Nitesh Rane : प्रकाश आंबेडकर सावध व्हा ! ज्या जागा तुम्ही जिंकू शकत नाही, मविआ तुम्हांला देत आहे : नितेश राणे

आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. खासदार नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची काळजी काेणी करु नये असेही राणेंनी म्हटले.
nitesh rane on prakash ambedkar lok sabha election 2024
nitesh rane on prakash ambedkar lok sabha election 2024saam tv
Published On

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

आगामी काळात हाेणा-या लाेकसभा निवडणुकीसाठी (lok sabha election 2024) महाराष्ट्रातील नेेते सज्ज झाले आहेत. राज्यातील काेणत्या मतदारसंघात काेणाला उमेदवारी द्यायची यासाठी महायुती (mahayuvti) आणि महाविकास आघाडी (mahavikas aghadi) यांच्यात बैठका सुरु आहेत. यामध्ये प्रादेशिक पक्षातील उमेदवारांना सामावून घेताना नेेते मंडळींनी कसरत करावी लागत आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांची महाविकास आघाडी फसगत करीत असल्याचे भाजपचे आमदार नितेश राणे (mla nitesh rane) यांनी म्हटले. आंबेडकर यांनी सावध व्हावे असे आवाहनही राणे यांनी आज (शनिवार) सिंधुदूर्ग येथे माध्यमांशी बाेलताना केले. (Maharashtra News)

आमदार नितेश राणे म्हणाले प्रकाश आंबेडकर ज्या जगा जिंकणार नाहीत त्याच जागा त्यांना देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी करत आहे. आंबेडकर नावासाठी प्रकाशजींनी योग्य निर्णय घ्यावा असे राणेंनी नमूद केले. ते म्हणाले डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते करीत आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी स्वाभिमानासाठी याेग्य वेळी याेग्य निर्णय घ्यावा.

nitesh rane on prakash ambedkar lok sabha election 2024
Sindhudurg : नवोदय विद्यालयातील 133 विद्यार्थ्यांना विषबाधा; मंत्री केसरकर आज सावंतवाडीत

यावेळी आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले खासदार नितीन गडकरी यांच्या उमेदवारीची काळजी काेणी करु नये. पहिल्यांदा स्वतःच्या मुलाला (आदित्य ठाकरे) वरळीतून महाविकास आघाडीच्या नावाने निवडून आणून दाखवा आणि मग नितीन गडकरी यांच्यावर बोला असे राणेंनी नमूद केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

nitesh rane on prakash ambedkar lok sabha election 2024
वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेचा बेमुदत संप मागे, बैठकीनंतर फडणवीस स्पष्टच बाेलले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com