Success Story : द्राक्षच्या पंढरीत तैवान पेरुची लागवड, अल्पावधीत शेतक-याने कमावले 8 लाख

काेविड काळात नोकरी गेली तर प्राध्यापक असलेले भारत यांनी हार न मानता शेतीत वेगवेगळे प्रयाेग करीत शेतीतून उत्तम उत्पन्न मिळू शकते हे दाखवून दिले आहे.
taiwan guava farming in mirchi palkhed farmer earns 8 lakh
taiwan guava farming in mirchi palkhed farmer earns 8 lakhsaam tv

- अजय सोनवणे

Nashik :

द्राक्षाचे आगार असलेल्या नाशिकच्या (nashik) निफाड तालूक्यात शेतकरी द्राक्षाची (grapes) मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. द्राक्षा बरोबरच काही तरी वेगळे उत्पन्न घ्यावे या संकल्पनेतून भारत बोगीर या प्रयोगशील शेतक-याने एक एकर क्षेत्रात सदाबहार तैवान जातीच्या पेरुची लागवड (Taiwan Guava) केली. त्यातून भारत यांना उत्तम उत्पन्न मिळू लागले आहे. (Maharashtra News)

भारत यांनी सहा महिन्यापुर्वी पेरुची लागवड केली होती. झाडांची छाटणी करत पेरुचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. एकाच झाडाला अडीचशे तीनशे ग्रामचे फळ तयार होत असल्याने एका झाडावर २० किलो पर्यंतचे उत्पन्न मिऴत आहे.

taiwan guava farming in mirchi palkhed farmer earns 8 lakh
Dada Bhuse : ताडी विक्री केंद्रावर पालकमंत्री दादा भुसेंची धाड, पाेलिस तपास सुरु

सुमारे एक एकरात २० टना पर्यंत पेरुचे उत्पन्न निघाले आहे. या पेरुची ५० रुपये किलो दराने विक्री होऊन आता पर्यंत १० लाखांचे उत्पन्न शेतक-याला मिळाले आहे. त्याने दिलेल्या माहितीनूसार खर्च वजा जाता आठ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

taiwan guava farming in mirchi palkhed farmer earns 8 lakh
Fire : धुळे शहरात कपड्याच्या दुकानाला आग, यवतमाळमध्ये लाकडाची मिल जळून खाक; लाखाेंचे नुकसान

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com