Nashik Bus Fire : नाशिकमध्ये ST बसला अचानक आग, वाहनात होते ३५ ते ४० प्रवासी

Nashik Bus Fire News : नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर ही घटना घडली.
Nashik Bus Fire : नाशिकमध्ये धावत्या ST बसला अचानक आग, वाहनात होते ३५ ते ४० प्रवासी
Nashik Bus Fire :Saam tv
Published On

अजय सोनवणे, नाशिक

नाशिक : नाशिकमध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या बसमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावर ही घटना घडली. बसला अचानक आग लागल्यानंतर बसमधील प्रवासी खाली उतरले. सर्व प्रवासी बसमधून खाली उतरल्यानंतर या बसची आग वाढली. या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी फाट्यावरून ही बस निघाली होती. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यात या बसने अचानक पेट घेतला. खिरमणी फाट्यावर बस थांबल्यानंतर या बसला आग लागली. एसटी महामंडळाच्या सटाणा-प्रतापूर या बसने पेट घेतला. या एसटी बसमध्ये एकूण ३५ ते ४० प्रवासी होते.

Nashik Bus Fire : नाशिकमध्ये धावत्या ST बसला अचानक आग, वाहनात होते ३५ ते ४० प्रवासी
Salman Khan House Firing Case: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, हल्लेखोरांकडून पनवेलच्या फार्महाऊसवर हल्ल्याचा कट, पुढे नेमकं काय झालं?

बसने अचानक पेट घेतल्यानंतर प्रवासी तातडीने गाडीतून बाहेर पडले. बसला आग लागल्यानंतर एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले. त्यामुळे बसमधील प्रवासी बचावले.

आग लागल्यानंतर बस चालकाने आग विझविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, आग विझली नाही. त्यानंतर काहींनी अग्निशमन दलाला माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बस पूर्णत: जळून खाक झाली होती. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचे बोललं जात आहे.

Nashik Bus Fire : नाशिकमध्ये धावत्या ST बसला अचानक आग, वाहनात होते ३५ ते ४० प्रवासी
Navi Mumbai Fire News : बेलापूरमधील झोपडपट्टीला भीषण आग, सिलिंडरचा स्फोटाने परिसर हादरला

वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ

देशासहित राज्यात रस्त्यावरील धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्या आहेत. धावत्या वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारच्या एसटी बसलाही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com