Sarpanch Reservation : सरपंच पदाची आरक्षण सोडत वादाच्या भोवऱ्यात; अलिबागमध्ये सोडत तहकूब करण्याची वेळ

Raigad News :राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील बॉडीची मुदत संपली आहे. याठिकाणी निवडणूक लागण्यापूर्वी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया पार पडली
Sarpancha Reservation
Sarpancha ReservationSaam tv
Published On

सचिन कदम 
रायगड
: राज्यातील ग्रामपंचातींमधील सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येत आहेत. यातच रायगड जिल्ह्यातील सरपंच पदाच्या आरक्षण सोडत प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या सर्व प्रक्रियेवर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने आरक्षण सोडत थांबवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. यामुळे आता सदरची प्रक्रिया लांबली आहे.  

राज्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील बॉडीची मुदत संपली आहे. याठिकाणी निवडणूक लागण्यापूर्वी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात येत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी आरक्षण सोडत काढण्याची प्रक्रिया पार पडली आहे. तर काही ठिकाणी अद्याप हि प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम बाकी आहे. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील सरपंच आरक्षण सोडत काढण्यासाठी सभा बोलावण्यात आली होती. मात्र यात गोंधळ निर्माण झाला होता. 

Sarpancha Reservation
Dhule Crime : मारहाण करत बचत गटाच्या पैशांवर डल्ला; टोळीतील दोघेजण पोलिसांच्या ताब्यात

अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ग्रामपंचायत सरपंच पदाचे पुढील पाच वर्षांसाठी आरक्षण काढण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या सभेदरम्यान राजकीय पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतल्याने प्रशासनाला आरक्षण सोडत थांबवावी लागली. ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका काही कारणास्तव होऊ शकल्या नाहीत, त्या आरक्षणाचा लाभ संबंधित प्रवर्गाला मिळालेला नाही.  हा त्या प्रवर्गावर अन्याय होईल असा आक्षेप घेण्यात आला.  

Sarpancha Reservation
Jalna : बनावट शेतकरी दाखवून ५७ कोटीचे अनुदान लाटले; जालना जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय 

दरम्यान राजकीय पक्षांनी हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे आरक्षण सोडतीसाठी बोलाविण्यात आलेली विशेष सभा तहकूब करावी लागली. अखेर राजकीय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपला मुद्दा मांडला. यावर वरिष्ठ पातळीवर मार्गदर्शन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतरच ग्रामपंचायत सरपंच आरक्षण काढण्यात येणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com