Amravati Shocking : अमरावती हादरलं! १७ वर्षीय मुलीवर मठात अत्याचार; मावशीच्या साथीने दोघांकडून भयंकर कृत्य

Amravati crime news : अमरावतीला हादरवणारी घटना घडली आहे. अमरावतीत १७ वर्षीय मुलीवर मठात अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित तरुणीच्या मावशीच्या साथीने दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
Amravati News
Amravati ShockingSaam tv
Published On

अमर घटारे, साम टीव्ही

अमरावतीतून खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावतीमधील एका आश्रमात १७ वर्षीय मुलीवर मठात अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरवतीमधील हरिद्वापूर येथील महानुभाव आश्रमात १७ वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथील मठात १७ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. रिद्धपूर ही महानुभाव पंथीयाची काशी समजली जाते. यात मठात गेल्या अनेक महिन्यांपासून एका युवतीवर अत्याचार सुरु होता.

Amravati News
Crime News: हॅलो बाबू! मी मरतो..., गर्लफ्रेंडला व्हिडिओ कॉल करत तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

सुरेंद्र आणि बाळासाहेब या दोघांनी मावशीच्या साथीने तरुणीला बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. या अत्याचारातून पीडत मुलगी ८ महिन्यांची गरोदर झाली. तिने या अत्याचाराची माहिती पीडित मावशीला दिली. मात्र, मावशीने पीडित तरुणीला गप्प राहण्यास सांगितले. या प्रकरणी आता शिरखेड पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. तिघांवर अत्याचाराच्या गुन्ह्यासह पोस्कोचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

Amravati News
Raigad Crime: पोलिस ठाण्यात दोन गट भिडले, पोलिसांसमोरच कोयत्याने सपासप वार; तिघे गंभीर जखमी, पाहा VIDEO

ओळखीचा गैरफायदा घेतला, अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगरमधील श्रीरामपूरातील १७ वर्षीय मुलीवर सोनई येथील एका लॉज अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. सोशल मीडियावरील ओळखीचा फायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आजीच्या घरी सोनईला जात असताना गाडीत सोडण्याच्या बहाण्याने अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आलेय. सोनईतील एका लॉजमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालाय. या अत्याचार प्रकरणी २७ वर्षीय सोप्नील विरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Amravati News
Raigad Crime: पोलिस ठाण्यात दोन गट भिडले, पोलिसांसमोरच कोयत्याने सपासप वार; तिघे गंभीर जखमी, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com