- पराग ढाेबळे
कंत्राटी कामगारांबद्दल सरकारचा दृष्टिकोन कायम सकारात्मक आहे आणि राहील. वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी यांच्या प्रश्नांवर आज चर्चा झाली. त्यांचे काही प्रश्न महत्वाचे आहेत. त्यावर देखील आम्ही सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी नमूद केले. फडणवीस यांनी वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान वीज मंडळ कंत्राटी कर्मचारी संघटनेने (veej kantrati kamgaar sanghatana) बेमुदत संप मागे घेतला आहे. त्याबाबतची माहिती संघटनेच्या पदाधिका-यांनी साम टीव्हीला दिली. (Maharashtra News)
विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी विविध संघटनांच्या सुमारे 42 हजार वीज कंत्राटी कामगारांनी राज्यभरात बेमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे. या आंदाेलनचा आज 5 वा दिवस आहे. कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांची आज (शनिवार) उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर तसेच कर्मचा-यांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले.
फडणवीस म्हणाले वीज कर्मचारी संघटनेच्या चर्चेत साडे चाैदाशे काेटी रुपयांची वेतन वाढ देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे पदाधिकारी यांनी सांगितले. लाईन वर काम करणा-या कर्मचा-यांना वेतन वाढ दिली जाईल असे आम्ही आश्वासित केले आहे. कंत्राटी कर्मचारी यांच्याबाबत देखील आम्ही सकारात्मक आहाेत असेही फडणवीस यांनी नमूद केले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
फडणवीस म्हणाले कंत्रादार कंत्राटी कामगारांची फसवणूक करतात, त्यावर उपाययाेजना काढा अशी त्यांची विशेष आणि महत्वाची मागणी आहे. त्यावर कामगारांच्या खात्यात थेट सरळ पैसे जमा करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
17 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा
कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नचिकेत मोरे म्हणाले संपूर्ण राज्यात 42 हजार वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील पाच दिवसांपासून शाश्वत वेतनश्रेणीसह विविध मागण्यांना धरून आंदोलन सुरू होतं. आज देवगिरी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 17 मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
आमच्या 17 मुद्द्यांवर वीज वितरण कंपनीच्या तिन्ही एमडीसोबत या संदर्भात चर्चा करू. यात प्रमुख मागणीमध्ये पूरक भत्ता देण्यासंदर्भात इतरही मुदयावर सकारात्मक चर्चा करणार असल्याचं फडणवीस यांनी आम्हांला आश्वासित केले आहे.
आंदोलना दरम्यान कृती समितीच्या वतीने निवेदन दिला जाईल. त्या निवेदनासोर कोणावर आकसी वृत्तीने कारवाई होणार नाही. गुन्ह्या संदर्भात सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचाही आश्वासन देण्यात आल्याचं मोरे यांनी सांगितलं. नियमित कामगारांना 2019 साली पूरक भत्ता दिला होता. त्यात 30 टक्के वाढ करण्यात यावी या मागणीवर विचार होणार आहे असल्याचे माेरेंनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.