Accident News: मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; ट्रकची कंटेनरला जोरदार धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Agra National Highway: मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या लेनवर पळासनेर येथील चारणपाडा जवळ गतिरोधकवर ब्रेक फेल झाल्याने ट्रकने कंटेनरला जोरदार धडक दिली.
Accident News
Accident NewsSaam tv
Published On

शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडागावा जवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधकवर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व पुढे चालत असलेल्या कंटेनरला पाठीमागून या ट्रकने जबर धडक दिली. या धडकेनंतर कंटेनर रस्त्यावर उलटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकमधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशाकडून महाराष्ट्रात येणाऱ्या लेनवर पळासनेर येथील चारणपाडा जवळ गतिरोधकवर ब्रेक फेल झाल्याने भरधाव वेगात असलेली प्लायवूड भरलेल्या ट्रकने पुढे चालणाऱ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की काही अंतरापर्यंत रस्त्यावर कंटेनरला ट्रकने घसरून नेले आणि त्यामुळे कंटेनर रस्त्यावर पलटी झाला.

Accident News
Ulhasnagar: उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा हलगर्जीपणा, महिला रुग्णांना फरशीवरच गादी टाकून उपचार

दरम्यान, ट्रकमधील चालक व सह चालक दोघेही कॅबिनमध्ये दाबले गेल्याने दोघांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी व पोलिसांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले. तसेच क्रेनच्या साहाय्याने उलटलेला कंटेनर रस्त्यावरून बाजूला करीत वाहतूक मोकळी केली.

Accident News
Ulhasnagar Crime: उल्हासनगरात प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर हल्ला; लोखंडी कड्याने मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

तसेच बीडमध्ये सुद्धा एक अपघात घडला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली आहे. या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील १ जण ठार तर अन्य १ जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना बीड-परभणी महामार्गावरील छोटेवाडी फाटा परिसरात घडली आहे.

Accident News
Sangli News: बेदाणा युनिटच्या नावाखाली बँकेची दोन कोटींची फसवणूक, ७ जणांवर गुन्हा दाखल

परमेश्वर लक्ष्मण जाधव वय ४० असं मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर परमेश्वर पंडितराव जाधव वय ५० असं गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान घटनेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पळून गेला असून या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident News
Viral Video: माकडाने हिसकावला परदेशी महिलेचा iPhone; परत मिळवण्यासाठी लढवली शक्कल, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com