Dada Bhuse : ताडी विक्री केंद्रावर पालकमंत्री दादा भुसेंची धाड, पाेलिस तपास सुरु

Malegaon : परवानाधारक असलेल्या ताडी विक्री केंद्रात ताडीत पांढ-या रंगाची पावडर मिक्स करुन त्याची विक्री होत असल्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आले.
nashik guardian minister dada bhuse raids tadi vikri kendra in malegaon
nashik guardian minister dada bhuse raids tadi vikri kendra in malegaon Saam tv
Published On

- अजय सोनवणे

Nashik :

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील मोसम नदी किना-यावरील कामाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पालकमंत्री दादा भुसे (nashik guardian minister dada bhuse) यांना मोसम नदी किना-या जवळ असलेल्या ताडी विक्री केंद्रावर धाड टाकली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांना बाेलावून ताडी केंद्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले. दरम्यान संबंधित ताडी केंद्रातील पदार्थांचे नमुने उत्पादन शुल्क विभागाने घेतल्याची माहिती अधिकारी यांनी दिली. (Maharashtra News)

पालकमंत्री दादा भुसे यांनी ताडी केंद्रावर मोठी गर्दी दिसली. त्यांनी थेट ताडी विक्री केंद्र गाठल्याने तेथे पळापळ सुरु झाली. यावेळी भुसे यांनी पाहणी केली. परवानाधारक असलेल्या या ताडी विक्री केंद्रात ताडीत पांढ-या रंगाची पावडर मिक्स करुन त्याची विक्री होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

nashik guardian minister dada bhuse raids tadi vikri kendra in malegaon
Bara Balutedar Sanghatna Morcha : विद्युत पुरवठा कंपनी विराेधात मालेगावमध्ये बारा बलुतेदार संघटनेचा मोर्चा

राज्य उत्पादन विभागाने तातडीने तेथील ताडीचे नमुने घेतले. ते तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले जाणार आहेत. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन विभागाच्या अधिकारी यांनी दिली. दरम्यान या ताडी विक्री केंद्रामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत होता. महापालिकेने तातडीने ताडी केंद्र बाहेरील अनधिकृत पत्र्याचे कंपाऊंड जेसीबीने हटविले. या ताडी विक्री केंद्राची पाेलिसांकडून तपासणी सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nashik guardian minister dada bhuse raids tadi vikri kendra in malegaon
Shahapur : पाण्यासाठी काेळीपाड्यातील महिलांची 50 किलोमीटरची पायपीट, गट विकास अधिका-यांना विचारला जाब

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com