Shrirampur News
Shrirampur NewsSaam tv

Shrirampur News : अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी बनून दूध केंद्रांवर धाड; दोन तोतया अधिकारी जेरबंद

Ahilyanagar news : काही गावांमध्ये मंगळवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान दूध संकलन केंद्रांवर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या तोतया पथकाने धाड टाकली
Published on

सचिन बनसोडे 

श्रीरामपूर (अहिल्यानगर) : अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचा बनाव करून तोतया पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यातील दूध संकलन केंद्रावर धाड टाकल्या. येथे कारवाई टाळण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली. मात्र हे खरे अधिकारी नसल्याचे बिंग फुटले. यानंतर दोन जणांना दूध संकलन केंद्र चालकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव, मालुंजे तसेच राहुरी तालुक्यातील काही गावांमध्ये मंगळवारी सकाळी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान दूध संकलन केंद्रांवर अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या तोतया पथकाने धाड टाकली. दूध तपासणीसाठी अचानक आलेल्या या पथकाला पाहून केंद्र चालक दूध व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली. या पथकातील तोतया अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यास सुरवात केली होती. 

Shrirampur News
Kalyan News : चोरट्याला ताब्यात घेतल्यावर पोलिसांवर दगडफेक; आंबिवलीच्या इराणी वस्तीतील घटना, एक पोलीस जखमी 

दरम्यान अन्न भेसळ प्रतिबंधक पथकाची राज्यात कारवाई सुरू असल्याचे सांगून दूध संकलन केंद्रावर दुधाचे नुमने तपासणी करावयाची आहे, असे सांगितले गेले. काही दूध संकलन केंद्रांवरून नुमने चाचणीसाठी घेतले. कारवाई न करण्यासाठी दूध केंद्र चालकाकडून पैसे उकळल्याचा प्रकार घडला. मात्र यावेळी काही दूध संकलन केंद्र चालकांना काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आले. यावेळी त्यांची उलटतपासणी करण्यास सुरवात केल्यानंतर बिंग फुटल्याचे लक्षात येताच पथकाने धूम ठोकली.  

Shrirampur News
Leopard Attack : घरासमोर खेळणाऱ्या बालकावर बिबट्याचा हल्ला; नागरिकांनी धाव घेतल्याने सुदैवाने वाचले प्राण

गावकऱ्यांनी दोघांना दिले पोलिसांच्या ताब्यात 

याच वेळी उक्कलगाव येथून हे बनावट पथक बेलापूर येथे जात असतानाच गावकऱ्यांनी दोघांना पकडले. यात दत्तात्रय वसंतराव साठे, (रा. नायगाव, ता. श्रीरामपूर) आणि अरुण दादासाहेब खुळे (रा. वळण, ता. राहुरी) या दोघांना अटक केली आहे. मात्र यातील तीन जण पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com