Police-Naxal Clash in Balaghat : जंगलात गोळीबाराचा थरार; पोलिसांच्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा

Police-Naxal Clash in Balaghat : जंगलात गोळीबाराचा थरार पाहायला मिळाला. पोलिसांच्या चकमकीत ४ महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यानंतर त्यांचं चहूबाजूकडून कौतुक होत आहे.
Police-Naxal Clash update
Police-Naxal ClashSaam tv
Published On

मध्य प्रदेशच्या बालाघाटात जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत 4 महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला आहे. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक गढी पोलीस ठाणे क्षेत्रातील रौंदा जंगलात झाली आहे. या जंगलात नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. पोलिसांनी चकमकीत नक्षलवाद्यांचे हत्यारे आणि साहित्य जप्त केलं आहे.

पोलीस आणि हॉक फोर्स जवानांनी रौंदा येथील जंगलात शोधमोहीम सुरु केली. त्यानंतर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत चार महिला नक्षलवाद्यांचा खात्मा झाला. या चकमकीदरम्यान एक इंसास रायफल, एक एसएलआर रायफल आणि एक ३०३ रायफल व्यतिरिक्त अनेक साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

Police-Naxal Clash update
Clash Between Jawan And Naxal : छत्तीसगडच्या सीमवेर धुमश्चक्री; जवानांनी ९ नक्षलवाद्यांचा केला खात्मा, आता घटनास्थळी परिस्थिती काय?

जंगलातून फरार

जंगलातील चकमकीदरम्यान काही नक्षलवादी जखमी झाले. या घनदाट जंगलाचा फायदा उचलून काही नक्षलवाद्यांनी पळ काढला. जखमी नक्षलवाद्यांना शोधण्यासाठी पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरु केलं. पोलिसांनी या सर्च ऑपरेशनमध्ये हॉक फोर्स, सीआरपीएफ, कोबरा कमांडो आणि इतर पथकांचा सहभाग नोंदवला. एकूण १२ हून अधिक पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं. नक्षलवाद्यांचा शोध घेण्यासाठी या पथकांनी सर्च ऑपरेशन सुरु केलं.

Police-Naxal Clash update
Naxal Encounter: नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी कारवाई; ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी अभिनंदन करत म्हटलं की, 'मध्य प्रदेश सरकार लवकरच नक्षलग्रस्त भागातील नक्षलवाद्यांचा खात्मा करणार आहे. २०२६ पर्यंत राज्यातील नक्षलग्रस्त जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करण्यात येईल'.

Police-Naxal Clash update
Naxal Encounter: नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची मोठी कारवाई; ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

जंगलातील चकमकीची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जंगलात पळून गेलेल्या नक्षलवाद्यांचा शोध घेणे आव्हानात्मक आहे. चकमकीत चार नक्षलवाद्यांचा खात्मा केल्यानंतर बालाघाट जिल्ह्यातील पोलिसांचं कौतुक केलं जात आहे. पोलिसांनी महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com