

उल्हासनगरचे राजकारण आणि कलानी कुटुंब हे समीकरण गेल्या अनेक दशकांपासून कायम आहे. मात्र, आता याच गडाला राष्ट्रवादी शरद पवार गटानं सुरुंग लावला आहे.
सोलापूर महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सामुदायिक विवाह सोहळा घेतला आहे त्याच कौतुक आहे.
रस्त्यावरून श्रेवादाचा वाद
सोलापूरच्या जनतेने कन्फ्युज व्हायचं बिलकुल कारण नाही..
आदरणीय ताईसाहेब यांनी दिल्लीच्या रस्त्यांचा विचार करावा. राहुल गांधींच्या घरी चांगला रस्ता जातो त्या रस्त्याचा त्यांनी विचार करावा
सचिन कल्याणशेट्टी आणि सुभाष देशमुख यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो आता मंजूर झाला आहे
भाजप पक्षांकडून मोठ्या प्रमाणात विकास केला जातोय..
सुमारे ४ लाख ८० हजार रुपयांची बियाणे आणि चारचाकी असा एकूण १० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त. विनापरवाना बियाण्यांची वाहतूक सुरू असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. यानंतर सापळा रचून कृषी विभागाने लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भोंदू बाबा मनोहर भोसले याला पुणे येथून अटक करून रात्री कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात आणले असताना आरोपींना मोबाईल वरून बोलण्यासाठी मोबाईल देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस नाईक म्हणून कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या बाळासाहेब दाढे असं त्या निलंबीत कर्मचार्याचं नाव आहे
अवकाळी पावसाचा महाड तालुक्यातील गावांना फटका
० महाड तालुक्यातील जिते, खैराट, टेमघर, बिरवाडी, खरवली गावातील घरांवरील छप्पर उडून मोठे नुकसान...
० अनेक भागात विद्युत वाहिनीच्या तारा पडल्याने विजेचा खोळंबा.....
० दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान महाड शहर परिसरात वादळी वारे तर महाड तालुक्यातील बिरवाडी आणि वरंध परिसरात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने घरांचे मोठ नुकसान
तळोजा एमआयडीसीमध्ये राज इंडस्ट्री केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना
आग लागल्याने तळोजा एमआयडीसीमध्ये भीतीच वातावरण तयार झाले
आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये
अग्निशामक दलाने आपले शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवून आगीवर नियंत्रण मिळवलं
या घटनेत अद्यापही कोणती जीवित हानी झालेली नाहीये
दक्षिण रायगडमध्ये जोरदार अवकाळी पाऊस
० दक्षिण रायगडमधील महाड तालुक्यातील बिरवाडी, वरंध विभागात जोरदार पाऊस
० महाडमध्ये वादळी वारे
० अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आंबा उत्पदक, विट व्यवसायीकांचे मोठे नुकसान होण्याची भिती
सकाळपासूनच कल्याण-डोंबिवली, परिसरात वातावरणात अचानक बदल पाहायला मिळाला. सकाळपासून आकाश ढगाळ राहिल्याने नागरिकांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली जात होती. पण पाऊस झाला नाही.
यवतमाळच्या झरी जामणी तालुक्यातील रायपूर येथे झालेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे कोलाम वस्तीतीला जोरदार तडाका बसला असून घरांवरील टिन पत्रे हवेत उडून गेली, यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत.
कदीर हांडे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव
सोलापुरातल्या शेळगी परिसरात भरधाव कारने रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने झाला होता अपघात
या अपघातात शेखर सुरेकर आणि अमोल येरटे या दोघांचा जागीच मृत्यू झाला होता
वांगणीत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय. या पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले असून काही झाडांच्या फांद्याही पडल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालीये.
पनवेल रेल्वे स्थानक परिसरात रिक्षाभाड्यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये झालेला वाद चांगलाच चिघळल्याची घटना समोर आली आहे.
किरकोळ शाब्दिक वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाने काही वेळातच हिंसक वळण घेतले आणि दोन्ही गटांतील रिक्षाचालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
घटनेदरम्यान परिसरात एकच गोंधळ उडाला होता. प्रवासी आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
काही जणांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला असून हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, अमरावती शहरासह ग्रामीण भागात तिवसा, मोर्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली
अमरावती मधील शिरजगाव मोझरी, सालोरा आणी मोर्शी तालुक्यात जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, तीळ आणि भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे
यवतमाळ बायपासवरील घाटंजीकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर एसटी बस व कंटेनर यात अपघात झाला.
घाटंजीकडून बसस्टॉपकडे जात असलेल्या बसला नागपूरकडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने अचानक धडक दिली. या धडकेत एसटी बस व कंटेनर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.
जखमींना तात्काळ यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात गेल्या अर्धा तासापासून मुसळधार पाऊस
वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप
धडगाव शहरात देखील हलका आणि तुरडक स्वरूपाचा पाऊस
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाला मदत करण्यासाठी साईबाबा संस्थान पुढे सरसावले आहेत.
दहावीला 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणा-या मुला मुलींच्या अकरावी आणि बारावीच्या शिक्षणाची जबाबदारी साईबाबा संस्थान घेणार आहे.
नसरापूर घटनेतील आरोपीला ऑनलाइन हजर करण्यात आलं होतं
न्यायालयाने १२ मे पर्यंत सुनावली पोलिस कोठडी
आरोपी चे मेडिकल फॉरेन्सिक रिपोर्ट येणं अद्याप बाकी
तसेच अजून चौकशीसाठी पोलिसांनी मागितली होती कोठडी
उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात संतप्त नातेवाईकांचा राडा; रुग्णाच्या मृत्यूनंतर तोडफोड
रात्री उशिरा घडला प्रकार; रुग्णालयातील साहित्याची तोडफोड करत डॉक्टरांनाही धक्काबुक्की केल्याची माहिती
घटनेनंतर पोलिसांची धाव; तोडफोड करणाऱ्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल
वारंवार होणाऱ्या हल्ल्यांविरोधात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा संताप; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
सेंट्रल रुग्णालयातील डॉक्टर-स्टाफचा निषेध; सकाळी १० वाजेपासून कामबंद आंदोलनाची हाक
पालघर _ डहाणू दिवा लोकलमध्ये मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं जात असल्याचा आरोप मराठी भाषिकांकडून करण्यात येत असून डहाणू लोकलच्या डब्यामध्ये सर्वत्र गुजराती जाहिरात प्रसिद्ध केल्याने मराठी भाषिक प्रवासी नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून हा महाराष्ट्र आहे तिथे मराठी भाषेबद्दल नेहमीच आदर केला जात असून महाराष्ट्रात मराठी भाषेचा खच्चीकरण करणे योग्य नसल्याचा संतप्त सवाल मराठी प्रवाशांकडून करण्यात येतोय.
सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या हुतात्मा साखर कारखान्याच्या अध्यक्षां विरोधातील आंदोलन 17 व्या दिवशीही कायम आहे.हुतात्मा साखर कारखान्यासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या ठिकाणीच संचालक मंडळ व सभासदांची बैठक पार पडली,ज्यामध्ये अध्यक्ष वैभव नायकोडे यांचे सर्व अधिकार काढून घेण्याचा ठराव करण्यात आला आहे.ठरावाची प्रत कारखान्याच्या उपाध्यक्षांकडे देण्यात आली आहे.कारखान्यामध्ये अध्यक्ष वैभव नायकवडींकडून मोठा भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप करत अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा,या मागणीसाठी सभासदांचं हुतात्मा साखर कारखान्यासमोर गेल्या 17 दिवसांपासून आंदोलन सुरू असून राजीनामासाठी आता अधिक तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोल्हापूर दक्षिणमधील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या सुधारित गांधीनगर प्रादेशिक १३ गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनेविरोधात आज महिला संतप्त झाल्या आहेत.
योजनेतील विलंब, निकृष्ट दर्जाची कामे आणि वारंवार खंडित होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ तेरा गावांतील महिलांनी कोल्हापुरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर घागर मोर्चा काढला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते जय पवार यांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराची सुरुवात केली. पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपल्या विविध समस्या जय पवार यांच्यासमोर मांडल्या.
बिहारमध्ये आता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पाटणा येथे दाखल
गांधी मैदानात पंतप्रधान मोदी पोहचले
थोड्याच वेळात मंत्रिमंडळाची घोषणा केली जाणार
नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे उसाच्या रसाला मागणी वाढली असली, तरी रसवंती चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. रसवंतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उसाच्या दरात तिपटीने वाढ होऊन तो 5 ते 6 हजार रुपये प्रति टन झाला आहे. साखर कारखान्यांच्या तुलनेत शेतकरी रसवंतीसाठी जास्त भाव घेत असल्याने कच्च्या मालाचा खर्च वाढला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे, मंत्री आदिती तटकरे आणि शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांची प्रतिष्ठा पणाला
राष्ट्रवादीची एक हाती सत्ता असलेल्या म्हसळा नगर पंचायतीत शिंदेंच्या शिवसेने काही महिन्या पूर्वी सुरुंग लावत राष्ट्रवादीचे आठ नगरसेवक फोडले होते
फुटलेल्या नगर सेवकांना अपत्र करण्यासाठी राष्ट्रवादीने केलेले प्रयत्न अफल ठरल्याने म्हसळा नगर पंचायतीत नगराध्यक्ष पदाची निवडणुक
17 पैकी 8 नगर सेवक शिवसेनेकडे असल्याने म्हसळा नगर पंचायतीवर शिवसेनेची सत्ता येण्याची शक्यता
म्हसळा हा मंत्री आदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन मतदार संघातील महत्व पुर्ण भाग
म्हसळा नगर पंचायतीत पराजय हा राष्ट्रवादीला मोठा धक्का असल्याचे राजकिय मत
जळगाव दोन दिवस झाले तापमानाचा पारा खाली आला होता. यामुळे उन्हाच्या झळा देखील कमी झाल्या होत्या. मात्र आज जिल्ह्यात पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढायला सुरवात झाली आहे. तापमानाचा पारा पुन्हा वाढला असून, ४२ इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे सकाळपासूनच कडक ऊन जाणवत असून, दुपारच्या सुमारास तापमान वाढल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तापमानात प्रचंड वाढ झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात उष्तेची लाट निर्माण झाली होती. साधारण आठवडाभर तापमानाचा पारा ४४ अंशांच्या वर गेलेला होता.
नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळचे काँग्रेस आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात पिकविमा मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.
देवगांव धरण उशाला अन् कोरड घशाला याची प्रचीती यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील तेराशे लोक वस्ती असलेल्या देवगांव येथील नागरिकांना येताहेत.पूर्ण धरण आमच्या जवळ आहे,पण आमच्या ओंजळीत पाण्याचा एक थेंबही नाही,अशी म्हण्याची वेळ देवगांव येथील नागरिकांवर आलीये. अंडाभर पाण्यासाठी सकाळी चार वाजता पासून पाण्यासाठी पायपीट करावी लागते त्यामुळे जिल्हा प्रशासन देवगाव येथील नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करून दिलासा देणार का हे पहाव लागणार आहे.
"योग्य वेळ आल्यावर तुमच्याशी बोलतो", हसन मुश्रीफ यांची गोकुळच्या प्रश्नावर एक ओळीचे उत्तर
मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलण्यासाठी दिला नकार
गोकुळ च्या प्रश्नावर मंत्री हसन मुश्रीफ यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्या विषयावर थेट उत्तर देण्यास नकार
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे एका ओळीत उत्तर
नसरापूर घटनेनंतर पोक्सो आरोपींवर पोलिसांची करडी नजर
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणानंतर पोलिस प्रशासन सतर्क
पोक्सो कायद्यातील पुनरावृत्ती करणाऱ्या आरोपींविरोधात विशेष मोहीम
दोन किंवा अधिक गुन्हे असलेल्या ३७ आरोपींना पोलिसांच्या देखरेखीखाली ठेवण्याचा निर्णय
तसेच १९३ संशयितांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे
आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचा बॉण्ड घेतला जाणार आहे तर गरज पडल्यास प्रतिबंधात्मक कारवाईही केली जाणार
भूम नगरपालिकेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष तीव्र झाला आहे. ‘सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान’ अंतर्गत सिमेंट रस्ते व गटारींच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधी नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती
यानंतर न्यायालयाने संबंधित ठेकेदाराचे तब्बल ५० कोटी रुपयांचे बिल थांबवण्याचे आदेश दिले आहेत
दरम्यान,नगराध्यक्ष संयोगिता गाढवे यांनी याचिकाकर्ते वारंवार पैशांची मागणी करून ब्लॅकमेल करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. विरोधकांमुळे भूम शहराचा विकास रखडल्याचाही आरोप त्यांनी केला
याप्रकरणी नगराध्यक्ष संयोगिता गाढवे आणि नगरसेवक संजय गाढवे यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे विरोधी नगरसेवकांवर कारवाईची मागणी केली आहे
तर दुसरीकडे विरोधी नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करत ब्लॅकमेलिंगचे आरोप फेटाळून लावले आहेत
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र असतानाच पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव येथे दोन वेगवेगळ्या युवतींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
संपत्तीच्या वादातून बोरमणी गावात स्वतःच्या भावजयसह पुतणी आणि पुतण्याची आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के याने केली होती हत्या
हत्यानंतर पाच दिवसापासून फरार असलेल्या शंकर उर्फ पप्पु मस्के याला पोलिसांनी पश्चिम बंगालमधून अटक केल्याची सूत्रांची माहिती
शंकर उर्फ पप्पू याने 2 मे रोजी भावजय गायत्री मस्के, पुतणी प्रिया मस्के आणि पुतण्या शिवराज मस्के याची तलवारीने हत्या केली होती
या प्रकरणातील 5 आरोपीना पोलिसांनी या आधीच अटक केली असून मुख्य संशयित संशयित शंकर उर्फ पप्पू याला देखील अटक करण्यात आली आहे
चिखली शहरातील गजबजलेल्या बॉम्बे मार्केटला आज सकाळी अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत मार्केटमधील अनेक दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे.
अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मामे भावाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील पीडितेशी तिच्या वडील आणि मामाने अश्लील वर्तन केले, अशी फिर्याद पीडितेच्या आईने शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेचा वडील आणि मामाला अटक केली आहे.
ओएलएक्सवर दुचाकी विक्रीची ऑनलाइन जाहिरात देणे एका वाहनमालकाला चांगलेच महागात पडले.टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकी चोरून नेणाऱ्यास विमानतळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महम्मद मुजबता इकबाल शेख (वय २७, रा. खडी मशिन चौक, कोंढवा) असे आरोपीचे नाव आहे.
फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी विक्रीसाठी ओएलएक्सवर पोस्ट केली होती.त्यावर एका व्यक्तीने ईशिता माथुर नावाच्या प्रोफाईलमधून गाडी घेण्यास रस दाखवला.त्यानंतर ‘टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने नजर चुकवून तो दुचाकीसह पसार झाला.
खेड तालुक्यात एका बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या रोहन शंकर पालकर या नराधमास अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी. एस. चांदगुडे यांनी २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. शिक्षेमध्ये दंडाच्या रकमेचाही समावेश आहे. ही घटना ६ मे २०२१ मध्ये घडली होती. पीडित बालिका कोरोना संकटादरम्यान ऑनलाईन क्लासेससाठी मैत्रिणीच्या घरी गेली असता घरात कोणी नसल्याचा फायदा घेत नराधमाने तिला धमकावत तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच ही बाब कोणाला सांगितल्यास पीडित बालिकेसह तिच्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकीही दिली होती. या धमकीस घाबरून झालेल्या अत्याचाराबद्दल ती कोणाशीही बोलली नाही. मात्र पीडित बालिकेची आई बालिकेला डॉक्टरकडे घेऊन गेली असता सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले.
राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवत असून वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कामगार आणि नागरिकांच्या संरक्षणासाठी तातडीच्या उपाययोजना लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
समाधानकारक पावसाळा होऊनही अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईचे गंभीर चित्र निर्माण झाले असून,मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील नऊ गावांतील सुमारे ६ हजार ७६ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा करून तहान भागविली जात आहे.मेळघाटातील ९ गावांमध्ये नैसर्गिक पाणीस्रोत आटले असून,विहिरी व बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. चिखलदरा तालुक्यामध्ये नऊ ठिकाणी परिस्थिती सर्वाधिक बिकट असल्याचे दिसून येते.वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली गेली असून, प्रशासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे.सध्या शासकीय व खासगी मिळून २० टँकर कार्यरत असून, ते नऊ गावांना पाणी पुरवत आहेत.चिखलदरा तालुक्यातील मेथा ३, खडीमल६,गोलखेडा बाजार २, बहादरपूर १, आकी १,मेहरीआम २,आलाडोह २, लवादा शहापूर २,गवळी धाणा १ आदी ९ गावांत २० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.दरवर्षी उन्हाळ्याची सुरुवात होताच या गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो.त्यामुळे या गावांना टँकरची गरज भासते.टँकरने पाणी पुरवठा होत असला तरी नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले जात आहे.
राजगड तालुक्यातील पूर्वपट्ट्यामध्ये असणाऱ्या अडवली ,वांगणी परिसरामध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह,लग्नातील वऱ्हाडी मंडळींची, प्रवाशांची चांगली धावपळ उडाली. दरम्यान अडवली गावच्या हद्दीमध्ये पडलेल्या झाडामुळे नसरापूर वेल्हे रस्ता काही काळ वाहतुकीसाठी बंद राहिला.
नाशिकच्या येवला तालुक्यातील बहु चर्चित असलेल्या सावरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत असलेल्या ग्रामरोजगार सेवकाला ३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. संजय वाघ असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, घरकुल मंजुरीच्या बदल्यात त्याने ही लाचेची मागणी केली होती.
राहाता तालुक्यातील बेकायदा गर्भलिंगनिदान प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढली आहे.. या प्रकरणात पोलिसांनी गर्भपात करणाऱ्या श्रीरामपूर येथील डॉक्टर रवींद्र कुटेसह आणखी दोन एजंट ताब्यात घेतले आहेत.. आरोपींना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.. राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ शिवारात, निर्जनस्थळी असलेल्या एका खोलीत गर्भवती महिलांकडून प्रत्येकी 10 हजार रुपये घेऊन बेकायदा गर्भलिंग तपासणी केली जात होती.. पोलिसांनी वैद्यकीय पथकासह धाड टाकत तपासणीसाठी लागणारे साहित्य आणि एक डॉक्टर, एजंट तसेच महिलांच्या नातेवाईक अशा दहा जणांना ताब्यात घेत गुन्हे दाखल केले होते.. पोलिस तपासात श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे हा बेकायदा गर्भपात करत असल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यासह आणखी दोन एजंटला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.. या प्रकरणाची व्याप्ती पुणे जिल्ह्यापर्यंत पोहचण्याची शक्यता असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
पुण्यात नसरापूर आणि पर्वती भागातील घटना ताजी आहे आणि त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळतोय. असं असतानाच आता पुण्यात महिलेची छेड काढल्याचा आरोप करत नागरिकांनी एका तरुणाला बेदम चोप दिला. पुण्यातील राजाराम पुलाजवळ ही घटना घडली असून याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. संबंधित तरुण हा एका महिलेची छेड काढत असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आलं, त्यानंतर तिथे जमा झालेल्या नागरिकांनी या तरुणाला लाईटच्या खांबाला एका वायर ने बांधलं आणि चोप दिला. काही वेळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर त्या तरुणाला ताब्यात घेण्यात आले..
- अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती
- मध्यरात्री 1 वाजता शहरातील शेळगी उड्डाण पुलावर हा अपघात झालाय
शिरोली बुद्रूक येथे गावातून घराकडे जात असताना वडिलांसोबत दुचाकीवर बसलेल्या गणेश बोऱ्हाडे हा १० वर्षीय मुलावर बिबट्याने झडप घातली. या हल्ल्यात मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यावेळी शिकारीसाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक दुचाकीवरील मुलाला लक्ष्य करत हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र मुलाच्या वडिलांनी प्रसंगावधान राखत मुलाला वाचवले. त्यानंतर बिबट्या शेतीच्या दिशेने पसार झाला. जखमी गणेशवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये, विशेषत: लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.