Dharangaon Crime : भररस्त्यावर थरार; पाठलाग करत केला गोळीबार, पूर्ववैमनस्यातून खून

Jalgaon News : गोपाल मालचे हा वाहनाने जात असताना वाकटुकी फाट्याजवळ त्याच्यावर राहुल कोळी याने गोळीबार केला. यात डोक्यामध्ये गोळी शिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे
Dharangaon Crime
Dharangaon CrimeSaam tv
Published On

धरणगाव (जळगाव) : रस्त्यावरून सिनेस्टाईल पाठलाग करत गोळ्या झाडून तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून हि हत्या करण्यात आल्याची घटना धरणगाव तालुक्यातील विहीरफाटा येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीसांकडून या प्रकरणी तपास करण्यात येत आहे. 

धरणगाव तालुक्यातील सोनवदपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहीर फाट्यावर २२ एप्रिलच्या रात्री आठच्या सुमारास घडली. सदर घटनेत वाकटुकी येथील गोपाळ सोमा मालचे (वय ४५) यांच्यावर पूर्ववैमनस्यात संशयित राहुल कोळी (रा. वाकटुकी, ता. धरणगाव) याने गोळीबार केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. रस्त्याने पाठलाग करत गोळी झाडल्याने गोपाळ याच्या डोक्यात गोळी लागली. 

Dharangaon Crime
Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाची मोठी कारवाई, १६ नक्षलवाद्यांचा खात्मा; २ जवान जखमी

गोळीबार केल्यानंतर स्वतःहून पोलिसात झाला हजर 

दरम्यान गोपाल मालचे हा वाहनाने जात असताना वाकटुकी फाट्याजवळ त्याच्यावर राहुल कोळी याने गोळीबार केला. यात डोक्यामध्ये गोळी शिरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर राहुल ज्ञानेश्वर कोळी असे गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीचे नाव असून गोळीबार केल्यानंतर तो स्वतःहून धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती मिळाली आहे. घटना घडल्यानंतर पाळधी दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी ताफ्यासह घटनास्थळी जात तपास केला.

Dharangaon Crime
Sarpanch Reservation : सरपंच पदाची आरक्षण सोडत वादाच्या भोवऱ्यात; अलिबागमध्ये सोडत तहकूब करण्याची वेळ

१५ वर्षानंतर बदला 
मयत गोपाल मालचे याने २०१० मध्ये राहुल कोळी याचे वडील ज्ञानेश्वर कोळी यांचा खून केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला म्हणून राहुल याने वडिलांचा खून करणाऱ्या गोपाल मालचे याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. दरम्यान राहुल याला अटक करण्यात आली असून या घटने प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com