Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation : संभाजीनगर मनपाचा पाणीपुरवठा ठप्प, टॅंकर भाव खाऊ लागला

Water Supply Of Sambhajinagar : जलकुंभ भरून पाणीपुरवठा करणे रात्रीतून शक्य नाही. आज पहाटेपासून पाणी दिले जाणार असल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले.
water shortage in sambhajinagar city
water shortage in sambhajinagar citysaam tv

- रामनाथ ढाकणे

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा (sambhajinagar municipal corporation) शहरात हाेणारा पाणीपूरवठा वारंवार विस्कळीत हाेत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिकांना टॅंकरच्या माध्यमातून पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या संभाजीनगर शहरात 2000 लिटरसाठी सुमारे 600 रुपये माेजावे लागत आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगर शहरवासी यांचे पाण्यासाठीचे विघ्न कमी होताना दिसत नाही. शहराची तहान भागविणारी मुख्य जलवाहिनी शनिवारी सायंकाळी चितेगावजवळ फुटली आणि दुरुस्तीचे काम तब्बल १९ तास चालल्याने रविवारी दुपारी ४ वाजता काम पूर्ण झाल्यानंतर पहिला पंप सुरू करून चाचणी घेण्यात आली.

water shortage in sambhajinagar city
Sindhudurg : नवोदय विद्यालय विषबाधा घटनेची चाैकशी हाेणार, दाेषींवर कारवाईचे मंत्री केसरकरांचे निर्देश

सायंकाळी शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. जलकुंभ भरून पाणीपुरवठा करणे रात्रीतून शक्य नाही. आज पहाटेपासून पाणी दिले जाणार असल्याचे महापालिकेतर्फे कळविण्यात आले. शनिवारी, रविवारी ज्या वसाहतींना पाणी मिळाले नाही, त्यांना प्राधान्याने पाणी दिले जाणार आहे.

water shortage in sambhajinagar city
Nitesh Rane : प्रकाश आंबेडकर सावध व्हा ! ज्या जागा तुम्ही जिंकू शकत नाही, मविआ तुम्हांला देत आहे : नितेश राणे

ऊन वाढल्यामुळे पाण्याच्या मागणीतही वाढ होत आहे. त्यातच शनिवारी रात्रीपासून शहराचा पाणीपुरवठा बंद पडला. अगोदरच आठ ते दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होतो. त्यात आणखी एक ते दोन दिवसांचा विलंब होतोय. नागरिकांना पिण्यासाठी जार, टैंकर मागवावे लागत आहेत. (Maharashtra News

टँकरच्या दरात वाढ

मनपाचा पाणीपुरवठा ठप्प होताच टॅंकर चालकांनीही दर दुप्पट करून टाकले. ३५० रुपयांना दोन हजार लीटरचा टैंकर मिळत होता. रविवारी ५५० ते ६०० रुपयांची मागणी करण्यात येत होती.

Edited By : Siddharth Latkar

water shortage in sambhajinagar city
'कुक्कुटपालन'ची चाळीस कोटींची जागा कवडीमोल भावात विकली गेली; माजी मंत्री शिवाजीराव मोघेंचा आराेप, चौकशी समिती नेमण्याची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com