदान

संत नामदेव महाराज यांचे वंशज असणारा नामदास परिवार तसेच प्रसाद महाराज अमळनेरकर , चैतन्य महाराज देगलूरकर , राणा महाराज वासकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान

संत नामदेव महाराज यांची पगडी , सन्मानपत्र, वीणा ,सन्मानचिन्ह , तुळशीहार देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार

पुरस्कार प्रदान करतेवेळी एकनाथ शिंदे यांच्यावर वारकऱ्याकडून पुष्पवृष्टी

एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यासाठी सर्वच संताचे वंशज आणि वारकरी संप्रदायातील बडे महाराज मंडळी उपस्थित

आध्यात्मिक सोहळ्यात एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान

Palghar: गुजराती पाट्यांसंदर्भात मनसे आक्रमक, पालघरमध्ये हॉटेलच्या पाट्यांची तोडफोड

पालघर -

गुजराती पाट्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक

पालघरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हालोली येथील फूड हबच्या पाट्यांची तोडफोड केली

Pandharpur: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल

पंढरपूर -

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपुरात दाखल

संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांना भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे.

संत नामदेव महाराज यांच्या वंशाजाकडून एकनाथ शिंदे यांचा होणार गौरव

Solapur: लातूरमध्ये मारहाण झालेले छावा संघटनेचे नेते विजय घाडगे पाटील हे तुळजापूरहून मुंबईच्या दिशेने रवाना

सोलापूर -

- लातूर येथील मारहाण झालेले छावा संघटनेचे नेते विजय घाडगे पाटील हे तुळजापूरहून मुंबईच्या दिशेने रवाना

- सोलापुरात छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विजय घाडगे पाटील यांचे करण्यात आलं तुळजापूर नाका येथे जोरदार स्वागत

- कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा यासाठी छावा संघटनेचे पदाधिकारी मुंबईत अजित पवारांच्या बंगल्यावर धडकणार

Mumbai: मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू 

नायगाव -

मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील नायगाव हद्दीत दुचाकीचा भीषण अपघात

या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत,

राहुल गुप्ता असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ते मुंबईच्या सांताक्रुज येथे राहणारे होते.

Ajit Pawar: दौंडमध्ये गरज पडली तर मकोकाही लावला जाईल - अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवारांची दौंड गोळीबारावर प्रतिक्रिया

दौंडमधील घटनेत राजकीय हस्तक्षेप होऊन देऊ नका अशा सूचना

दौंडमधील घटनेची मी अधीक्षकांकडून माहिती घेतली आहे

दौंडमध्ये गरज पडली तर मकोकाही लावला जाईल

दौंडमधील गोळीबारात कुणीही जखमी नाही

महिला गोळीबाराच्या आवाजाने बेशुद्ध पडली

Beed: बीड जिल्ह्यातील 36 महाविद्यालयाला विद्यापीठाचा दणका...!

सुविधा नसलेल्या महाविद्यालया मधील पीजी चे ऍडमिशन थांबवण्याचे विद्यापीठाचे आदेश...!

बीड मधील माजी मंत्री माजी आमदार आणि माजी खासदार यांच्या कॉलेजचा ही समावेश...!

बीड मधील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध सौ के एस के काकू सोनाजीराव क्षीरसागर कला महाविद्यालयाला मोठा दणका...!

बीड जिल्ह्यातील बीड आष्टी त्याचबरोबर आंबेजोगाई येथील माजी मंत्री क्षिरसागर माजी आमदार भीमराव धोंडे , भाजपचे आमदार सुरेश धस , दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष आदित्य सारडा यांच्या कॉलेजचाही सहभाग...!

तहसीलदार यांच्या कार्यलाया समोरच रमीचा डाव..

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले त्यामध्ये विधानभवन चालू असतांना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईल वर रमी खेळतांनाचा वीडियो वायरल झाला.. राज्यात शेतकरी हवालदिल आहे, पाऊस नाही त्यामुळे शेतकरी विवंचनेत आहे , सोबतच हुमनी किड़ी सारख्याचा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे, सरकारने आश्वासन दिलेली शेतकरी कर्जमाफी केली जात नाही, हे शेतकर्याचे प्रश्न सोडून कृषिमंत्री कोकाटे विधानभवनात कामकाज चालू असतांना मोबाईल वर रमी खेळतात ही राज्यासाठी आणि या महायुती सरकार साठी शरमेची बाब आहे.. कृषिमंत्री कोकाटे यांच्या या कृतिचा निषेध म्हणून जळगाव जामोद येथे आज राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचे वतीने जळगाव जामोद तहसील येथील तहसीलदार यांच्या कार्यालया समोर पत्ते खेळून निषेध व्यक्त करण्यात आला... दरम्यान कृषिमंत्री यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आलीय ..

Nashik: सुनील बागुल आणि मामा राजवाडे यांचा रविवारी भाजपमध्ये होणार प्रवेश...

- ठाकरेंचे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे भाजप कार्यालयात दाखल...

- भाजप कार्यालयात कोर कमिटीच्या बैठकीला बागुल आणि राजवाडे देखील उपस्थित...

- कोर कमिटीच्या बैठकीत आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, शहराध्यक्ष सुनील केदार आणि माजी आमदार बाळासाहेब सानप उपस्थित...

- रविवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये होणार अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा प्रवेश...

- भाजप कोर कमिटीचे सदस्य आणि पक्षप्रवेश करणाऱ्या नेत्यांमध्ये एकत्रित बैठक सुरू...

- पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोरदार तयारी सुरू...

- भाजप प्रवेशाची जागा निश्चित आणि नियोजनासाठी बैठक सुरू

Nashik: नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर शेतकऱ्यांचं चक्का जाम आंदोलन

- नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर महिरावणीमध्ये चक्का जाम आंदोलन

- शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक

- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी सरकारने कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण करण्याची मागणी

- बैलं आणि ट्रॅक्टर घेऊन शेतकरी रस्त्यावर उतरले

- रस्त्यावर पत्त्यांचा डाव मांडून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध

साईबाबांच्या बदनामी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल...

संत युवराज यांच्यावर शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

संत युवराज यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्तांमध्ये तीव्र संताप...

साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल...

भारतीय न्याय संहिता कलम 302, 353(2) प्रमाणे गुन्हा दाखल...

साईबाबांची बदनामी आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी दाखल करण्यात आला गुन्हा...

प्रहार जनशक्ती पक्षाकडून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन

शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आज मुंबई-अहमदाबाद महामार्गावर जोरदार चक्काजाम आंदोलन छेडले. गुजरात दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर हे आंदोलन करण्यात आले... राज्यभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्या, विशेषतः पूर्ण कर्जमाफी, या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे..पक्षाने इशारा दिला आहे की, सरकारने त्वरित निर्णय न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल.

Prahar: प्रहार संघटनेतर्फे नंदुरबार तालुक्यातील कार्ली फाट्याजवळ रास्ता रोको आंदोलन...

एकूण 17 मागण्यासाठी चक्काजाम आंदोलन....

पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा देण्याची मागणी....

विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेतर्फे नंदुरबार तालुक्यातील कार्ली फाट्याजवळ रास्ता रोको.

चक्काजाम आंदोलनामुळे त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांचे रांगच रांग...

आंदोलनात मोठ्या संख्येत दिव्यांग बांधवांची उपस्थिती....

जाहीरनाम्याचे शासनाला विसर पडला असल्याचा आंदोलकांचा आरोप....

गेल्या सहा महिन्यापासून बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन. सातबारा कोरा यात्रा असेल तरीही त्यावर उपाययोजना नाही....

मागण्या मान्य नाही झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा.....

दारव्हा ते कारंजा मार्गावर शेतकऱ्यांचा चक्का जाम आंदोलन सुरू

दारव्हा तालुक्यातील भांडेगाव येथे दारव्हा ते कारंजा मार्गावर चक्का जाम आंदोलन

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात प्रहारच्या वतीने चक्का जाम आंदोलनाची दिलीये हाक

दारव्हा ते कारंजा मार्ग शेतकऱ्यांनी धरला रोखून,रस्त्यावर संपूर्ण वाहतुक ठप्प

दारव्हा तालुक्यातील भांडेगाव इथे कारंजा मार्ग धरला रोखून,सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक भाजपमध्ये

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू तथा माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत भाजप पक्ष कार्यालयात भाजपात पक्षप्रवेश केला.ययाती नाईक यांच्या भाजपमध्ये आल्याने पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Prahar: कर्जमाफीसाठी प्रहारचा रस्त्यावर एल्गार...

शिर्डी शहरात नगर मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन...

शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहारचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर...

प्रहारच्या आंदोलनाला महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोक स्वराज्य आंदोलन आणि इतर विविध संघटनांचा पाठिंबा...

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी अडवला नगर मनमाड महामार्ग...

महायुती सरकार आणि कृषीमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी...

नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्याचा रास्ता रोको

शेतकरी कर्जमाफी सह इतर मागण्यासाठी शेतकरी आक्रमक.

शेतकऱ्यांनी दोन तासापासून नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला.

रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा.

शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे शेतीचे काम रोजगार हमी योजनेअंतर्गत झाले पाहिजे यासह विविध मागण्यासाठी हा रास्ता रोको आंदोलन.

Washim: वाशिममध्ये प्रहारच्या वतीने रास्ता रोको आंदोलन..

वाशिममध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील पुसद नाका येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले, शेतकरी कर्जमाफी सह शेतमजूर, दिव्यांग,मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या विविध मांगण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला –हैद्राबाद मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. जवळपास अर्धातास चाललेल्या आंदोलनामूळे वाहतूक चांगलीच खोळंबली होती. वाहनाच्या रांगा लागल्याच बघायला मिळालं.

प्रहार संघटनेच्या वतीने ठिकठिकाणी आज चक्काजाम आंदोलनाचा इशारा

नागपुरात ऑटोमॅटिव्ह चौकामध्ये चक्काजाम करत आंदोलनाचा इशारा दिलाय..

शेतकऱ्यांची कर्जमाफीसह दिव्यांग यांच्या विविध मागण्यांना धरून बच्चू कडू यांचे टप्प्याटप्प्याने आंदोलन होत आहे..

सराफ दुकान फोडणारे आरोपी जेरबंद_14 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

श्रीरामपूर येथील सराफ दुकान फोडणाऱ्या 4 आरोपींना अहिल्यानगराच्या स्थानिक गुन्हे शाखेने जालना येथून जेरबंद केलंय.. आरोपींकडून 11 किलो चांदीसह 14 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.. 17 जुलै रोजी चोरट्यांनी सराफ दुकानाचे शटर तोडून लाखोंचा ऐवज लुटला होता...

वसमत बाजार समिती मध्ये आर्थिक घोटाळा, शेतकऱ्यांचे पैसे मिळत नसल्याने बाजार समिती बंद

हिंगोलीच्या वसमत बाजार समितीमध्ये हळद विक्री केलेल्या शेतकऱ्यांचे अडत व्यापाऱ्याकडून पैसे मिळत नसल्याने हळद विक्री केलेले शेतकरी संकटात सापडले आहेत तर बाजार समिती मार्फत अडत व्यापाऱ्यांकडून खरेदीदारांनी मालाची खरेदी केल्यानंतर गेल्या 60 दिवसांपासून पैसे दिले नसल्याने शेतकऱ्यांचे पैसे रोखल्याचे आडत व्यापारी सांगत आहेत दरम्यान या सगळ्या आर्थिक अडचणीमुळे अडत व्यापाऱ्यांनी 19 तारखेपासून आपली दुकाने बंद ठेवली आहेत.

येरवड्यात कचरा वेचणाऱ्या महिलांना गुंडाकडून अमानुष मारहाण..

मारहाण करताना चा व्हिडिओ सोशल माध्यमावर व्हायरल..

पुरुषाकडून महिलांना मारहाण झाल्याने नागरिकात संताप.

शिंदे सेनेचे शहरप्रमुखांच्या बजाज नगर येथील हॉटेलमधून विदेशी दारू जप्त

-

- शिंदे सेनेचे शहर प्रमुख मंगेश काशीकर यांच्या बजाज नगर मध्ये अपना धाबा नावाने हॉटेल आहे..

- त्या ठिकाणी ग्राहकाना त्या विदेशी दारू पुरवली जात असल्याच्या माहितीच्या होती. पोलिसांनी धाड टाकून ही कारवाई करण्यात केली..

- तसेच मंगेश काशीकर आणि सहकारी सुशील दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला..

- यासोबतच रात्री बकासुर रेस्टॉरंट वरही धाड टाकून कारवाई करण्यात आली..

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल पिढीत 23 युवक युवतींना पहिल्यांदाच थेट पोलीस जवानांची नियुक्तीपत्र

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही योजना सुरू करण्यात आली असून काल नियुक्तीपत्र दिल्यानंतर आज ते 23 नक्षल पिढीत पोलीस पदावर रुजू झाले

नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या हल्ल्यात यांच्या कुटुंबातील मुख्य व्यक्तींची हत्या केली होती

यांना कोणताही पाठिंबा नसताना गडचिरोली पोलिसांनी यांच्या पाठीशी राहून मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली

थेट गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे यांना घरातून निमंत्रण देऊन बोलवण्यात आले व थेट नियुक्तीपत्र यांच्या हातात

16 वर्षीय चिमुकलीचा बलात्काराने हादरला सातपुडा...

शारीरिक संबंध ठेवायचे सांगत तिच्या अंगावरील कपडे फाडले, तिने पांगरलेला टॉवेल फाडून हातपाय बांधत तिला उचलून नेल, पुढे जे घडलं ते भयानकच....

मोलगी पोलीस स्टेशन हद्दीतील कंकाळा गावाजवळ एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना....

16 वर्षीय अल्पवयीन पीडितेला बळजबरीने झाडाझुडपात ओढत नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार...

बलात्काराची घटना सांगितल्यास अल्पवयीन पीडीतेला जिवे मारण्याची धमकी...

Shirdi: शिर्डीच्या साई संस्थानला पुन्हा धमकीचा मेल...

साई मंदिर आणि त्यातील खोल्यांमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल...

भगवंत मन नावाने साई संस्थानला मेल...

bhagvanthmann@yandex.com या आयडीवरून साई संस्थानला धमकीचा मेल...

भाविक आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ मंदिरातून बाहेर काढण्याचे मेलमध्ये नमूद...

साई संस्थानकडून शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल...

साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर...

दोन महिन्यांपूर्वी देखील आला होता साई मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा मेल...

आता पुन्हा धमकीचा मेल आल्याने खळबळ...

खोडसाळपणा की आणखी काही याबाबत शिर्डी पोलिसांकडून तपास सुरू.

हडपसर मतदारसंघाची मतपडताळणी रद्द राज्य निवडणूक आयोगाचा आदेश

हडपसर मतदारसंघातील निकालाबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकेचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.त्यामुळे हडपसर मतदारसंघाची शुक्रवारी होणारी मतपडताळणी तूर्त करू नका,' अशा शब्दांत राज्य निवडणूक आयोगाने मत नोंदवले. Lत्यामुळे 'हडपसर मतदारसंघाची मतपडताळणी होणार नाही.

केवळ खडकवासला मतदारसंघातील मतांची पडताळणी होईल असे जिल्हा निवडणूक शाखेने सांगितले.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत हडपसर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँगेस शरद पवार गटाचे पराभूत उमेदवार प्रशांत जगताप यांनी निकालासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

ही याचिका अद्याप निकाली काढण्यात आली नसल्याचे जगताप यांनी निवडणूक शाखेच्या निदर्शनास आणून दिले होते.

तानाजी सावंत यांच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे आठ कोटी  थकवले

धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे आठ कोटी सोळा लाख थकवले

थकित ऊस बिलाचा प्रश्न घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रणजीत पाटील साखर आयुक्तांकडे

सात दिवसात उसाची थकीत बिले मिळाली नाही तर साखर आयुक्तलयात आमरण उपोषणाचा इशारा

तानाजी सावंत यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या धाराशिव जिल्ह्यातील कारखान्यात एकूण आठ कोटी 16 लाख थकीत असल्याच साखर आयुक्त यांना दिलेल्या पत्रात रणजीत पाटलांकडून माहिती

सोलापुरात होतोय 11000 घरांचा प्रकल्प

सोलापूर शहरातील कसबे सोलापूर, अंत्रोळीकर नगर आणि मजरेवाडी अशा तीन ठिकाणी मिळून 11हजार 107 घरे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कसबे सोलापूरमध्ये सर्वात मोठा 6 हजार 925 घरांचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. सध्याच्या महागाईत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र कमी उत्पन्न असलेल्या समाज घटकाचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाच्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाने प्रधानमंत्री आवास योजना सर्वांसाठी घर योजना आणली. त्या अंतर्गत सोलापूर शहरात 3 ठिकाणी तब्बल 11 हजार घरांचा प्रकल्प साकारत आहे. त्यापैकी कसबे सोलापूर आणि मजरेवाडी या दोन ठिकाणच्या प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

नाशिकच्या अंबड मध्ये टोळक्यांचा धुमाकूळ.. घटनेचा विडिओ सोशल मिड्यात वायरल

नाशिकच्या अंबड परिसरातील फडोळ मळा येथे चहाच्या दुकानासमोर दोन टोळक्यांमध्ये झालेल्या जोरदार हाणामारीमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले. मारहाणीची घटना मोबाईल मध्ये कैद झाली आहे. बुधवारी सायंकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास अंबड परिसरात घडलेल्या या प्रकारात दोन ते तीन जण जखमी झाले असून, काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याची माहिती मिळत आहे.

मालवण मसुरे गावात शिवसेना ठाकरे गटाला शिंदेच्या शिवसेनेने दिला धक्का

मालवण मसुरे गावात शिवसेना ठाकरे गटाला शिंदेच्या शिवसेनेने धक्का दिला आहे. मसुरे विभागप्रमुख तथा उपसरपंच राजेश गावकर यांनी असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थासह आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला धक्का मसुरे गावात धक्का बसला आहे. या प्रवेशानंतर आमदार निलेश राणे यांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत अशी संघटना वाढवणार आहे. राज्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष करणार असा निर्धार व्यक्त केला.

टाळ मृदूंगाच्या गजरात श्रीच्या पालखीचे विदर्भाच्या प्रवेशद्वारी आगमन

संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या परतीच्या दिंडी सोहळ्याचे जिल्ह्यात आगमन झाले. सिंदखेडराजा तालुक्यातील माळ सावरगाव येथे विदर्भाच्या सीमेवर दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले. हजारो भाविकांनी दर्शन घेऊन भावपूर्ण वातावरणात सहभाग नोंदवला. १० जुलै रोजी पंढरपूर येथून परतीचा प्रवास सुरू झाल्यानंतर दिंडी काल सायंकाळी माळ सावरगाव येथे दाखल झाली. असंख्य भाविकांनी दिंडीचे स्वागत केले.... विसाव्यासाठी सिंदखेडराजा येथील जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणात दिंडी सोहळा थांबविण्यात आला आहे. आता पुढील मुक्काम् हा बिबी येथे राहील. दिंडी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूकही वळविण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.. 30 जुलै ला शेगावात पालखी पोहोचणार आहे

अघोरी कृत्य करणारा भोंदू जेरबंद; टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

अघोरी कृत्याने भक्तांना आकर्षित करणाऱ्या माढा तालुक्यातील अरण येथील एका अघोरी बाबाला पोलिसांनी अटक केली आहे . राहुल रामचंद्र शिंदे (वय ३१)असं या अघोरी बाबाचं नाव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो पूजा हवनच्या नावाखाली भक्तांची दिशाभूल करत होता. त्याच्या ताब्यातून काळे तीळ, काळ्या बाहुल्या असे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी माढा न्यायालयाने त्यास उद्या पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

भाजप आमदार प्रवीण दटके आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांना न्यायालयाचे समन्स

* भाजप आमदार प्रवीण दटके आणि काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांना न्यायालयाचे समन्स.. आठ आठवड्यात उत्तर सादर करण्याचे न्यायालयाचे निर्देश...

* नागपूर पश्चिम मधून विजयी झालेले विकास ठाकरे यांच्याविरुद्ध प्रीतम खंडाते तर मध्य नागपूर मधून विजयी झालेले प्रवीण दटके यांच्याविरुद्ध विकास इंडिया पार्टीचे उमेदवार मो. इम्रान मो. हारून कुरैशी यांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे...

* विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला त्यामुळे त्यांची निवड रद्द करून पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली आहे..

1 जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची यादी ग्राह्य

- आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंत नोंदणी केलेल्या मतदारांची यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बैठकीत दिल्या सूचना...

- पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेतला. त्यामध्ये 55 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची ही माहिती जाणून घेतली,

- निवडणुकीत मतदानाचा हक्क सुलभपणे बजावता यावा, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक निर्भयपणे पार पडावी, यासाठी राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नागपुराततील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेत सूचना दिल्यात..

- तसेच मध्य प्रदेश निवडणूक आयोगात करार करून 50 हजार कंट्रोल युनिट तसेच एक लाख बॅलेट युनिट मागणी करण्यात येणार असल्याची सांगितलं..

-

यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक भाजपमध्ये

राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचे मोठे बंधू तथा माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे पुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ययाती नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या हस्ते नवी दिल्लीत भाजप पक्ष कार्यालयात भाजपात पक्षप्रवेश केला.ययाती नाईक यांच्या भाजपमध्ये आल्याने पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

चोरांनी पळविलेले ३३ मोबाईल सापडले जळगाव पोलिसांची कारवाई

जळगावशहरासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील आठवडे बाजारातून चोरीस गेलेले ३३ मोबाईल एमआयडीसी पोलिसांनी शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत. चोरीला गेलेला मोबाईल मिळतच नाही, हा सर्वसामान्यांचा समज पोलिसांनी खोडून काढला आहे.गेल्या तीन-चार महिन्यांत विविध ठिकाणाहून आणि विशेषत आठवडे बाजारातून चोरीला गेलेल्या मोबाईलचा एमआयडीसी पोलिसांनी शोध लावला असून, चोरट्यांनी जप्त केलेले एकूण ३३ मोबाईल मूळ मालकांकडे सोपविण्यात आले. पथकाने एका गुन्ह्याच्या तपासात मोबाईल चोरट्याला अटक करून हे मोबाईल जप्त केले होते.

Maharashtra Live News Update: महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून विशेष पथकाची नियुक्ती

परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केलाय. स्थानिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग केल्यानंतर प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलीय. या पथकात एकूण 9 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

शहापूर चोरांचा सुळसुळाट चोरी करणाच्या उद्देशाने आलेले चोर सीसीटीव्ही कॅमेरेत कैद.

शहापूर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात चोरांचा सुळसुळाट सुटला आहे. चोरी करण्यासाठी आलेले चोर इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाले आहे. शहापूर तालुक्यातील गोठेघर येथील चिंतामणी प्लाझा येथे रात्री २.४५ वाजता ४ व्यक्ती चोरीच्या उद्देशाने आले होते मात्र प्रत्येक इमारतीच्या दरवाजेंना डिजिटल लाॅक असल्यामुळे त्यांना काही करता आले नाही हे चोर गोठेघर येथील चिंतामणी प्लाझा मध्ये वावरत असल्याने त्यांची संपूर्ण हालचाल इमारती मध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरेत कैद झाल्याने हे चोर चोरीच्या उद्देशाने इकडेतिकडे वावरत असल्याचे दिसून आले.

BMC च्या निविदांतील कलम 10.27 मुळे कोट्यवधींच्या महसुलाला धोका!

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) रस्त्यांच्या निविदांमधील कलम 10.27 चा गैरवापर करून पालिकेचा महसुलाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेविका शीतल अशोक म्हात्रे यांनी केला आहे. शीतल म्हात्रे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी, कलमात सुधारणा, स्वतंत्र ऑडिट, आणि दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, "ही सार्वजनिक संसाधनांची लूट आहे. BMC आणि शासनाने तत्काळ पावले उचलली पाहिजेत." याविरोधात शितल मात्रे ह्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मास्टर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी देखील करणार आहे.

भंडाऱ्यात सर्वदूर रात्रभर पावसाची हजेरी

भंडाऱ्यात रात्रभर सर्वत्र जोरदार पावसानं हजेरी लावली. जिल्ह्यातील सातही तालुक्यात कुठं हलका तर, कुठं मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रात्रभर सुरू असलेला हा पाऊस पहाटेपर्यंत पडला. अनेक भागातील भातपीक लागवड थांबली होती, या पावसानं उर्वरित भागातील भातपिकांची लागवड आता जोमात होईल. या पावसानं शेतकरी चिंतामुक्त होईल, अशी आशा आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा पहापटेपासून जोर कमी झाला असून आता पावसाची रिपरिप सुरू आहे.

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन

अमरावती ,चांदूरबाजार, संभाजीनगर, लातूर आणि नांदेड मधील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार...

बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी खासदारांचा पाठिंबा मनसेनेही दिला बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा...

बच्चू कडू आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पुणतांबा या गावात भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार आगामी काळामध्ये शेतकरी संपाबाबत चर्चा करणार

हल्ल्यात वन व पोलीस विभागाच्या आठ ते दहा गाड्या फोडल्यात तर 18 पोलीस व वनविभागाचे कर्मचारी जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील मोहेगाव माळेगाव या वनपरिक्षेत्रात अनेक वर्षांपासून वन जमिनीवर अतिक्रमण करून काही नागरिक राहत होते अनेकदा वनविभागाने या नागरिकांना नोटीसही दिले होत्या मात्र अतिक्रमण धारकांवर उन्हाळा किंवा हिवाळ्यात कारवाई करण्याऐवजी वन विभागाने भर पावसाळ्यात या अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्याची मानवी संवेदनहीन कृती केली आणि यातूनच अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या व पोलीस विभागाच्या पथकावर सशस्त्र हल्ला केला या हल्ल्यात वन आणि पोलीस विभागाचे 17 ते 18 कर्मचारी जखमी झाले असून पोलीस आणि वनविभागाच्या जवळपास आठ ते दहा गाड्याही फोडण्यात आल्या हल्ला झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक निलेश तांबे हे अतिरिक्त पोलीस फौज फाटा घेऊन घटनास्थळी पोहोचले मात्र वनविभागाने भर पावसाळ्यात अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्याची केलेली सक्ती ही त्यांच्याच अंगलट आल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात दिसत आहे त्यामुळे वन विभागाची मानवी संवेदनाहीन कृती समोर आल्याचा बोलल्या जात आहे.

मिरवणूक काढणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

उल्हासनगर मधील रमाबाई टेकडी परिसरात दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाला लोखंडी तलवार आणि रॉडने मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या दिवाकर यादव सह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. मात्र दिवाकर यादव याचा जामीन झाल्यावर त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत ढोल ताशा सह मिरवणूक काढली होती या मिरवणुकीचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर गुन्हेगारांचा उदातीकरण होतंय का काय असा सवाल विचारला जात होता तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं , यानंतर पोलिसांनी या मिरवणुकीत सहभागी असलेल्या दिवाकर यादव सह इतर जणांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे यानंतर पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्या ठिकाणी नेऊन त्यांची धिंड काढली मात्र आपण आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना घटनास्थळी पंचनामा आणि या गोष्टीच्या अनुषंगाने त्या आरोपींना घेऊन गेल्याचं सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितलं,

अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक आणले अलीकडे

राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने बुधवारी सायंकाळी इयत्ता अकरावीच्या तिसऱ्या नियमित फेरीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या सुधारित वेळापत्रकानुसार आता तिसऱ्या फेरीची गुणवत्ता व निवड यादी आणि महाविद्यालयांचा कट-ऑफ उद्या जाहीर होणार आहे. तर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उद्या आणि परवा यावेळी महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.

इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला होणारा विलंब लक्षात घेता, अखेर शिक्षण विभागाने ही प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक अलीकडे आणले आहे. इयत्ता अकरावीच्या तिसऱ्या नियमित फेरीत जवळपास १३ हजार ६२१ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नव्याने नोंदणी केली आहे. तर केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत चार लाख १० हजार ४९८ विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग दोन म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदविला आहे.

खडकवासला धरणक्षेत्रात ८०.९८ पाणीसाठा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात २३.६०टीएमसी पाणीसाठा म्हणजे ८०.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध

गेल्या यावर्षी याचवेळी धरणात १७.९८ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ६१.१२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता

गेल्यावर्षी याचवेळी पेक्षा ७ टीएमसी पाणीसाठा जास्त

खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत,वरसगाव,टेमघर हे धरण येतात.

यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रता पाणीसाठा वाढला

खडकवासला धरणक्षेत्रातून ५ टीएमसी पेक्षा जास्त पाणी मुळा मुठा नदीत विसर्ग करण्यात आले आहे.

खडकवासला १.०५ टीएमसी

पानशेत ८.७५ टीएमसी

वरसगाव ११.०१ टीएमसी

टेमघर २.८० टीएमसी

नागपूर वस्तीगृहात शिरून मुलीचा विनयभंग प्रकरणात आरोपीचा शोध सुरू

- नागपूर शहरातील हिंगणा मार्गावर असलेल्या ओबीसीं मुलींच्या वस्तीगृहात शिरून मुलीचा विनयभंग प्रकरणात आरोपीचा शोध सुरूच...

- गृहपाल उज्वला पाटील, सुरक्षा रक्षक रेखा आवरील बडतर्फ...

- नऊ महिन्यापूर्वीच मुलींसाठी हे वसतिगृह सुरू करण्यात आले.. मात्र सात महिने होऊनही सुरक्षारक्षकाची नेमणूक नव्हती आणि सीसीटीव्ही नव्हते...

- या ठिकाणी 64 मुली राहत असताना अनेक मुलींच्या खोलींना आत्महत्या असणाऱ्या कडी सुद्धा तुटला असलं तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पाहणीत दाखवलं.

- या घटनेचे सामाजिक संघटनांनी दाखल घेतल्यानंतर तसेच या ठिकाणी कार्यरत असलेल्या गृहपाल उज्ज्वला पाटील आणि सुरक्षा रक्षक म्हणून तैनात रेखा आवारी यांनी कर्तव्यात हयगय केल्याने बडतर्फ करण्यात आले. चार सीसीटीव्ही तातडीने लावण्याचा सूचना दिली...प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर यांनी दिलीय..

श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं

- बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी

- श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार

- तर प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडं राहणार

- श्रावणात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद

- तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था

- दर्शनासाठी आलेल्या भाविकांना राजगिरा लाडूचा प्रसाद मिळणार

सोलापूर : बादोला ते बोरगाव देशमुख मार्ग पावसामुळे बंद,नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू

अक्कलकोट तालुक्यातील बादोला ते बोरगाव देशमुख दरम्यानच्या मार्गावर काल संध्याकाळ पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रस्त्यावरील पाण्याचा जोर वाढत असूनही नागरिक जीवाची पर्वा न करता पाण्यातूनच धोकादायक प्रवास करत आहेत,ही बाब चिंताजनक असून प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे.

जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या.

जल जीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदाराची आत्महत्या. वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथे कंत्राटदार हर्षल पाटील ,वय 35 या तरुणाने गळफास घेऊन केली आत्महत्या. जल जीवन मिशन योजनेचे काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्याच्या कारणातून संपवले जीवन.

1 कोटी 40 लाखांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याने हर्षल याने उचलले पाऊल. बिले वेळेत मिळत नसल्याने,मानसिक त्रासाला कंटाळून स्वतःच्या शेतात गळफास घेऊन केली आत्महत्या. हात उसने आणि सावकारांच्याकडून घेतलेले पैसे परतफेड कशी करायची आणि बिल मिळत नसल्याने आत्महत्या केल्याचा कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलींद भोसले याचा आरोप.

कुरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील याबाबत अधिक तपास करत असून आत्महत्या नेमकी का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे अशी माहिती पूर्ण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांनी दूरध्वनी द्वारे दिली आहे अधिक तपास करत आहे

मात्र या घटनेमुळे संपूर्ण तांदूळवाडी गावावर शोककळा पसरली आहे

हर्षल पाटील यांना त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे

कल्याण तरुणी मारहाण प्रकरण

मराठी एकीकरण समिती पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतली पोलिसांची भेट

मानपाडा पोलीस ठाण्याचे सीनियर संदीपपान शिंदे यांची भेट घेत दिले

निवेदन

निवेदन देण्यासाठी दोन महिन्यापूर्वी कल्याण पश्चिम मध्ये परप्रांताकडून मारहाण झालेल्या देशमुख कुटुंब देखील सहभागी

यावेळी मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मराठी माणसाच्या पाठी आम्ही नेहमी उभे राहणार

यापुढे परप्रांती गुन्हेगारांनी माज केला तर पोलिसांनी त्यांची धिंड काढावी

न्यायालय मध्ये गेल्यावर गुन्हेगार लगेच सुटतो अशामध्ये मराठी माणूस सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न उपस्थित होते आहे

संबंधित आरोपीला देखील पोलिसांनी त्याची पोलीस कोठडीत असल्यापर्यंत त्याची धिंड काढावी

आमचे राज्यकर्ते आहेत आता कुठे आहे

बाहेरून येऊन या ठिकाणी परप्रांती जे त्या ठिकाणी गुन्हे करून या ठिकाणीही गुन्हेगारी करतात पोलिसांनी त्यांची माहिती घ्यावी

कायदा सुव्यवस्थेचे भीती यांना राहिली नाही यापुढे अशा घटना घडल्या तर मराठी एकीकरण समिती देखील गप्प बसणार नाही .. असा इशारा पोलिसांना एकीकरण समितीकडून देण्यात आला आहे

ऑनलाइन गेमच्या नादात बागायतदार तरुणाने गमावले 84 लाख रुपये

ऑनलाइन रमी गेम खेळून टाइमपास होतो आणि त्यातून पैसे मिळतात या लालसेपटी जयकुमार जाधव याने ऑनलाईन गेम खेळण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला पहिल्याच गेम मध्ये तो पाच हजार रुपयात 50 हजार रुपये जिंकला. आणि पाहता पाहता जयकुमार हा 84 लाख रुपये कर्जाच्या डोंगराखाली दाबला गेला. गेम खेळण्यासाठी त्याने अक्षरशः त्याच्या घरच्यांना धुळकावून त्याची बागायती शेती आणि महागडी चार चाकी कार सावकाराकडे गहाण ठेवली. मात्र सुदैवाने जय कुमारच्या मित्राने त्याला या गेमच्या नादातून बाहेर काढल्याने तो आज पिंपरी चिंचवड शहरात यशस्वीरित्या आपला रिअल इस्टेटचा व्यवसाय करत आहे. रियल इस्टेटचा व्यवसाय करून जयकुमार जाधव यांनी जवळपास 60 लाख रुपये कर्ज फेडलाआहे.

पुढील 24 तासासाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात ऑरेंज अलर्ट गदेण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रारंभिक प्रक्रिया सुरू

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर गृह मंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे यास अधिकृत मान्यता दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या निवडणुकीचे आयोजन ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ व त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली, १९७४’ च्या अधीन राहून केले जाते.

दीड कोटींच्या थकित बिलासाठी कंत्राटदाराची गळफास घेऊन आत्महत्या..

दीड कोटींचे थकीत बिल मिळत नसल्याने राज्य सरकारच्या जल जीवन मिशन योजनेच्या एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या खेळाचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी या ठिकाणी घडला आहे.हर्षल पाटील ,वय 35 असे,या तरुण कंत्राटदाराचं नाव आहे. हर्षल यांनी आपल्या शेतातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

कोलपल्ली नाल्याच्या पुरात अडकलेले ग्रामसेवक उमेश धोडरे यांना जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेने वाचवले

गडचिरोली मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे हे सायंकाळी ६.०० वाजताच्या सुमारास कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात अडकले. चारचाकी वाहनासह नाला ओलांडत असताना वाहनाला जोरदार पाण्याचा लोंढा लागला आणि वाहन वाहून गेले. मात्र, प्रसंगावधान राखत धोडरे यांनी एका झाडाला धरून ठेवले. या घटनेची माहिती मिळताच, महसूल विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अतिशय काळजीपूर्वक आणि समन्वयाने बचाव कार्य राबवून धोडरे यांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून घरी रवाना करण्यात आले.

धुळे पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले

धुळे पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले

चोरट्यांनी धुळे शहरातील सावरकर पुतळा परिसरात गोळीबार करून लंपास केले व्यापाऱ्याचे सोन्याचे दागिने

बंदुकीच्या आवाजाने परिसरात उडाली खळबळ

देवपूर पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल होत करण्यात आला पंचनामा

देवपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी करण्यात आला गुन्हा दाखल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com