Abhijeet Dipke : ...तर लवकरच मोठं आंदोलन; अभिजीत दिपकेंचा सरकारला गंभीर इशारा

abhijeet dipke warns government over student harassment : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी सरकारला गंभीर इशारा दिला आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांचा छळ सुरूच राहिला तर लवकरच मोठं आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिलाय.

नीट पेपरफुटी प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि इतर मागण्या मान्य केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. आंदोलनातील सहभागी विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नाही, अशी ग्वाही सरकारने दिली होती. मात्र, विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करताना, सीजेपीचे संस्थापक दिपकेंनी सरकारला पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

अभिजीत दिपकेंनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. विद्यार्थ्यांचा पोलिसांकडून होणारा छळ सुरूच राहिला, तर सीजेपी लवकरच मोठे शांततापूर्ण आंदोलन उभारेल, असा इशारा दिपकेंनी पोस्टद्वारे दिला आहे. सरकारने विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे आणि त्यांच्याविरोधात सूडबुद्धीने कारवाई करणे तात्काळ थांबवावे, असेही दिपके म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com