चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

Chandrapur Air Pollution Deaths Report Maharashtra: चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या वायू प्रदूषणामुळे साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू झाला असून हजारो नागरिक विविध आजारांनी त्रस्त आहेत.
Thick smog covers Chandrapur as rising air pollution continues to impact public health and increase respiratory illnesses.
Thick smog covers Chandrapur as rising air pollution continues to impact public health and increase respiratory illnesses.saam tv
Published On

संजय तुमराम, साम टीव्ही

चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना भीषण प्रदूषणाची मोठी किंमत मोजावी लागत आहे. या प्रदूषणामुळे मागील साडेतीन वर्षात 325 जणांना प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचा वैद्यकीय अहवाल जाहीर झाल्यानंतर ही गंभीर बाब पुढे आली. विशेष म्हणजे 2024 या वर्षात सर्वाधिक मृत्यू झाले असून, 31 हजारांवर नागरिक विविध आजारांनी ग्रस्त आहेत. मागील दशकापासून चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणावर ओरड सुरू आहे. मात्र कृती आराखडा तयार करण्यापलीकडे काहीही झालेले नाही. त्यामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे.

Thick smog covers Chandrapur as rising air pollution continues to impact public health and increase respiratory illnesses.
खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

चालू वर्षात जानेवारी ते मे महिन्यादरम्यात एकूण 34 जणांचा मृत्यू झालाय. या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, दमा, फुफ्फुसाचे आजार आणि सोबतच त्वचारोग आणि हृदयविकारही होऊ लागला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजारी असलेल्यांना याचा त्रास अधिक होत आहे.

Thick smog covers Chandrapur as rising air pollution continues to impact public health and increase respiratory illnesses.
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन अन् शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं; महायुतीच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

जिल्ह्यातील वीज केंद्र, कोळसा खाणी, कोळशाची वाहतूक, सायंपाकासाठी कोळशाचा वापर यामुळे हवेतील प्रदूषण वाढत असून ते संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे. प्रदूषण वाढवणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करावी, असे कृती अहवाल सांगत असला तरी प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर कोणतीही कारवाई करायला तयार नाही. त्यामुळेच या जिल्ह्यातील प्रदूषण वाढतच चालले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com