Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

Bhopal Introduces Algae Tree : भोपाळमध्ये उभारण्यात आलेले अल्गी ट्री हवेतील प्रदूषण आणि कार्बन डायऑक्साईड कमी करण्यास मदत करणार आहे. शेवाळयुक्त रोपट्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित हे एक स्मार्ट यंत्र आहे, जे हवेतील प्रदूषण शोषून घेते.
Bhopal Introduces Algae Tree
Bhopal has developed India’s first algae tree based on smart algae technology.saam tv
Published On
Summary
  • भोपाळमध्ये देशातील पहिले अल्गी ट्री विकसित.

  • शेवाळयुक्त यंत्र हवेतील प्रदूषण शोषून घेणार.

  • २५ झाडांइतका कार्बन डायऑक्साईड शोषण्याची क्षमता.

हवेतील वाढत्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषणामुळे अनेक श्वसनसंबंधी आजार जडत आहेत. प्रदूषणाच्या राक्षसापासून बचाव करण्यासाठी भोपाळ येथील मशरूम वर्ल्ड ग्रुपने शेवाळयुक्त रोपट्यांचे यंत्र बनवलंय. हे शेवाळयुक्त रोपटे प्रदूषण शोषण घेते. भोपाळ शहरात देशातील पहिले अल्गी ट्री उभारण्यात आले आहे.

Bhopal Introduces Algae Tree
विकासाच्या वेगात पर्यावरणाचा बळी? राज्यातील आणखी एका जिल्ह्यात १०० वर्षे जुन्या झाडांवर कुऱ्हाड

या शेवाळची सर्वात मोठी विशेषतः म्हणजे या स्मार्ट झाडामध्ये एकाच वेळी तब्बल २५ डेरेदार वृक्षांइतका कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता आहे. शहरांमधील गर्दीच्या ठिकाणी आणि जिथे पारंपरिक वृक्षारोपण करणे कठीण आहे, अशा भागांसाठी हे तंत्रज्ञान वरदान ठरेल. हे यंत्र १५ मीटरच्या परिघात घातक 'पीएम २.५' कणांचेप्रमाण ४५ ते ५५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सक्षम आहे. मशरूम वर्ल्ड ग्रुपच्या ५० पेक्षा अधिक तज्ज्ञांनी दोन वर्षांच्या संशोधनानंतर हे उपकरण विकसित केलंय.

Bhopal Introduces Algae Tree
Malaria: शहरांमध्ये मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ नेमकी कशामुळे? डॉक्टरांनी सांगितली संपूर्ण माहिती अन् टिप्स

हे 'अल्गी ट्री' म्हणजे नैसर्गिक झाड नसून सूक्ष्म शेवाळाच्या मदतीने हवा शुद्ध करणारे एक 'स्मार्ट डिव्हाईस' आहे. हे यंत्र दरवर्षी सुमारे १.५ टन कार्बन डायऑक्साईड शोषून घेते. त्या बदल्यात १ टन ऑक्सिजनची निर्मिती करते. भोपाळमधील स्वामी विवेकानंद उद्यानात या अत्याधुनिक युनिटचे उद्घाटन कॅबिनेट मंत्री विश्वास सारंग यांच्या हस्ते करण्यात आले. हे तंत्रज्ञान नैसर्गिक वृक्षांना पर्याय नसून, त्यांना पूरक म्हणून काम करेल.

नैसर्गिक झाडाप्रमाणेच हवा शुद्ध करते 'अल्गी ट्री'

'अल्गी ट्री' हे एक अत्याधुनिक बायो-टेक्नॉलॉजी यंत्र आहे. जे नैसर्गिक झाडाप्रमाणेच हवा शुद्ध करण्याचे काम करते. हे यंत्र म्हणजे प्रत्यक्षात एक मोठी काचेची टाकी आहे. त्यात पाणी आणि लाखो जिवंत सूक्ष्म शेवाळ (मायक्रो अल्गी) भरलेले आहेत. हे सौरऊर्जेवर चालणारे युनिट आहे. याच्या वरच्या बाजूला सोलर पॅनेल आणि आतमध्ये पंप व सेन्सर्स बसवलेले आहेत. हे यंत्र वातावरणातील प्रदूषित हवा आत खेचून घेते आणि त्यातील शेवाळ सूर्यप्रकाशाच्या मदतीने प्रकाश संश्लेषण प्रक्रिया घडवून आणते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com