Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?

Abhijit Dipke On PM Modi: अभिजीत दिपके यांनी आज साम टीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?
Abhijit DipkeSaam Tv
Published On
  • अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीसा मुलाखत दिली

  • गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्याबाबत अभिजीत दिपके यांचं मोठं विधान

  • पंतप्रधान मोदींवर अभिजीत दिपके यांची टीका

  • भारतातील लोकशाहीवर अभिजीत दिपके यांनी स्पष्टपणे मांडले मत

नीट पेपरफुटीचा मुद्दा उचलून धरत दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत शिक्षणमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये परखडपणे आपली मतं मांडली. अभिजीत दिपके यांनी राजकीय घडामोडी, सरकार-विरोधकांची भूमिका आणि पुढे काय करणार याबाबत सांगितले. यावेळी अभिजीत दिपके यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 'कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही गांधी, नेहरू आणि आंबेडकर बनू शकणार नाही', असे मत त्यांनी व्यक्त केले.

अभिजीत दिपके म्हणाले की, 'तुम्हाला तुमच्या देशाला टिकवून ठेवायचे असेल तर अहिंसेचाच रस्ता आहे. भारतासोबत किती देशांना स्वातंत्र्य मिळाले आहे. क्युबा देशाचे काय झाले? तिथे बंदूक आणि हुकुमशाही झाली. रशियामध्ये हिंसाचारामुळे लोकशाही राहिली नाही. आपला एक असा देश आहे जो अहिंसेच्या मार्गावर चालला त्यामुळे आपल्या देशात लोकशाही राहिली. जवाहरलाल नेहरु पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी हुकुमशाही केली तर त्यांना कोणी विचारले असते का, कोणच त्यांच्यासोबत नव्हते. त्यांना निवडणूक घ्यायची काय गरज होती का. लोकांना तेव्हा मतदान काय असते, मताचे अधिकार काय असतात हे माहिती नव्हते. कारण आपला देश खूप गरीब होता आपल्याकडे खायला नव्हते. तेव्हा जवाहरलाल नेहरू यांनी ठरवले आपल्या देशात लोकशाही राहणार आणि मी निवडणूक लढवणार. '

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?
Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

अभिजीत दिपके यांनी जवाहरलाल नेहरू यांचे उदाहरण देत पीएम मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, 'देशामध्ये एकाच माणसाने सर्वकाही कंट्रोल करायला पाहिजे असे नरेंद्र मोदी करायला पाहत आहेत. असे करायची सर्वात मोठी संधी जवाहरलाल नेहरू यांच्याकडे तेव्हा होती. कारण तेव्हा विरोधक नव्हते आणि निवडणूक नावाची गोष्ट नव्हती. पण तरी नेहरूंनी ठरवले की आपल्याला लोकशाही पाहिजे आणि निवडणूक लढवली पाहिजे. हा त्यांचा मोठेपणा आहे. त्यामुळे मला वाटते कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही गांधी बनू शकत नाही, नेहरू बनू शकत नाही आणि आंबेडकर बनू शकणार नाही. कारण गांधी, आंबेडकर आणि नेहरू यांनी तेव्हा आपल्याला त्या गोष्टी आणि अधिकार दिले होते ज्याची आपल्याला माहिती नव्हती.'

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?
Abhijeet Dipke : ...तर लवकरच मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा सरकारला गंभीर इशारा

महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत चुकीचे शब्द वापरले जातात. याबाबत अभिजीत दिपके यांनी सांगितले की, 'झेन झींनी गांधी, आंबेडकर आणि नेहरु यांना जास्त वाचले आहे. त्यातल्या त्यात जास्त त्यांनी आंबेडकरांना वाचले आहे. झेन झींमधील मुली जास्त आंबेडकरांना वाचत आहेत. माझं जेवढ्या मुलींसोबत बोलणं झालं आहे त्यांना माहिती आहे आंबेडकरांचे महत्व काय होते. आंबेडकरांनी त्यांच्यासाठी काय केलं हे त्यांना माहिती आहे. आधीचा वर्ग सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नव्हता. मी ज्या शाळेत शिकायला होतो तिथे आंबेडकरांबद्दल जास्त शिकवलं गेलं नाही.' , असे ते म्हणाले.

Abhijit Dipke: गांधी, नेहरू आंबेडकर पुन्हा होणे नाही, अभिजीत दिपकेने नेमकं काय सांगितलं?
Abhijeet Dipke : जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या यशाचं क्रेडिट कोणाचं? अभिजित दीपकेंनी स्पष्टच सांगितलं

अभिजीत दिपकेंनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले की, 'आपल्या देशाच्या शिक्षण व्यवस्थेत जातीवाद आणि आंबेडकर यावर जास्त शिकवले जात नाही. जातीवाद काय आहे? हे आपल्याकडे शिकवले जात नाही. आपल्या इकडे जातीवाद शिकवलं तर जातीभेत वाढेल असा विचार केला जातो. पण मुलांना शिकवले पाहिजे जातीवाद काय आहे?, जातीवाद कशाप्रकारे होतो?, त्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होतो?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com