Navi Mumbai Fire News : बेलापूरमधील झोपडपट्टीला भीषण आग, सिलिंडरचा स्फोटाने परिसर हादरला

Navi Mumbai Latest Marathi News : अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जात आग विझवली असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
fire broke in belapur sector 8 slum area navi mumbai
fire broke in belapur sector 8 slum area navi mumbai Saam Digital

- सिद्धेश म्हात्रे / संजय तुमराम / डाॅ. माधव सावरगावे

Fire News :

बेलापूर मधील सेक्टर 8 येथील झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. जेवण बनवताना सिलिंडरचा स्फोट झाल्याने या झोपडपट्टीला आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या आगीत अनेक झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जात आग विझवली असून सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Maharashtra News)

आसन खुर्दजवळ ट्रक पेटला

यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथून कोरपनामार्गे गिट्टी भरून येत असताना हायवा ट्रकच्या टायरने पेट घेतल्याने ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा - कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील आसन खुर्दजवळ आज सकाळी घडली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सद्यस्थितीत राजुरा - कोरपना - राज्य सीमा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी महामार्ग निर्मितीचे काम असलेल्या जी आर कंपनी द्वारे मोहदा येथून गिटी आणली जात आहे. तिथून येत असताना अचानक हायवा ट्रकने पेट घेतला.

fire broke in belapur sector 8 slum area navi mumbai
बुलढाणा : शस्त्रांसह चौघा परप्रांतीयाना अटक, मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात पाेलिसांची कारवाई

याबाबत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी ड्रायव्हरला कल्पना दिली. तो लागलीच उतरला. त्यामुळे तो सुदैवाने बचावला. मार्गाच्या कामावर असलेल्या पाणी टँकरमधून पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न केला गेला. अर्ध्या तासाने आलेल्या अग्नीशमन बंबामुळे आग आटोक्यात आली. ओव्हरलोडमुळे टायरने पेट घेतल्याचे बोलले जात आहे.

खुलताबादमध्ये कार जळून खाक

छत्रपती संभाजीनगर शहरातील पडेगाव येथे खुलताबाद रस्त्यावर कारला आग आली. या घटनेत कार जळून खाक झाली. रस्त्यावरून जाणाऱ्या पाण्याच्या टँकर चालकाने कारला आग लागलेली पाहताच टॅंकर थांबवून आग विझविली आहे. या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. कारमध्ये दोन विद्यार्थी होते. त्यांची परीक्षा असल्याने ते निघून गेले.

Edited By : Siddharth Latkar

fire broke in belapur sector 8 slum area navi mumbai
Success Story : द्राक्षच्या पंढरीत तैवान पेरुची लागवड, अल्पावधीत शेतक-याने कमावले 8 लाख

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com