Sangli News: बेदाणा युनिटच्या नावाखाली बँकेची दोन कोटींची फसवणूक, ७ जणांवर गुन्हा दाखल

Bank Fraud In Sangli: प्रकल्प उभारण्याकरता आणि कर्जाची रकमेची परतफेड न करता बँकेची १ कोटी ९८ लाख रुपयाची फसवणूक केल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे.
Bank Fraud
Bank Fraudyandex
Published On

बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकेजिंग प्रकल्प उभा करण्याच्या नावाखाली एचडीएफसी बँकेची १ कोटी ९८ लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील सात जणांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँकेचे सहउपाध्यक्ष रवींद्र बाळासाहेब कुलकर्णी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित डिस्ट्रिक्ट ऍग्रो फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक आहेत. कंपनीमार्फत बेदाणा प्रोसेसिंग युनिट आणि पॅकिंग प्रकल्प उभा करण्यासाठी सांगलीतील एचडीएफसी बँकेची ऍग्रो स्ट्रक्चर फंड योजनेतून कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेने प्रकल्प उभारणीसाठी एक कोटी 98 लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले. वेल्डर कंपन्या गौरी कंट्रक्शन, अँड अथर्व मूव्हर्स, यमुना हाइट्स गुरुकृपा सोसायटी कोंढवा पुणे यांच्या नावावर बँकेने कर्ज मंजूर वर्ग केले.

Bank Fraud
Ulhasnagar: उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा हलगर्जीपणा, महिला रुग्णांना फरशीवरच गादी टाकून उपचार

हा प्रकल्प तीन महिन्यात पूर्ण करून कागदपत्रे बँकेकडे सादर करण्याचे बंधनकारक होते. या संशयित सात जणांनी बँकेकडे तारण जमिनीवर प्रकल्प उभा करणार असल्याचे सांगितले होते. पण आज अखेर प्रकल्प उभारण्याकरता आणि कर्जाची रकमेची परतफेड न करता बँकेची १ कोटी ९८ लाख रुपयाची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Bank Fraud
Ulhasnagar Crime: उल्हासनगरात प्रेमसंबंधाच्या वादातून तरुणावर हल्ला; लोखंडी कड्याने मारहाण, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मुकुंद हणमंत जाधवर (रा. बालवाड जि. सोलापूर), स्वप्नाली मुकुंद जाधवर (वय 27 रा. बालवाड जि. सोलापूर), सखुबाई हणमंत जाधवर (वय 61 रा. बालवाड जि. सोलापूर) विजय शैलेंद्र कराड (वय 31 रा. भालगाव जि. सोलापूर), राजाराम विठ्ठल खरात (वय 48 रा. एरंडोली जि. सांगली), अजित विष्णू दळवी (वय 48 रा. बेडग) आणि लता विठ्ठल जाधव (वय 38 रा. पायाप्पाचीवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Bank Fraud
Ladki Bahin Yojana: ६० किलो रांगोळीचा वापर करुन ‘माझी लाडकी बहीण’ योजनेची अनोखी कलाकृती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com