- भूषण अहिरे / संजय राठाेड
धुळे (dhule) शहरात एका कपड्याच्या दुकानाला आग लागल्याने लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. दूसरीकडे यवतमाळ (yavatmal) शहरात एका लाकडाच्या मिलला मध्यरात्री आग लागली. या आगीत सर्व साहित्य जळाल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
धुळे शहरातील आग्रा रोड परिसरामध्ये असलेल्या कृष्णादीप अमरकला या कपड्याच्या दुकानाला रात्री अकराच्या दरम्यान अचानक आग लागली. या आगीमुळे परिसरात प्रचंड धुराचे लोट पसरले.
या परिसरातील नागरिकांनी आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन विभागाला घटनेची माहिती दिली. अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. यावेळी अग्निशमन विभागाच्या जवानांनी अथक प्रयत्न केल्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाच्या जवानांना यश आले आहे.
विशेष म्हणजे आग लागलेल्या दुकानाजवळच बहुतांश कपड्याचे दुकान असल्यामुळे ही आग इतर दुकानांमध्ये देखील पसरण्याची भीती असताना अग्निशमन विभागाच्या जवानांनी अथक प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. यामध्ये सुदैवाने जीवित हानी टळली असली तरी दुकानातील फर्निचर व कपडे जळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी शॉक सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Maharashtra News)
यवतमाळला लाकडाच्या मिलला आग
यवतमाळ शहरात लाकड मिलला आग मध्यरात्री एक वाजता दरम्यान आग लागली. या आगीत मील जळून खाक झाली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. यवतमाळच्या अप्सरा टाॅकीज परिसरातील लकडगंज मार्केट रोड वरील सय्यद टाल मीलला आग लागुन लाखोचे साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी अग्निशामक दलाचे पथक वेळीच आल्याने आग आटोक्यात आली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.