Ahilyanagar : गावात भैरवनाथ महाराजांची यात्रा; घरात सफाई काम करताना दुर्दैवी घटनेत मायलेकाचा मृत्यू

Ahilyanagar News : चांडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा सुरू होत आहे. यात्रेनिमित्त गावात जोरदार तयारी करण्यात येत असते. तर गावातील सर्वच नागरिक घरात साफसफाई करत असतात
Ahilyanagar News
Ahilyanagar NewsSaam tv
Published On

अहिल्यानगर : गावामध्ये भैरवनाथ महाराजांची यात्रोत्सव भरत असतो. यामुळे घरी पाहुण्याची ये- जा होणार असल्याने घरात साफसफाईचे काम करण्यात येत होते. सदरचे काम करत असताना विजेचा झटका लागून मायलेकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चांडगाव येथे घडली. मायलेकाचं मृत्यूच्या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

अहिल्यानगर तालुक्यातील चांडगाव येथील राजेंद्र लोंढे (वय ४५) आणि सखूबाई लोंढे (वय ७५) असे मृत झालेल्या मुलगा व आईचे नाव आहे. दरम्यान तालुक्यातील चांडगाव येथील ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा सुरू होत आहे. यात्रेनिमित्त गावात जोरदार तयारी करण्यात येत असते. तर गावातील सर्वच नागरिक घरात साफसफाई करत असतात. त्यानुसार राजेंद्र लोंढे हे देखील घराची स्वच्छता करण्याचे काम करत होते. 

Ahilyanagar News
Sarpanch Reservation : सरपंच पदाची आरक्षण सोडत वादाच्या भोवऱ्यात; अलिबागमध्ये सोडत तहकूब करण्याची वेळ

मुलाला उचलायला गेलेल्या आईलाही बसला झटका 

साफसफाई करत असताना राजेंद्र लोंढे यांना लोखंडी ग्रीलमध्ये उतरलेल्या विजेच्या प्रवाहाचा धक्का लागला. जोराचा झटका बसल्यामुळे ते खाली पडले. खाली पडल्यामुळे त्यांच्या शरीरात देखील विजेचा प्रवाह सुरूच राहिला. याचवेळी घरात असलेली त्यांची आई सखूबाई या मुलाच्या मदतीसाठी गेल्या. त्यांनी खाली पडलेल्या मुलाला उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही विजेचा धक्का बसला.

Ahilyanagar News
Dharangaon Crime : भररस्त्यावर थरार; पाठलाग करत केला गोळीबार, पूर्ववैमनस्यातून खून

यात्रेतील कार्यक्रम केले रद्द 

घडलेल्या प्रकारानंतर दोघा माय- लेकांना उपचारासाठी श्रीगोंदे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे गावकऱ्यांनी यात्रेच्या दिवशी आयोजित कार्यक्रम स्थगित करून लोंढे कुटुंबाच्या दुःखात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com